खारीचा वाटा
काळ बदलतोय, वेळ बदलतेय
जागृत होतोय, माणसातला माणूस
पुन्हा त्याच ओघाने, माणुसकीच्या दिशेने
अंधार पुसत चालला, स्वयंप्रकाशी माणूस...
...नित
प्रत्येक माणसात माणूस दडलेला आहे. सध्या बहुतांशी माणसं स्वतःमध्ये गुंतल्यामुळे त्यांना त्याच भान राहिलेलं नाही. पण मीपणा सोडून जगणारीही माणसं भरपूर आहेत. जे स्वतःबरोबर इतरांचाही विचार करतात, वेळीस आपलं सर्वस्व झोकून देतात.... त्यात निदान आपला खारीचा वाटा तरी असायला हवा. शेवटी कितीही ऐश्वर्य कमावलं तरी ते इथेच राहणार. सोबत नेता येणार नाही आणि परतूनही कोणी येत नाही.
आजची परिस्तिथी जरा वेगळीच दिसते. पूर्वी माणसं जगण्यासाठी कमवायची, आता कमावण्यासाठी जगतात. माणूस आजकाल आपल्या मिळकती पेक्षा जास्त खर्च करतो. त्यामुळे तो त्याच्याच दुनियेत मशगुल असतो. दुसऱ्याच हित-अहीत, सुख-दुःख जरी जाणत असला तरी परिस्तिथी पुढे त्याला काही जमत नाही. पण त्यातूनही समाजहितासाठी आपण काहीतरी करावं हि भावना जोपासणारीही माणसं आहेत. स्वतःसाठी तर सारेच जगतात थोडंस का होईना इतरांसाठी जगून पहावं. आपलाही हातभार सत्कर्मासाठी खारीच्या वाट्याइतका तरी लागावा. जेणेकरून माणसांच्या पंगतीत आपल्याला बसता येईल. असो....
तर खारीचा वाटा म्हणजे नेमके काय? रामायणात खारीची कथा आपण वाचतो. सेतू पूल बांधत असताना दगड उचलू न शकणारी खार मातीत लोळून अंगाला माखलेली माती पुलाजवळ आणून टाकत असते व आपल्या क्षमतेनुसार श्रमदान करत असते. तिचे श्रम पाहून भारावून गेलेले श्रीराम आपली तीन बोटे तिच्या पाठीवर फिरवतात. ती बोटे आजही आपण खारीच्या पाठीवर पाहतो. सद्गुरूंचा कृपाहस्त आणि त्यांनी दिलेली कौतुकाची थाप अशीच कायम पाठीवर राहते. फक्त आपण प्रयास करायला हवे.
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)

No comments:
Post a Comment