शिवा डेकोरेशन
#शिवा_डेकोरेशन_ग्रुप_धनसार_पालघर
प्रो. शिवनाथ घरत
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यामागची लोकमान्य टिळकांची भूमिका तेव्हा त्या परिस्तिथीला रास्त होती. आज बाप्पाची होणारी विटंबना पाहून मन खिन्न होते. त्यातूनच काही मंडळे सुशोभीकरण, विविध स्पर्धा, चलचित्र सजावट करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. शिवा डेकोरेशन ग्रुप धनसार गत वीस वर्षापासून, आणि त्या समूहात मी गत पंधरा वर्षापासून अखंडित दरवर्षी दोन महिन्याच्या अथक परिश्रमातून आठ ते दहा ठिकाणी चलचित्र सजावट साकार करून गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने समाजास एक सुसंदेश देण्याचा प्रयत्न करत असतो.(समूह महत्वाचा)
त्यातूनच आम्ही साकारलेले चलचित्र १
#संत_तुकाराम
संत तुकोबारायांचे जीवन म्हणजे सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही ते व्यक्त करणारे. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो. संत कुणालाही होता येत नाही. त्यासाठी जगाने दिलेला विषाचा प्याला हसतमुख प्राशन करावा लागतो. त्यातून येणारी गरळ सुद्धा समाजहिताची, इश्वरनिष्ठ असणे गरजेचे आहे. आणि तुकोबा म्हणजे संतश्रेष्ठ.
‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।
संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।
तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।
महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।
ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।
सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।
शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।
आणि त्यांचा हाच मानवतावाद सत्ताधाऱ्यांच्या वचनी पडणे अवघड होते, म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या ननेतृत्वाखाली तुकोबारायांना त्यांच्या अभंगाच्या गाथा नदीत बुडविण्याची आज्ञा झाली. पण तुकोबांचे अभंग म्हणजे ज्याचा भंग होत नाही असे अविनाशी तत्व. वाणी म्हणजे सरस्वती, हि विद्या व ज्ञानाची देवता. आणि ज्ञान हे कधीच नष्ट होत नाही, म्हणूनच इंद्रायणीने तुकाराम महाराजांची अभंग गाथा तेरा दिवसात जशी च्या तशी तुकोबांना सुपूर्द केली. तेच दृश्य चलचित्राच्या माध्यमातून साकारले आहे.
जो होई विठ्ठलाचा, तोचि होय विठ्ठल
पाचवा वेद, अभंगवाणी तुकीयाची
भागवत धर्माचा तो कळस
...नित
नितेश पाटील ( धनसार,पालघर)
No comments:
Post a Comment