सस्नेह जय शिवराय
आज जो अपेक्षीत नाही असा महिलांवर अत्याचार होत आहे.,आधीही होत असे पण आता अतीच झालय त्याला जबाबदार कोण ? भ्रष्ट राजकारणी, लयाला गेलेली न्याय व्यवस्था, शिक्षणाचा अभाव, अती शिक्षण ,कमी पडलेले संस्कार, पाच्छिमात्य संस्कृतीचा पडलेला प्रभाव, आईबाबांच्या व्यस्त जीवनसरणीमुळे कमी पडलेला वेळ, सोशल मिडीया,ईतर हा सर्व चिंतनाचा विषय आहे.त्यावर कवी म्हणा लेखक म्हणा हे जीवाच्या आकांताने लिहित असतात काहींचा कल महिलांकडे असतो तर काहींचा कल पुराषांकडे .कुणी आई बाबांच्या मनातील मुलींच्या प्रती असलेली काळजी व्यक्त करत.कुणी समाजातील सोज्वळ मुलींच्या प्रती असलेली काळजी आणि त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत ती समाजातील त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर मात करण्यासाठी सज्ज व्हावी , ति समाजामध्ये तिच्या मर्जीने तिला वाटेल त्या पण सुसंस्कृत पद्धतीने जगावी. पण ह्या कवींच्या मनातील कल्पना जरी खर्या असल्या तरी त्या समाज मान्य करण्यास तयार नसतो . पण आपण जे काही वाचतो ,ऐकतो ते मुलीने ऐकोत अथवा मुलाने किंव्हा समाजातील कुठल्याही व्यक्तीने त्याचा बहुतांशी लोकं गांभीर्याने विचार करीत नाही.आणि एखादी सामाजीक पोष्ट असली की भावनेच्या आहारी जातो पण आपण आत्मपरीक्षण करुन अाजुबाजुला पाहील तर कलेळ की बहुतांशी माणसं चुका म्हणा अथवा वादाचा मुद्दा म्हणा शोधन्यात धन्यता मानतात,मग चर्चा होते ती वादाच्या मुद्यांवर आणि त्यात समाजाला हितकारक असनारा मुद्दा ईतिहास जमा होतो आणि म्हणुनच आज कुठेतरी समाज अधोगतीला चालला आहे.पण मला वाटतं समाजात जे चांगलं ते घ्यावं प्रसार करावा आणि वाईट ते सोडुन द्यावं.तुम्ही जे पेराल तेच ऊगवेल तुम्ही जर भात पेराल आणि गहु ऊगवन्याची अपेक्षा ठेवाल तर ते कसं शक्य आहे ?
हा आता मुलिनां संस्कार देणाऱ्या कवितांमध्ये काही जणांचा आक्षेप असतो. शिक्षण घेऊन व् स्वयंपूर्ण होऊन स्त्री जेव्हा आधुनिकता स्वीकारते तेव्हा
तिला समाजाच्या संकुचित पणाचा त्रास होतो .... भारतीय पुरषाने दृष्टिकोण
सुधारुन आधुनिक स्त्री का स्विकारु नए ...संस्कृतीच्या नावाने तिच्या
स्वतंत्रा वर मर्यादा का आणाव्यात .....पश्यात्य जगाने जे बदल स्वीकारले ते
भारतीय समाजाने का स्वीकारु नए .....पाश्च्यात्य स्त्री बिघडलेली आहे हां
गैरसमज भारतीय लोकांमधे का आहे .....काही प्रमाणात हे जरी सत्य असलं तरी आजची परिस्तिथी वेगळीच आहे.
भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा दिसुन येतात. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. देशातील विविधरंगी धार्मिक उत्सव, संगीत, नृत्ये, स्थापत्यशैली यातील कलात्मक बंध, तशीच भौगोलिक रचना आणि इथला पुरातन व आधुनिक संस्कृतींचा मिलाप ह्या गोष्टी आपण बदलुच शकत नाहीत आणि तसा विचार करता बदल सहजासहजी शक्य नाही.
