Thursday, August 20, 2015

"महाराष्ट्र भूषण " बाबासाहेब पुरंदरे

"महाराष्ट्र भूषण " शिवचरित्राचे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (बळवंत मोरेश्वर पुरंदरे)

व्यंगचित्र : - राहुल सावे, माहीम पालघर

बाबासाहेब पुरंदरे........

मी काय वर्णावे त्यांसी साहित्यिकांचा सन्मान पुरंदरे

शिवनेरीच्या शिवरायांनी झपाटले ते पुरंदरे

भक्तिमार्गावर ज्ञानदीपचा प्रकाश  ते पुरंदरे

ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेले ते पुरंदरे

इतिहासातुन राष्ट्राचे शील शोधले ते पुरंदरे

शिवचरित्र एकमेव जीवितधेय्य साकारले ते पुरंदरे

शिवचरित्र लिहताना अखंड सावधान ते पुरंदरे

भूतकाळाचा अर्थ समजून इतिहास सांगणारे ते पुरंदरे

अंतकरणात कवी मोहरबंध गोंडेदार ते पुरंदरे

इतिहास संशोधन हे शास्त्र त्यांसी ते पुरंदरे

अंगाअंगावर रोमांच स्थापित करावे ते पुरंदरे

शिवसाक्ष पत्रासाठी प्रलयपाउस सहनारे ते पुरंदरे

भाषेच्या अंगातून अलगद ओसंडून जाणारे ते पुरंदरे

तपशीलांवर पकड़ ती भलतीच कडक ते पुरंदरे

शिवचरित्र आठवित पावले शोधत फिरले ते पुरंदरे

कालवस्त्रा दूर सारुन इतिहास दर्शन घडवणारे पुरंदरे

दिले आयुष्य मिळवले शिवचरित्र धन ते पुरंदरे

लोकशाहिला अत्यंत पोषक भूमिका देणारे पुरंदरे

किती निराशा,किती अपमान तरी न डगमगले ते पुरंदरे

अखेर महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मानित झाले ते बाबासाहेब पुरंदरे...

नतमस्तक मी तया चरणी उदात्त उदार ते पुरंदरे

नितेश पाटिल
GOOGLE nitesh patil715
20.08.2015


Saturday, August 15, 2015

स्वतंत्र दिन के अवसर पर...

सस्नेह जय शिवराय

15/08/2015

स्वतंत्रता दिन के अवसर पर...
राष्ट्रप्रेम हमारा खिल खिल जाये.....
अभिमान स्वरुप पराक्रम विर शूरों का ...
शुरों को नमन,वंदन पुत्र भारत माते का...
परीकाष्ठा जो सहन की शूर विरोंने...
सहा नरकवास उन्ह महापुरूषोने...
उस बलीदान की किमत न जान पाए हम...
देशप्रेम दिखाने मे बस आगे रहे हम...
सालभर वादों का सिलसिला जारी रहा...
हर साल वही वादा कायम रहा...
आतंकवाद क्यो कोई भी आके कर रहा...
झुलस कर बिखरा आम आदमी क्यु मर रहा...
आतंकवादि को क्यो सालो साल पोस रहे हम..
अपने दर्द पे नमक और उन के मरहम लगा रहे हम...
ऊन सैतानो को जब फाँसी की सजा हुई...
अपने ही कुछ नमुनो नेे राष्ट्रपतीसे गुहार लगाई
ऊन महापुरषोंने देश स्वतंत्र किया....
ईन भ्रष्ट, क्रुर लोगोंने वो मातीमोल किया....
वे शान से जीये राष्ट्र के लिये..
भ्रष्ट लालची मे जि रहे पैसो के लिये..
हम संसार मे जी रहे प्रपंच के लिये..
और स्वतंत्र दिन केवल दिखाने के लिये..
हम सबको सोचना होगा....
खुदके साथही दुसरो के लिये जीना होगा...
15 अगस्त के अवसर पर उन शूरों को ये तोहफा देना होगा...

GOOGLE niteshpatil715
नितेश पाटील

Friday, August 14, 2015

स्वातंत्र टिकवल पाहिजे...

सस्नेह जय शिवराय....                                                              १४/८/२०१५
१५ आॅगष्ट                                                    -----------------------नित
हा आपला स्वातंत्र दिवस आहे हे विसरता येणार नाही. कारण ते स्वातंत्र मिळवण्यासाठी कैकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, नरक यातना भोगल्या. ते सर्व श्रुत आहेस, तो ईतीहास नव्याने सांगायची गरज नाही. कारण बहुतांशी लोकं आणि त्यात आपण निवडुन दिलेले आणि आपल्याच ऊरावर बसलेले राजकारणी महापुरषांच फक्त कौतुक करण्यात धन्यता मानतात. ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केल तेव्हा आपला देश स्वातंत्र झाला. महापुरषांचे थोरवे गाता गाता ह्यांना घाम सुटतो. Ac मधे राहणारी माणसं ही, ह्याना चटक्याची जान ती कुठली. पण अरे बाबानो आज देश अधोगतीला चालला आहे, तिथे तुम्ही लक्ष देणार की नाही ? आज कोणत्या क्षेत्रात भ्रष्टाचार नाही...?

