प्रतापगड मशालमहोत्सव शुक्रवार दि.१६.१०.१५
खरं सांगायच तर श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने, त्यांच्या पराक्रमाणे पावन झालेल्या गड किल्ल्यांवर फिरणे हे कुठल्याही तिर्थक्षेत्रापेक्षा माझ्यासाठी जास्तच .त्याच्या सानिध्यात गेल्यावर जर महाराजांचा ईतिहास तुम्हाला माहीत असेल ( नसेल तर महाराष्ट्रात जगणं सोडुन द्यावं ) तर अंगावर रोमांच( हातावरचा केस न केस त्या परमेश्वरास नमन करण्यासाठी ऊभा राहतो ) उभं राहील्या शिवाय राहणार नाही.महाराजांचा ईतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचे पराक्रम, त्यांच शासन… त्यांच्यासाठी, स्वराज्यासाठी वेळी मरणास तत्पर असणारे निस्वार्थी एकनिष्ठ १००स१ असे या मातीशी प्रामाणिक असणारे कैक मावळे, त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य , हे स्वराज्य व्हावे हि त्या काळी श्री ची ईच्छा होती. आणि त्यासाठी आपले सर्वस्व स्वराज्यासाठी अर्पण करणारा मंत्रमुग्ध होणारा समाज होता.आताही असेल पण फरक आहे आता श्रीला जान्हवीच्या मागे लावलयं.ते पाहण्यात समाज ईतका गुंग झालाय कि श्री ला ही काहिहि म्हणु लागले.समाज ईतका अधोगतीला का चालला हे कदाचीत मला सांगता येणार नाही .सण सोहळ्यांची दुर्दशा करुन टाकली.त्याला अपवाद असतात हे पारंपारीक, सांस्कृतीक,देदिप्यमान सोहळे.
सण सोहळे
सण सोहळ्यांची का झाली दशा
कोणी केली त्यांची दुर्दशा...
प्रतिष्ठा मिरवणारी पिढी
राजकारण करणारी समाजप्रवृत्ती
असेल काही प्रमाणात मी ही...
सण म्हणजे करमणुक नाही
सण म्हणजे खेळ नाही
तुझा मोठा की माझा मोठा
तो काही घर बंगला नाही
आपापसात तु झगडत राहिला
चंगळवादि समाज वाढू लागला
का विसरला माणूस सणांचा
शुद्ध, सात्विक हेतू , मतितार्थ...
सज्जन समाज शोकात राहीला
दुर्जन समाज जोमात वाढला
जाण ती संस्कृतीची का धरु नये
स्पर्धेपायी पिढी ऊगा नासवू नये
अमुल्य अपुल्या सण, ऊत्सव, परंपरा
प्रतापगडाचा संक्षिप्त ईतिहास ……
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम झाले.निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा यामागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युध्द झाले. अफझलखान वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.
महाराष्ट्र भूषण " शिवचरित्राचे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (बळवंत मोरेश्वर पुरंदरे)
नतमस्तक मी तया चरणी उदात्त उदार ते पुरंदरेनितेश पटील २०.८.१५
समाज निच्छीतच जागृत असतो. कुणालातरी पुढाकार घ्यावा लागतो. पण तो पुठाकार घेत असताना मी पणाची जाणीव त्याच्या ह्रुदयात वास करता कामा नये.ती नव्हती अन् कधी राहणारही नाही जो महाराजांचा होईल तो तो जणतेचा निच्छितच होईल यात तिळमात्र शंका नाही.ते बिजच ईतकं कर्मप्रधान आहे की ते कुठेही उगवल्याशिवाय राहू शकत नाही. जे काही आहे ते आपलं तुम्हा आम्हा सर्वांच आहे.महाराजांचे गुणगाण आज सर्वच गातात पण त्यांचा आदर्श मात्र कुणी घेत नाहीत(८०%).हिच खरी शोकांतीका आहे.