त्याला फार कारणं असली तरी सर्वात महत्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे आपली न्याय व्यवस्था. महिलांवरच्या अत्याचारावर कायदा आहेच की महीला सुरक्षा कायदा ह्या कायद्यामध्ये शारीरिक, लैंगिक, मानसिक, शाब्दिक व भावनिक, आर्थिक छळ तसेच छळाची धमकी देणे यासारख्या गोष्टींचा समावेश शिक्षणव्यवस्थेत जाण्यास मनाई करणे, विशिष्ट व्यक्तीसोबत विवाह करण्यास राजी करणे, आत्महत्येची धमकी देणे यासारख्या बाबींचा समावेश आहे
हा कायदा लागू झालेला असला तरी महिला बिचाऱ्या पुरुष त्यांचा गैरफायदा घेण्याची भिती व्यक्त करतात; शहरी भागात ज्ञात असेल पण हा कायदा खरेच ग्रामीण, आदिवासी भागातील लोकांपर्यंत पोहोचलेला आहे का ? त्याचा योग्य तो वापर का केला जात नाहीये आज ह्या बाबतीत लोकसभेत चर्चा होऊनही हा ते चर्चाच करतात म्हणा त्यात काही नवीन नाही. मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे .कोणत्याही गोष्टीमध्ये चर्चेबरोबरच कृती हि घडायला हवी पण तसं घडताना दिसत नाही परिणाम स्वरूप अत्याचार थांबले जात नाहीयेत . आणि जोवर अत्याचार करणार्यांवर कठोर शासन होणार नाही तोवर महिलांवरील अत्याचार थांबणार नाहीत .आणि हे काम सर्वच थरापर्यंत होण्याची गरज आहे. आपण श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने घेतो .पण त्यांच्या न्याय व्यवस्थेतील एकतरी गुण आपण घेतलं आहे का ? रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर याने गावकीतल्याच एका गरीब शेतकर्याच्या
तरूण मुलीला दिवसाढवळय़ा सर्वासमक्ष पळवून तिच्यावर बलात्कार केला,
अब्रुच्या भीतीने तीने जीव दिला! सारा गांव हळहळता पण मुकाच राहिला!.. पण
शिवरायांच्या कानि ही गोष्ट आली. शिवरायाचं वय होत
केवळ पंधरा वर्षे परंतु या वयातही शिवरायांनी मुजोर बाबाजी गुजरला पकडून
आणले. खटला चालवून बाबाजी गुजर या पाटलांचा चौरंग केला. चौरंग करणे एक हात
पाय कलम करणे, विचार करा ही शिक्षा जर आजच्या काळात अमंलात आणली तर काय
होईल! परंतु याच शिक्षेमुळे सार्या मावळ खोर्यावर एक प्रकारची दहशत बसली.
रयत लहानग्या शिवरायांवर अक्षरश: खुश झाली. स्त्रियांच्या अब्रु
रक्षणाबाबत जर शिवराय असे धोरण अवलंबत असेल तर त्यांच शिवबांसाठी रयत
काहीही करायला तयार झाली. शिवरायांचे वय १५ वर्षांचे पण त्यांच्या याच
न्याय स्वभावामुळे अनेक मराठे त्यांच्या फौजेत नुसते सामीलच झाले नाही तर
मरायला सिद्ध झाले. कारण ज्यांच्या पाठबळावर राजांनी राज्य करायचं त्या
वतनदार, पाटील, देशमुख आदी मंडळीची सुद्धा गय न करता त्यांना शिक्षा करायची
धमक शिवरायांच्या ठायी होती.
आज गुन्हेगारांचा गुन्हा सिद्ध होऊनही त्याला वर्षानुवर्षे पोसले जात आहे .का तर दळभद्री राजकारण वाढवण्यासाठीच ना ? पण त्यामुळे आजच्या piढीवर चुकीचे संस्कार होत आहेत हे राजकारणी लोकांना समजू नये.? मुळात समजत असूनही त्यांना त्याच्याची काही देणंघेनं नसतं म्हणूनच समाजात अत्याचार फोफावलेला आहे .म्हणूनच मुलींवर चागले संस्कार व्हावेत अस कवीच आईबाबांचं प्रामाणिक मत असतं कारण मुलगी कितीही प्रगत झाली तरी तिची गेलेली अब्रू काही केल्या परत येऊ शकत नाही. आपण आजवरचा ईतीहास पाहीला तर समाजात स्त्रीयांना जास्त भोगावं लागलय. त्याचं कारण म्हणजे स्त्री ही पुरषाना जन्म देत असते तिच्या गर्भात पुरषांचा अंश वाढत असतो.पुरषांच्या गर्भात स्त्रीचा अंश नाही वाढत. आणि लग्नाआधी स्त्रीयांच शील भ्रष्ट झालं तर आपला समाज तीला जगु देत नाही.तसं पुरषांच्या बाबतीत घडतं का ? अर्थातच नाही आणि हे एक कडवं सत्य आहे ते कुणीही नाकारू शकत नाही .बहुधा सुधारू शकत नाही म्हणुनच कायद्यात सुधारणा होऊन त्याची अंमलबजावणी सर्वच थरांवर झाली तर बर्यापैकी बदल घडू शकतो पण जे जनहिताचे कार्य करणार ते राजकारणी कसले ? (काही अपवाद वगळता) म्हणूनच स्त्रीयांच्या बाबतीत आईबाबांना काळजी आणि कवींना जास्त लिहावसं वाटत असावं असं मला वाटतं....