आज ह्या देशात नक्की सुरक्षा कुणाची आहे ? सामान्य माणसाची ? तर मुळीच नाही..!! सुरक्षा फक्त ह्या राजकारणी आणि श्रीमंत लोकांची. ह्यांना झेडप्लस सुरक्षा आणि आपल्या देशातील बहुतांशी जनतेला झेडप्लस ह्या शब्दाचा अर्थच माहीत नाही, काहीना तर झेडही समजत नाही. सारा पोलीसांचा फौजफाटा ह्यांच्या मागे. मला हे कळत नाही की ह्या लोकाना ईतक्या सिक्युरीटीची गरज काय असते ?  ते पोलीसही विचार करत असतील, अरे देशाप्रती असलेल्या निष्ठेपायी ह्या खात्यात आलो आणि ह्यांची सेवा करावी लागते... राजकारणी लोकांना दोष देण्याची अनेक कारणे आहेत. आता हेच घ्या देशात अतीरेकी कारवाया झाल्या की मग सुरक्षा बळकट करायची. आधीच हे अतीरेकी सुरक्षारक्षकानी प्राण पणाला लावुन आपले सहकारी गमावुन पकडायचे. आमच्या कायद्याने त्याना वर्षानुवर्षे सांभाळत बसायचं. विषेश म्हणजे आपली लोकंही तितकीच विचित्र. अाता अतीरेकी म्हटल्यावर मग तो कुठलाही असो अण् कोणत्याही देशातला असो. त्याच्याप्रती लोकं इतकी सहनभुती का दाखवतात तेच मला कळत नाही. आताच ताजंच ऊदाहरण घ्या त्या याकुबच.त्याला फाशीची शिक्षा झाली तर आपल्या देशातील राजकारणी, प्रतीष्ठीत, श्रीमंत लोकांना त्याचा पुळका का यावा ? हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. यांनी अकलेचे तारे तोडत राष्ट्रपतींकडे खैरात मागतात, तुम्हाला लाजा कशा वाटत नाही. कधी त्यांनी घडविलेल्या स्फोटात निरअपराध लोकांचा गेलेला बळी आणि त्या कारणे त्यांच्या कुटुंबियाना ज्या यातना भोगाव्या लागल्या त्यात तुम्ही कीती सहभागी झालात.? खरं तर ह्या प्रकरणावरुन ह्यांचे काही त्या आतंवाद्याशी  लागेबांधे तर नाहीत ना,?  ही मनात पाल चुकचूकते. कायदा सुव्यवस्था बदलण्याची गरज आहे. मि (मि म्हणुन काही ऊपयोग नाही म्हणा)तर म्हणेन ह्यासाठी शुट अॅट साईट चा निर्णय पाहीजे. हि असली आतंगवादि औलाद पोसायसीच कशाला ?
अरे स्वातंत्र मिळविन्या साठी कीती खस्ता खाल्या त्या विरांनी, आणि आम्ही काय करतोय ....?
स्वातंत्र दिन येता जवळी..
राष्ट्रप्रेम ते ऊफाळुन येई....
गोडवे गाती जन शुर विरांचे..
शुरां तव वंदन ,नमन, श्रध्दांजली....
सोसल्या यातना ज्या शुरविरांनी..
भोगीलेे नरकवास तयांनी राष्ट्रापायी....
आपणा कळले का तयांचे बलीदान..
दाखविन्या जनांस पर वंदन खास....
वर्षभर नुसता घोषनांचा भाडीमार..
वर्षाअखेर मात्र परवड ,सुकाळ.....
कुणिही यावे दंगली,बाॅमस्फोट करावे..?
सामान्य जणतेने रक्त,थारेळ्यात पडावे....
आम्ही तया वर्षानुवर्षे ईमाने पोसावे..?
आमच्याच वकीलाने त्यांच्या बाजुने लढावे....?
परमेश्वर कृपेने पिढीत जणतेस न्याय मिळाला..
पण प्रतिष्ठीत लोकांना त्यांचा पुळका आला....
थोर महापुरषांनी स्वातंत्र मिळवुन दिलं..
या भ्रष्ट, क्रुर लोकांनी ते धुळीस मिळवलं....
ते जगले राष्ट्रासाठी..
भ्रष्ट जगतात रुपयांसाठी..
आपण जगतो प्रपंचासाठी...
स्वातंत्रदिन फक्त दाखवण्यासाठी....
तुम्हा आम्हा सर्वांस विचार करणे आहे..
स्वःतासाठी न जगता ईतरांसाठी जगणे आहे...
हिच श्रध्दांजली त्या शुरांस आहे....
हिच श्रध्दांजली त्या शुरांस आहे....
...नित
आपण आपला दृष्टीकोण बदलला पाहीजे.
६८ वर्षे होत आली तरीही परीस्थीती बदललेली नाहीये, आणखीन बिकट झाली आहे. हि राजकारणी लोकं भाषनात म्हणतात तरुण पिढी बिघडली म्हणुन पण, त्याना बिघडवनारे कोण ? तर हे राजकारणी आणि श्रीमंत लोकं. यांच्या लग्न कार्यात, मतदानावेळेस फक्त आणि फक्त पार्टी .नळ्या नुळ्या आणि दारुचा महापुरच का तर आपण कमावलेली संपत्ती लोकाना दिसली पाहीजे आणि आपल्या मागे लोकांचा गोतावळा वाढावा म्हणुन... हिच त्यामागची भावना असते बाकी मला नाही वाटत दुसरा काही ऊद्देश असेल. आता तर लग्नात एक नविन फॅशन निघालय. भर मांडवात खास दारुसाठी एक रुम तयार करतात. आपल्याजवळ रुपया आहे, तो तुम्ही खर्च करा, दाखवा. त्यात काही वावगं नाहीये.  पण तो कश्या प्रकारे करावा त्याचं तारतम्य हवं की नको. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय संस्कार देत आहोत हे आपल्याला कळु नये. आज आपण आपल्या समाजात बघाल तर ग्रज्वेट मुलं वनवन नोकरीसाठी भटकतात. पण नोकरी नाही. २० वर्षाची मुलं व्यसनानं मरतात, आणि ७० वर्षाचा म्हातारा त्याला खांदा देतो. हि परीस्थीती कुणी निर्माण केली याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कशी सुधारणार पिढी ? पुर्वी मतदानासाठी ५०ते१०० रुपये दिले की मतांची भिक मागणारा पुठारी अमक्या निशाणीवर दे तमक्या निशाणिवर दे असं सांगुन मतदान मागत असे.
आता आकडा वाडला आहे आणि नळ्या नुळ्या, दारू पाजुन हे लोकांच्या डोक्यावर बसले आणी समाज खलास करुन टाकला. त्याना राष्ट्रप्रेम कुठुन दिसनार..? काहींचा अपवाद असेलही.