आमच्या बरोबर शिवप्रेमी येण्याच कारण म्हणजे महाराजांप्रती असलेली आस्था,प्रेम…आणि हो आमच्यात मी कोण असा कुणीच नाही खरतर हे सागांयची गरजच नाहीये. सारेच शिवप्रेमी महिला, पुरुष, युवक, युवती, त्याच बरोबर रीदान, श्लोक, आर्या,जीया हि तर पाच वर्षा आतील चिल्ली पिल्ली पण पुढची पिढी.....ते घडवन्याचं कार्य तुम्हा आम्हा सर्वानाच करणे आहे शेवटी ती तुमचं अणुकरण करुनच घडत असतात. जे पेराल तेच उगवत असतं... जीजाऊंनी शिवराय घडवले ते कलर टिव्ही पाहून नाही. माफ करा पण पुर्वि बाई गरोदर असताना शुरांची चरीत्र,ग्रंथ,वांगमय वाचीत होत्या. मुलांनवर संस्कार हे जीतके समाजात घडत असतात त्याच्याहुन अधीक आईच्या उदरात घडत असतात हे माझं ठाम मत आहे नव्हे तो माझा अनुभव आहे...आता बाईला टिव्ही सुटत नाही.आणि त्यात बाहेरच्या समाजात तमोगुणी, चंगळवादि माणसांची संख्या वाढली परीणामी प्रोडक्शन खराब.कुठल्याही समुहाबरोबर पहिल्यांदाच जात असाल आणि परतेपर्यंत जर अलीप्त राहत असाल तर कुठेतरी मी या शब्दाने जन्म घेतलाय हे निच्छित.. त्याचं तुम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.कसं आहे ना आंब्याच झाड सर्वाणांच माहीत आहे त्याला मोहोर येतो बहर येतो आंबे येतात सारं काही मजेत चाललेल असतं अचानक काही दिवसांनी त्या झाडावर दुसरं एक झाड दिसू लागतं. ते हि सुंदर साजेसं.त्यालाही फळं येतात ती आपण खातो.लहान जरी असली तीतकीच मधुर असतात ती.पण हळु हळु ते झाडावर आलेलं, मातीशी न जुळलेलं झाड आपलं वर्चस्व प्रस्तापीत करतं आणि पाहता पाहता आंब्याच्या झाडाच रुपांतर एका वेगळ्याच झाडात झालेलं असतं.कालांतराने त्याची मुळं जमीनीत नसल्या कारणाने तेही उद्वस्त होतं.तो स्वत्ःही शेष झाला आणि आंब्यालाही शेष केलं.आमच्या ईथे त्या झाडाला बटांगली अश्या नावाने संबोधतात. तात्पर्य काय तर कुणिही आपल्यावर वर्षस्व करता कामा नये परीणामी आपणही जाणार अन् तोही तुम्ही कृतज्ञशील असावं पण समेरचा निष्ठावान असेल तर ….महाराजांपाशी निष्ठावंत माणसं होती त्याला महत्वाचं कारण म्हणजे महाराज कृतज्ञशील होते,स्वतःसाठी ते जगलेच नाहीत जे काही ते सारं स्वराज्यासाठी… ईतिहास नव्याने सांगायची गरज नाही…..
मोहिते यांची तलवार ही दृष्टिस पडते.त्या मंदिराचा कळस आजही सव्वा किलो सोन्यानी त्याच थाटात नटलेला आहे. दर्शन घेऊन आम्हास जीतू आणि सुदेशने आप्पांची ओळख करुन दिली. प्रतापगडावरील सोहळा त्यांच्या देखरेखे खालीच होतो
नेहमी प्रमाणे प्रतापगड स्वराज्य ढोलपथक मंदिराबाहेरील प्रांगणात सुर धरु लागला.तुतारी,ढोल
ताशांचा आवाज गगणाला भिडू लागला.अंगा अंगात रोमांच प्रस्थापीत होऊ लागलं…!! चैतन्य ऊसळू लागलं…!!
खासे पंचवीस मावळे पायरयांच्या दुतर्फा उभे राहून मशाली पेटवल्या गेल्या. त्यात आम्हिच १६ जण होतो हि आमच्यासाठी भाग्याची गोष्ट
होती.पेटत्या माशाली घेऊन आम्ही शिवप्रताप बुरुजाकडे धावले. सुरवातीला तोफेच्या गगणभेदि आवाजाने अवघा प्रतापगड परीसर दुमदुमून गेला ढोल ताशांनीही त्या अविस्मरणीय क्षणाचा साक्षी होण्यासाठी सर्वोच्च शिखर गाठलं . शिवप्रताप बुरुज ते भवानीमाता मंदिर या संपूर्ण तटबंदीला मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. सुरुवातीला त्यानंतर

“जय भवानी जय शिवराय”…..!!“हर हर महादेव”….!!
