........नितेश पाटील.....
माणसात जरी परमेश्वर असला...
तरी तो मिळणे सोपं नसते...
आता हेच बघा ना सारे ग्रंथ, वेद, पुराणांच म्हणनं आहे परमेश्वर आपल्यात आहे आणि आपण त्याला शोधतो कुठे ? देव्हारयात,मंदिरात. हे काही साधन नसेल तर वर बधुन...
विषेश म्हणजे आपण आपलच समाधान करत असतो....देव पुजला म्हणुन..पण मी निच्छीत सांगु शकतो...देव देव्हारयात मिळत नसतो.. गाईच्या कासेत असनारया गोचिडाला जशी दुधाची चव नसते त्यातला हा प्रकार.... आपल्या आचरणामधे ताकत असते त्याला मिळवण्याची,आपल्यात जागृत करण्याची....आज देव लोकांनी कुठेही बसवला...देवाच्या नावावर आपला स्वार्थ साधु लागला माणुस...काहि ठिकाणि इतक्या घाणेरड्या जागेत असतो कि किव येते.आणि ते पाहुन आपण माणुस आहोत ह्याची लाज वाटायला लागते.....पण सर्व ठायी परमेश्वर असतो हे आठवल की मन खिन्न होउन जाते...आठवत ते गीत...कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी, ह्रुदयातील भगवंत राहीला.. ह्रुदयात ऊपाशी...मी देवाला मनातच पुजलं पाहिजे अन्यत्र नाही.माझं इतरांप्रती आचरण चांगल असलं पाहिजे.खर सांगायच तर ...आज तुम्हि बघाल तर अब्जावधी रुपयाच्या प्राॅपट्या ह्या मंदिरांच्या,संस्थानाच्या नावे...त्याचा समाजाला फायदा काय? असेलही पण तो किती प्रमाणात ? आणि सामान्य माणुस मात्र अंधश्रद्धेपोटी आपल्या कमाईतला काही भाग (रुपये) देव देव करत यांना दान करतो(दिलाच पाहिजे पण तो गरजुना..देवाला काय गरज?)...अपेक्षा सुखाची ..मिळतं काय ? ...मृगजळ ते त्याच्या मागे लागून ते मिळनार आहे का....नाही ...माणुस म्हणुन जगल म्हणजे सार काही साध्य होते.माणसाची साधी व्याख्या आहे...दुसरयाचा आत्मा न दुखवनं त्याला जाणनं म्हणजे माणुस....बस
हे जर आपण केलं तर परमेश्वराची ताकत नाही आपल्याला दुखी ठेवायची... शेवटी जैसे ज्याचे कर्म...हा माझा अनुभव आहे..
........नितेश पाटील......
३.९.२०१५
No comments:
Post a Comment