आणि लोकानाही अकली नाहीत हो...!
मतदान आलं की, सारं घबाड त्या पक्षावाल्यांच्या मागे.
लोकांना अद्याप दान ह्या शब्दाचा अर्थच माहीत नाहीये. मत दान आहे ते..... बोलु नये पण बोलतेच असं नळ्या नुळ्या खावुन, दारू पिवुन, अक्कल गहान ठेऊन कुठलही दान  केलं तर त्याचा मोबदला तो काय मिळनार. ह्या लोकांनी स्वातंत्र तर बाजुला राहुद्या पण सर्व व्याख्या बदलुन टाकल्या.

आज धर्माची व्याख्या काय ?
समाजातील सर्व स्तरातील प्राणीमात्रांना धरुन ठेवणे. म्हणजेच सामाजीक कार्याची पावती  (आणि आज एकमेकात तेढ निर्माण करुन ? ) मिळते.....?

आज धनाची व्याख्या काय  ?
संयमीत/ समाधानी जीवनासाठी जेवढे आवश्यक तेवढे (धरण फुटोस्तोवर ?) धनार्जन करणे.
म्हणजेच श्रीमंती ......?

आज कर्माची व्याख्या काय ?  :-
मर्यादीत इच्छा आकांक्षा ( ईतरांच्या टांगणीवर ? ) ठेवणे.
म्हणजे कर्म.....?

आणि ईतराना दोष देन्यात तरी काय अर्थ आहे आपण स्वःता आधी बदल केला पाहीजे. स्वःतासाठी जगत असताना समाजाचाही विचार करायला पाहीजे. काहीका असेना योगदान दिल पाहिजे आणि भावना रुजवली पाहिजे. काल परवाच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच ऊदाहरन घेऊन बघुया काय जमतय का.  जे विर भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी शहिद झाले ,त्यानी जे स्वतंत्र भारताच स्वप्न पाहिलं आणि ज्या विरानी ते आपल्या खांद्यावर लिलया पेलुन स्वातंत्र मिळवलं ते आपण ईतक्या वर्षांची शुरविर साधुसंतांची परंपरा असुनही टिकवु शकत नसाल तर मग काय अर्थ आहे. आणि परीस्थीती जर अशीच राहीली तर कसं होणार..... आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय वाढुन ठेवतो आहोत ह्याचा विचार करायला पाहीजे आपण लाख संपत्ती आपल्या मुलांसाठी कमावुन ठेवु पण जर समाज खराब असेल तर तो जगनार कसा हा चिंतनाचा विषय आहे.
                                                          niteshpatil715
नितेश पाटील

Sunday, August 9, 2015

|| जय शिवराय ||: अलविदा मिसाईल मैन....

|| जय शिवराय ||: अलविदा मिसाईल मैन....: सस्नेह जय शिवराय कलाम साहेब आणि आषाढी एकादशी भारतरत्न डॉ.ए.पि.जे.अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती महान वैज्ञानिक,सकारात्मक उर्जचे स्त्रोत व आ...