पश्चिमात्य संस्कृतीच म्हणाल तर महिलांच्या बाबतीत आपल्या देशात राबवणं तितकी सोपी गोष्ट नाही .संविधान निर्माण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम स्त्री-पुरुष समानता हे तत्व या देशाला मान्य करायला भाग पाडले. त्यामुळे स्वतंत्र देशात भारतातील संविधानानुसार पुरुषांसाठी जे अधिकार आहेत ते या देशातील स्त्रीला सुद्धा लागू होतात. मुलभूत अधिकार, संपतीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, व्यवसाय व नोकरी करण्याचा अधिकार, विविध पदावर अधिकारी बनण्याचा अधिकार ,सन्मानाने जगण्याचा अधिकार, देशभरात कोठेही प्रवास करण्याचा आणि वास्तव्याचा अधिकार, तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला विरोध करण्याचा तसेच थांबविण्याचा अधिकार, मताधिकार, निवडणुकीला उभे राहणयाचा अधिकार असे कितीतरी अधिकार स्त्रीला संविधानानुसार मिळाले. एवढेच काय तर घटस्फोट घेण्याचा अधिकार सुद्धा स्त्रीला मिळाला. कायद्याने ती समान झाली, मात्र दोन हजार वर्षे ब्राम्हणपुरोहित वर्गाच्या धार्मिक गुलामीत जीवन जगणारी भारतीय स्त्री अजूनही त्याच गुलामीत जगत आहे.खास करून ग्रामीण महिलांना आपले अधिकार माहित नसल्यामुळे तिचा सतत अपमान होत आहे, अत्याचाराला बळी पडत आहे. सर्व आलबेल कारभार आहे.सर्वाना आपली मानसीकता बदलुन घेण्याची गरज आहे.राजकारणी लोकांचं सोडा जीथे लोक स्वःताला बदलुन घेऊ ईच्छित नाही तिथे तुम्ही राजकारण्याकडुन काय अपेक्षा ठेवणार ? पाच्छिमात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्या देशात काही प्रमाणात पडु लागल्यानेच महीलांवरील अत्याचाराची वाढ झालेली दिसुन येते.कारण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमधे महीलांच्या ईच्छा आकांक्षाना फारचं महत्व दिलं जात नाही.त्यांचा फक्त वापर केला जातो. आपण विलक्षण प्रगत अश्या पाच्छीमात्य संस्कृतीची वाट पहात आहोत.पण महिलांच्या प्रती पुरुषाने आपली मानसीकता बदल्यान्याची गरज आहे.स्त्रीया आज शिकत आहेत, शिकवित आहेत, भारता सारख्या अतिपारंपारिक देशात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नवनवीन क्षेत्रं पादांक्रात करीत आहेत, पण तरीही …आजची आधुनिक स्त्री खरंच माणूस म्हणून संपूर्ण समाजाकडून स्वीकारली गेली नाही हे परम सत्य आहे. स्त्री म्हणजे "नारी तेरी यही कहाणी, आंचल मे दुध और आंखो मे पाणी" ह्या नुसार चालत आलेली माणसीकता आता बदलायला हवी.काही झालं तरी हा संघर्ष थांबनं तितकं सोप नाही.
म्हणूनच कवीने पुढील कविता आजच्या वास्तुस्तीथीला स्मरून आई बाबांच्या मनातील आपल्या मुलीच्या प्रती असलेली चिंता व्यक्त केली आहे .
( जळगांवातील " आशा फौंडेशन " मार्फत हजारो विद्यार्थीनींपर्यत पोहोचलेली कविता. यातून त्यांच्या सजकता व संस्कारांविषयी केलेला हा मुक्त संवाद )

लक्षात ठेव पोरी.........
लक्षात ठेव पोरी, तू तुकडा आहेस काळजाचा.
विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा. ॥धृ॥
लक्षात ठेव पोरी, तू तुकडा आहेस काळजाचा.
विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा. ॥धृ॥
तुला घराबाहेर पाठवायला, मन आमचं धजत नाही.
पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं, असही वाटत नाही.
तळ हातावरच्या फोडाप्रमाणे, जपलय तुला काळजीने.
जाणिव ठेव त्याची आणि, झेंडा लाव तुझ्या यशाचा.॥1॥
पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं, असही वाटत नाही.
तळ हातावरच्या फोडाप्रमाणे, जपलय तुला काळजीने.
जाणिव ठेव त्याची आणि, झेंडा लाव तुझ्या यशाचा.॥1॥
उच्छल, धांदरट राहू नकोस, स्वप्नात उगीच गुंतू नकोस.
आरशापुढे उभं राहून, वेळ वाया घालू नकोस.
मोहात कसल्या पडू नकोस, अभ्यास करण्या विसरुं नकोस.
पैसे देवूनही मिळणार नाही, तुझा वेळ आहे लाख मोलाचा.॥2॥
आरशापुढे उभं राहून, वेळ वाया घालू नकोस.
मोहात कसल्या पडू नकोस, अभ्यास करण्या विसरुं नकोस.
पैसे देवूनही मिळणार नाही, तुझा वेळ आहे लाख मोलाचा.॥2॥
मन जीवन तुझं कोरं पान, त्यावर कुणाचं नांव लिहू नकोस.
स्पर्श मायेचा की वासनेचा, भेद करण्यात तू चूकू नकोस.
मोबाईल-संगणक आवश्यकच गं, जाळ्यात त्यांच्या गुरफटू नकोस.
परक्यांवर विश्वास करू नकोस, अनादर नको करू गुरूजनांचा.॥3॥
स्पर्श मायेचा की वासनेचा, भेद करण्यात तू चूकू नकोस.
मोबाईल-संगणक आवश्यकच गं, जाळ्यात त्यांच्या गुरफटू नकोस.
परक्यांवर विश्वास करू नकोस, अनादर नको करू गुरूजनांचा.॥3॥
देहाचं प्रदर्शन करण्यासाठी, संस्कार कपडे टाकू नको.
लाज वाटेल असं काही करण्यासाठी, चेहरा उगीच झाकू नको.
चूकांना येथे नसतेच कधी माफी,
गेलेली अब्रूही परत येत नाही.
मुलीच्या चालण्या बोलण्याकडे, सतत डोळा असतो समाजाचा.॥4॥
लाज वाटेल असं काही करण्यासाठी, चेहरा उगीच झाकू नको.
चूकांना येथे नसतेच कधी माफी,
गेलेली अब्रूही परत येत नाही.
मुलीच्या चालण्या बोलण्याकडे, सतत डोळा असतो समाजाचा.॥4॥
असं विपरीत घडत असलं तरी, आमचा तुझ्यावर विश्वास आहे.
जीजाऊ, सावित्री आणि अहिल्या, किरण बेदीही तुझा आदर्श आहे.
युग आहे गुणांचं-स्पर्धेचं, हिमतीनं तू संघर्षही करशील.
मात्र, यशावरती स्वार होण्या, लगाम लागतो बेटा संयमाचा.॥5॥
जीजाऊ, सावित्री आणि अहिल्या, किरण बेदीही तुझा आदर्श आहे.
युग आहे गुणांचं-स्पर्धेचं, हिमतीनं तू संघर्षही करशील.
मात्र, यशावरती स्वार होण्या, लगाम लागतो बेटा संयमाचा.॥5॥
लक्षात ठेव पोरी, तू तुकडा आहेस काळजाचा.
विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा.......
विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा.......
एखादा मुद्दा आपण कुठल्या दृष्टीकोणातुन पाहतो ह्यावरच सर्वकाही अवलंबुन असते
आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कार्यावर आपली उंची ठरत असते आणि सुरवात हि स्वतः पासून झाली पाहिजे आपण स्त्रियांना मान सन्मान दिला पाहिजे .त्यांना त्यांची मोकळीक दिली गेली पाहिजे .
#नित# नितेश पाटील
आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कार्यावर आपली उंची ठरत असते आणि सुरवात हि स्वतः पासून झाली पाहिजे आपण स्त्रियांना मान सन्मान दिला पाहिजे .त्यांना त्यांची मोकळीक दिली गेली पाहिजे .
#नित# नितेश पाटील
No comments:
Post a Comment