” प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक , कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज, हिंदूपदपादशाह श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय “….!!!
या जयघोषाने गडकोट आसमंत दणाणून गेला. शिवप्रताप बुरजावरून यंदा प्रथमच भव्य प्रमाणात फटाक्याची अताषबाजीने आसमंती अग्णि नृत्य गजबजु लागलं.खाली खानाच्या कबरेतील मातीलाही घाम फुटावा असा देदिप्यमान सोहळा साजरा होत असताना फक्त साक्षीदारच नव्हे तर मशाल प्रज्वलीत करण्याचे अताषबाजी करणयाचे आम्हास भाग्य मिळाले.पुण्हा वर येउन अंगातील शिवसंचार ठोल ताशाच्या गजरात थीरकण्यास प्रोत्साहीत करत होता…
तदनंतर वेळ होती प्रसाद वाटण्याची. आई भवानीचा प्रसाद ( जेवण ) प्रत्येक भक्तापर्यंत आवडीनं गोडीनं पोहचवण्याच काम आम्हीही आवडीने करत होतो.शिवभक्ताचा उत्साह प्रत्येकाच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता.गतवर्षीपेक्षा यंदा शिवभक्तांची संख्या बरयाच प्रमाणात वाढली होती.पुढेही वाढत राहील शंका नाही…ज्याने एकदा का सोहळा पाहिला तर त्याला पुन्हा त्याचा मोह आवरता येणार नाही हे निच्छित….गर्दि जशी ओसरु लागली तसा आम्हीही प्रसाद भक्षण करण्यास मंदिराच्या प्रांगणात जेवण घेउन बसलो. जीतु,अमोल,सुदेश,अंकुरआणि मी…बाकीच्यांच आधीच आटोपलं होतं आमचं संपेस्तोवर आनंद दादाही येउन आमच्यापाशी जेवणासाठी बसले…
आई भवानीची महाआरती नंतर गोंधळाला सुरवात होणार होती.तत्पुर्वी सांगली येथील कलाकारांनी हलगी वाद्याचे सादरीकरण केले.
एक नवीनच कला पाहण्यास मीळाली त्यानंतर छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला.त्यात ईतर
शिवप्रेमींबरोबर स्वास्तिक आणि धनसारकर समुहानी नवरात्रउत्सवात केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता चिन्ह देण्यात आलं ते सर्वांच्या वतीने जीतुने स्विकारलं.आपण काहीही समाजासाठी केल्याची समाजाकडून पावती मीळत असते.त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय स्वराज्याच्या प्रतापगडावरुन आला.असो…आपण आपलच कौतुक करणे म्हणजे अधोगतीला जाणं हा माझा सिधांत्त अाहे
गोंधळाला सुरवात झाली आणि पुन्हा अंगात एक वेगळच चैतन्य सळसळू लागलं..हे अनुभवावं लागतं …त्याचं शब्दात वर्णन मला जमतय की नाही ते ही मी सांगु शकत नाही..पण एका वेगळ्याच विश्वात आपण दंग झालेलो असतो.शिवकालीन जगाचा आभास कुठेतरी हावी झालेला असतो.आई अंबेचा गोंधळ हातात पेटत्या मशाली…मंत्रमुग्ध झालेला आई भवाणीचा प्रांगण.त्या प्रांगणात शिवप्रेमींची ओसंडून वाहणारी गर्दि…संबळाच्या ताळावर फीरकणारे पाय, आधुनीक युगाची जोड म्हणाल तर तो क्षण टिपण्यासाठी डोकावणारया मोबाईलरुपी नजरा….त्याचाही मनसोक्त आस्वाद घेउन परतीचा मार्ग धरला सकाळी महाबळेश्वरच्या निसर्गसानिध्यात जाण्याचे ठरले होते…पाय परतीच्या दिशेने निघन्यास ऊत्सुक नव्हते पण पर्याय नव्हता.
अशीच कृपा आम्हावर सदैव रहावी हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना….
शब्दात वर्णन करणं अशक्यच…खरं म्हणायचं झालं तर मला शब्द अपुरे पडतायेत किव्हा सुचत नाहीयेत म्हणा…
जय शिवराय …..






