Friday, July 31, 2015

गुरुपौर्णिमा गुरु - देव

सस्नेह जय शिवराय                                   ३१.७.२०१५ निज आषाढ पौर्णिमा

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

आताच्या ह्या कलयुगात कुणाला गुरु मानाव हेच कळेनास झालय.जो तो स्वःताच्या स्वार्थासाठी काहीही करायला बसलाय.आई बाबा आणि संत सोडुन तुमचं भलं होईल अस जगाच्या पाठीवर कुणालाही वाटत नाही आणि वाटनारही नाही.म्हणुन ह्या आताच्या गचपणावर माझा तरी विश्वास नाहीये
संतसंग सर्व काळ ! अखंड प्रेमाचा कल्लोळ....
.....श्री.तुकोबाराय
गुरु आपल्याला देव जवळ करण्याचा मार्ग दाखवत असतात.अर्थात जगण्याचा... आणि आपण आपल्याला सुख, शांती, समाधान मिळावं ह्यासाठी देवाला विनवित असतो. ह्या जगात सुःखी,शांती,आणि समाधानी असा कुणीच सापडनार नाही म्हणजेच परमेश्वर सापडनार नाही हे जरी खरं असलं तरी ह्या तिन्ही गोष्टींची आस सोडली तर परमेश्वर प्राप्ती निच्छीत होईल.असा आपला ईतीहास सांगतो.साधु संतानी थोर महापुरषानी विषय सुःख सोडलं म्हणुन आज त्याच्या बाबतीत ऊत्तमची ऊरे.थोर साधुसंताच्या महापुरषांच्या जिवनचरीत्रावर लक्ष टाकल तर आपल्या लक्षात येईल.आणि आपलं समाधान ते कशात तर बहुतांशी आपल्यापुर्ती मर्यादित.आणि परमेश्वराच्या समाधानासाठी म्हणा का आपल्या सुःखासाठी म्हणा...
लोकं म्हणतात की, आंम्ही श्रावणात नेहमी नवनाथ  लावतो, ज्ञानेश्वरी वाचतो, भागवत वाचतो.
तरीही लोकांच्या मनात मानवता का निर्माण होत नाही हो....
याचं उत्तर हे आहे की.....
लोकं फक्त वाचतात, फक्त प्रक्रीया पुर्ण करतात. वाचणाचे चिंतन आणि मनन लोकं करत नाहीत......म्हणूनच आपली ही आज दुर्दशा झालेली आहे.. आणि देव काय अंधारात काळा गाॅगल लावुन बसलेला नाहीये तर त्याला काही दिसनार नाही.माणसाने विषयाची वासना सोडुन देऊन जे आहे त्यात समाधानी राहीलं पाहीजे तरच त्याला गुरुचे विचार पटु शकतात आणि परमेश्वर प्राप्ती ...जाऊद्या
असो
जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण । गुरुसी आले अपाऽऽरपण । अवघे विश्व गुरु दिसे ।
संत एकनाथांनी असं म्हटलय नि खरच आहे ते !
म्हणूनच माता-पिता-बंधु-भगिनी-शिक्षक-मित्र-मैत्रिणी-स्नेही-सखे-सोबती-आप्तेष्ट-गणगोत-देव-ऋषि-संत ईत्यादि सर्व मी सद्गुरु मानतो.
म्हणूनच गुरुपौर्णिमेनिमीत्त आपणासर्वांस सस्नेहे, सानंद, सिदर शिरसाष्टांग नमस्कार.
कधी, काही चुकलं माकलं तर या मूढ माणसाला सांभाळून घ्या....
.
                                                                     नितेश पाटील

Tuesday, July 28, 2015

अलविदा मिसाईल मैन....

सस्नेह जय शिवराय
कलाम साहेब आणि आषाढी एकादशी
भारतरत्न डॉ.ए.पि.जे.अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती महान वैज्ञानिक,सकारात्मक उर्जचे स्त्रोत व आजच्या पिढीला प्रेरणा देणारे महान नायक हरपले, त्यांचं आज दि.२७.७.२०१५ शिलाँगच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते.शिलाँग इथं आयआयएमच्या कार्यक्रमादरम्यान दरम्यान ते मंचावरच कोसळले, त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.खर तर त्यांचा परीचय देण्याची गरज नाहीये ते पुर्ण जगात नव्हे ब्रम्हांण्डातच म्हणावं लागेल मिसाईल मैन आणि त्याहीपेक्षा माणुस कसा असावा याचं सर्वोत्तम ऊदाहरण होते.
अल्प परिचय -डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडूत झाला. २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ दरम्यान हे भारताचे अकरावे राष्ट्रपती कार्यकाळ होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. अश्या स्मृतीस भावपुर्ण श्रद्धांजली....
त्यांचा मृत्यु  दि.२७.७.२०१५ आषाढी एकादशीला झाला हा योगायोगच म्हणावा लागेल. पण आपल्यात अशी मान्यता आहे की ऐकादशीला देवाघरी जानारे शिव होतात म्हनजे त्या पुण्यात्म्याचा प्रवास संपुन जिवशिव एक होतात. दुसरी म्हणजे एकादशीला अवकाश मार्ग मोकळा असतो
असे धर्मशास्त्र सांगते,मिसाइल मैन ने पण स्वतःच्या
final launch साठी एकादशी निवडली. आणि देवाजवळ गेले.
जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा।।
देवा सांगो सुखदुख। देव निवारिल भूक।।
घालू देवासीच भार। देव सुखाचा सागर।।
राहो जवळी देवापाशी। आता जडोनि पायांशी।।
तुका म्हणे आम्ही बाळें। या देवांची लडिवाळे।।

आषाढी एकादशीचं significance(प्रयोजन) म्हणजेच "देवशयनी एकादशी"अाणि चातुर्मास प्रारंभ  अाषाढ शु.प.११
देवशयनी एकादशी म्हणजे देव ज्या दिवशी शयन करतात, निजतात तो दिवस...आणि कार्तिकी एकादशीला "देवोत्थान एकादशी" म्हणतात, अर्थात देव उठतात तो दिवस..देवला ती कसली झोप पण आपली भोळ्याभाबड्या लोकांची समजुत का तर ह्या मधल्या चार महिन्यात शेती कामामुळे देवाला काही भेटता येणार नाही म्हणुन..
      पण परमेश्वरासाही वाटलं असावं का ? की आपल्यालाही एक नैकदिल, देशभक्त, मिसाईल मैन, आणि एका माणसाची (राजकारणात तशी माणसं कमी आणि भस्मासुर जास्त आहेत.) गरज आहे तर कलाम साहेबाना बोलवावं.
कसं आहे जे ऊपजे ते नासे,जे नासे ते पुःनरुपी दिसे...
जो आलाय तो जाणारच..आणि त्याला कोणीही अपवाद नाही.शेवटी ऊत्तमची ऊरे..आणि ते ह्या माणसाच्या आयुष्याकडे पाहील की आपसुकच कळत जाईल असं निर्भिड आणि सोज्वळ व्यक्तीमत्व.
आपल्याकडील हिंदु मुसलमान वाद अपरीचीत नाहीये,आणि ह्या माणसानी आपलं ऊभ आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केलं. आणि जनमाणसाच चटका लावुन हा पुण्यात्मा आषाढी एकादशीच्या पुण्यदिनी देवापाशी निघुन गेला...
तस पहायला गेल तर ज्याना न्यायला पाहीजे ते ( भ्रष्ट) अजून ईथेच आहेत आणी ज्यांची गरज ह्या मानवजातीस आहे अशाना भगवंत का बरं घेऊन जात असवा ?
त्या मृतात्म्यास मुठमाती मीळते की नाहीतोच ह्याचं राजकारण सुरु...
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामधे ह्याचं श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं राजकारणच समोर आलं.
अबु आझमी म्हणतायेत मुंबई कोस्टल रोडला कलाम यांचे नाव द्या. अरे खड्यात रस्ते आहेत ते सुधारा आधी नंतर महापुरषांची नावे रोडला द्या म्हणावं.आपणही मुडदाडासारखं ह्याना निवडुन द्याव आणि ह्यानी मजा मारुन आपल्यातच लावुन द्यावी.धर्माचा बाजार मांडुन जनतेला लुबाडनारी ही लोकं.
ह्या लोकाना कोण समजवनार माणुस धर्माने नाहीतर कर्माने मोठा होत असतो.आणि आपलही तसच आहे हो दोन दिवस शोक करायचा आणि लागायच आपल्या कामाला दुसरं काय ? 
असो...
 देशासाठी जीवन व्यतीत केलेल्या महापुरषाच्या आत्म्यास चीरशांती लाभो हि पांडुरंगचरणी प्रार्थना...
                                                            नितेश पाटील

Saturday, June 27, 2015

माझा पहीला परदेश प्रवास दुबई

सस्नेह जय शिवराय...
     
 सामान्य व्यक्तीने दुबई फिरायला जाणं म्हणजे भाग्यच म्हटले पाहीजे. पण मित्राच्या सहकार्याने आणि परमेश्वर कृपेने दुबई जाण्याचा योग आला.
एक ईच्छा होती की परदेशी जाऊन यायचं तिथली लोकं, तिथली वस्ती संस्कृती, तिथली न्याय व्यवस्था आणि आपली भारतीय व्यवस्था यात काय साम्य असतं ते अनुभ
              आणि पोहचलो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई...

बाॅंबेला मुंबई आणि मुंबईच्या विमानतळाला छत्रपति शिवाजी नाव देऊन महाराजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेउन बाळासाहेबांनी शिवभक्त असल्याची खरी ओळख दिली.. प्रत्येकाला छत्रपति शिवाजी हे नाव आदराने घ्यावच लागत..! नुसतं शिवाजी नाही..छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ!!!! आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा व प्रदर्शन व्हावे, अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच केलेली आहे.  मा. शिवसेनाप्रमुख तसेच मा.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्रीमती चित्रलेखा देशमुख (वास्तु रचनाकार), प्रसिद्ध चित्रकार मा.अविनाश सुतार व अन्य जाणकारांकडून आलेल्या सूचना अनुसरून छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळा व त्यांचा गौरवशाली इतिहास, ऐतिहासिक साहित्य, त्यांनी बांधलेले गडकिल्यांचे चित्ररुप भिंती शिल्पांतून साकार करावे अशी मागनी केली होती पण ते आतापर्यंत पुर्ण झालेलं नाहीये.

पाहता पाहता जाण्याचा दिवस ऊजाडला.पाहटे साडेतीन वाजता घरुन निघालो. विमानतळावर साडेपाचला पोहचन गरजेचं होतं.कारण फ्लाईट साडेआठचं होतं. विमाणात पहिल्यांदाच बसनार म्हणुन कमालीची ऊत्सुकता मला होती.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे नावच ईतकं दमदार की तिथे पोहचल्यावर भरुन आलं. आतमधे प्रवेश घेऊन जाणवलं की आधुनिक सुविधांचे जागतिक दर्जाचे टी २ टर्मिनल आणि त्याला महाराजांचं नाव.कीती अभिमानाची गोष्ट. पण ते कार्यान्वित झाल्याला आता वर्ष दिड वर्ष उलटले. टर्मिनलने अनेक पुरस्कार मिळविले. परंतु, नावात दिमाखाने महाराजांचे नाव असलेल्या विमानतळावर स्वतः महाराजांचे अस्तित्व मात्र अजूनही उपेक्षितच आहे. शिवरायांच्या अर्धपुतळ्यासह टी२च्या नव्या प्रवेशरस्त्यापाशी बांधण्यात येणारे दालन अजूनही पूर्ण नाही. विमानतळावर तर सात हजार कलावस्तूंमध्ये शिवरायांचे दर्शन नाही.
                         आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यामागची भूमिका परदेशातून महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवणार्‍या प्रत्येकाला हा महाराष्ट्र कोणाचा आहे याची जाण व्हावी व महाराजांना सलाम करूनच महाराष्ट्रात पाऊल टाकावे, ही होती. पण...........
हा पण फार महत्वाचा आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच....
           
जेंव्हा विमान उड्डान घेतं तेंव्हा एवढ मोठे धुड आकाशात कसं झेप घेत ह्याचे राहून राहून आश्चर्य वाटतं. उड्डानानंतर लगेच आपल्या ओळखिच्या जागा शोधून काढण्याचा खेळ खेळला जातो.
विमानाच्या खिडकीतून बाहेर बघणेही मी खूप एन्जोय केलं. जाताना खिडकीजवळ जागा नाही मिळाली पण येताना मात्र मीळाली होती. ढगांच्या मधून जाताना अजूनही मन ढग पकडून ठेवायचा प्रयत्न करते. कधीतरी दुरवर नुसता ढगांचा समुद्र असतो, निळ आकाश, ढग आणि आपण एवढच. नदीची वळण दिसतात. रात्रिच्या वेळी सुंदर तारका दिसतात. मिणमिणारे दिवे दिसतात.
    विमानातून उतरले की एक पासपोर्टवर शिक्का लागला की थेट गमन बग्गेज क्लेम कडे. तिकडेही बरेचवेळा तात्कळत रहावे लागते. बेल्ट वरून बॅग उचलण्याची धड्पड चालू असते. एकदा ती हातात आली की मग प्रवास संपला. प्रवास संपला की पुन्हा एक उदासिनता निर्माण होते.
             आणि पोहचलो दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ


दुबई ची ओळख म्हणजे  ग्लोबल शहर, प्रवासी शहर, उंच उंच इमारतींचे,  सोन्याचा धुर निघणारे शहर, बॉलीवूड लोकांचे आवडते शहर, अंडर-वल्ड लोकांचे शहरही असे ऐकिवात आहे.
गाडीतून फोटो घेतल्याने तेवढी सुस्पष्टता  नसावी. प्रत्येक इमारतीची रचना किती वेगळी आहे. पत्त्यातल्या गगनचुंबी  इमारतीच  जणू.  बिल्डींग  आर्की टेक्चर चे अदभुत नमुने.
विमानतळावरुन बाहेर निघालो आणि जसं कुणी गरम भट्टीपाशी आणुन सोडलय असं वाटलं. ४८° ते ५१° सेल्सीअस तापमान होतं ते परतेपर्यंत तसचं राहीलं. तसा सर्व प्रवास राहणं फीरणं AC तच झालं म्हणा. तिथे बस स्टॅाप पण AC च आहेत तुम्ही जीथे जाल तीथे AC.बाकी पर्यायच नाहीये.
संयुक्त अरब अमिराती (युनायटेड अरब एमिरेट्स).
दुबई हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब शहर ह्या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाच शहर आहे. दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. अबु धाबी व दुबई ह्या दोन अमिरातींना सर्वाधिक राजकीय महत्त्व असून देशाच्या विधिमंडळामध्ये त्यांना नकाराधिकार उपलब्ध आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील सर्वात मोठे शहर असलेल्या दुबईची लोकसंख्या २०१३ साली सुमारे २१ लाख होती. त्यामध्ये स्थानीक अमीराती वंशाचे १६ ते १७ % भारतीय ६० ते ६४ % बाकी ईतर .....
दुबई हे एक जागतिक शहर असून मध्य पूर्व व दक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र व वाहतूककेंद्र आहे.
      आजच्या घटकेला दुबई मध्यपूर्वेतील सर्वात महागडे तर जगातील २२व्या क्रमांकाचे महागडे शहर आहे. २०१४ साली दुबईमधील हॉटेलांचे भाडे जगात दुसऱ्या क्रमांकावर होते (जिनिव्हाखालोखाल). येथील राहणीमानाचा दर्जा उच्च प्रतीचा असून ते निवाससाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते आणि त्याचा प्रत्ययही आला. परंतु येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या दक्षिण आशियाई कामगार व मजूर वर्गाचे शोषण करून त्यांना अमानुष वागणूक दिल्याच्या वृत्तांमुळे दुबईवर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा देखील आरोप केला जातो. पण जोवर होतो तोवर तसं काही निदर्शनास आलं नाही.ते चार पाच दिवसात माहीत पडनं तितकं सोपही नाही म्हणा ..

जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे.

माझा पहीला विमानप्रवास तसा छानच होता. विमानतळावर मला जाणवणारा माझा सर्व उत्साह जेंव्हा मी विमानाच्या गेटपाशी पोचलो तेंव्हा निघून गेला. बोअर्डींगच्या आधी सर्व लोकं बाहेर बसली होती. आम्ही सोडले तर बाकी इतकी निरुत्साही, मरगळलेली लोकं मी आयुष्यात पहील्यांदीच पाहीली. फारच निराशाजनक वातावरण होत ते. एकही हायफाय, प्रसन्न चेहर्याचे व्यक्तीमत्व दिसत नव्हते. अश्या लोकांबरोबर दुबईत जाणं मला मानसीकदृषट्या परवडलच नसतं पण आमचा ३१ जणांचा ग्रुप होता.तो ही लय झकास म्हणुन काही वाटलं नाही.
डेजर्ट सफारी……… 


भर वाळवंटात मोठमोठ्या गाड्या उलटसुलट चालवणार…….तुम्ही ती महिंद्रा स्कॉर्पिओ ची जाहिरात पाहिलीये का ज्यात एक ललना वाळवंटात उभी असते आणि तिकडून वाळूवरून उड्या मारत स्कॉर्पिओ येते तोच हा प्रकार…..पण प्रत्यक्षात ती जाहिरात अतिशय सौम्य वाटावी अश्या जोरजोरात दणके बसतात……..आमच्या गाडीत बसलेले म्हणाले की गाडी पलटीही होते म्हणे आणि त्यात ड्रायवरने होकार मिळवला!!!” झालं माझी भिती वाढली पण काय करणार जवळच्या लवंगांच्या भरवश्यावर करू म्हटलं आपण वाळवंट पार, अर्थात उत्सुकता तर होतीच……..
मधे एका ठिकाणी गाड्या थांबल्या…..ईथे नेहेमी ग्रूप बुकिंग होते, एकाच वेळेस अनेक गाड्या निघतात, मग एकाने एका उंच टेकडीवरून उडी मारली की दुसरा आपली गाडी त्याच्याही वरच्या टेकाडावर नेतो. थांब्यावर गाड्यांच्या टायरमधली हवा काढण्यात आली .जास्त दणके बसायला नको म्हणे नानाची टांग’ म्हटलं तुमच्या . बसायचे तेव्हढे दणके बसलेच सगळ्यांना……..
एकदाचे आम्ही वाळवंटात अवतरलो……रेसकोर्स वरच्या घोड्यांसारख्या गाड्या लावल्या गेल्या……जोरजोरात गाणे लावले………आणि मग झाली ती धुमश्चक्री सुरू………गाडी सुरु झाल्यानंतर पहिल्या ५/१० मिनीटातच मी ओळखले आपले काही खरे नाही आज...पण नंतर हायसं वाटलं
तिथून पुढे होता डेजर्ट कँम्प……….तिथे रात्रीचे जेवण आणि बरोबरच्या पुरूष मंडळाचे मुख्य आकर्षण ’बेले डान्स’ होते…….गप्पा टप्पा, जेवण सुरु झाले आणि मग अवतरली ’नॅनी’ नावाची बेले डान्सर……. तिच्या थिरकणाऱ्या पावलावर ग्रूपमधल्या सर्वानाच उत्साह आला आणि अनेक जण नाचण्याची संधी साधून आले.विसरलोच किरीट सोमैया आणि त्यांच्या सौभाग्यवती ही होत्या तिथे तो आस्वाद घ्यायला....
एक अविश्वसनिय वास्तु...
बुर्ज खलिफा



ही जगातील सर्वात उंच इमारत दुबईमध्येच स्थित आहे. ही संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत आहे. एकूण 829.84 मी (2,723 फूट) इतकी उंची असणारी बुर्ज खलिफा ही आजच्या घडीला जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झाले व ४ जानेवारी २०१० रोजी तिचे उद्घाटन करण्यात आले. ह्या इमारतीत १६३ मजले आहेत. याच्या एकूण मजल्यांपैकी ३८ मजल्यांत हॉटेले व कार्यालये इत्यादी आहेत. प्रति सेकंद १० मीटर वेगाने जाणाऱ्या एकूण ५७ लिफ्ट यात आहेत, तर ८ शीघ्र गती एस्कलेटर आहेत. त्यामधे जाण्याचा अनुभव अविस्मरणिय होता.जगातील सर्वात वेगवान लीफ्ट. १२५ मजले आणि फक्त १ मिनिट आणि ४ सेंकंद. विश्वासच बसला नाही.पण आम्ही पोहचलो होतो. वर हवेचा दबाव ईतका होता की कान बंद झाले होते.तशी ईमारत ही हवेमधे थोडी हरकत करते हे जाणवलं. वरुन चहुबाजुनी पुर्ण दुबई दिसत होती रस्ते, ईमारती, बगीचे ,समुद्र सारंकाही..
खाली आल्यानंतर नेत्रदिपक असे संगीताच्या तालावर नाचनारे बागडनारे कारंजे पाहीले.
बुर्ज अल अरब आणि जुमेरा बीच

हे संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक आलिशान हॉटेल आहे. ३२१ मीटर (१,०५० फूट) उंच असलेली बुर्ज अल अरब ही संपूर्णपणे हॉटेल म्हणुन वापरली जाणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज अल अरब दुबईच्या जुमेराह बीचपासुन २८० मीटर अंतरावर एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आले आहे व त्याचा आकार साधारणपणे जहाजाच्या शिडासारखा आहे. बुर्ज अल अरब हे जगातील सर्वात महागड्या हॉटेलपैकी एक मानले जाते. ह्या हॉटेलमध्ये २०२ खोल्या आहेत.
हॉटेल अटलांटिस 

हे आहे पाम जुमेरा नामक कृत्रिम बेटाचे  एक चित्ताकर्षक  दृश्य. पाम जुमेरा हे एक  पाम झाडाच्या आकाराप्रमाणे  पाण्यात तयार केलेले एक बेट . त्याला १६ फांद्या असून त्यावर व्हिलास वसवले आहेत. गोल दिसणारा क्रिसेंट आणि त्याच्या टोकाशी अटलांटिस हॉटेल.  पाम  जुमेराचा हा  वरतून दिसणारा view . यात म्हणे मोठ्या बॉलीवूड स्टार  लोकांचीही घरे आहेत. पाम  जुमेरा हे स्वतःच स्वताला 'जगातील आठवे आश्चर्य' म्हणवतात.
पाम जुमेराच्या   शेवटच्या टोकाला अटलांटिस  हॉटेल आहे. एका बाजूला अटलांटिसची  भव्य-दिव्य लखलखती  इमारत आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या-मोठ्या दगडांच्या पलीकडे पसरलेला अथांग समुद्र.
थोडक्यात काय भरपूर श्रम झालेले असले तरी थकवा न येता सगळे प्रसन्न झाले होते……..
                                                 नितेश पाटील...