Tuesday, April 26, 2016

पाणी वाचवा दोन महिने ?

पाणी वाचवा दोन महिने ?

     एक म्हण प्रचलित आहे. "आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार ?"  परिस्तिथी आज वेगळी नाही.
आज महाराष्ट्राच वैभव म्हणावं तर साडेतीनशे मैल लांबीची पर्वत शृंखला सह्याद्री. जिथे शिवछत्रपतींनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं. त्यावेळी निष्ठावंत माणसे होती हे राजांचं वैभव होतं. आज परिस्तिथी वेगळी आहे. त्या सह्याद्रीच्या कुशीत उगम होणाऱ्या नद्यांनी महाराष्ट्र सुजलाम,सुफलाम केला आणि करत आहेत. निसर्गाचं चक्र थोडंस विस्कळीत झालंय हे मान्य..!! पण त्याला जबाबदार कोण ? माणूसच ना ?
       पूर्वी महाराष्ट्राची लोकसंख्या आजच्या तुलनेत किती होती ? आज माणसं वाढली पण निसर्ग तोच आहे ? पैकी कमी झाला आहे. तो निसर्ग वाढविण्यासाठी, निदान जसा आहे तसा ठेवण्यासाठी माणसांनी किती प्रमाणात प्रयत्न केला ? आज सुशिक्षित, अत्याधुनिक माणसाने निसर्गाची कदर किती केली ? कोंक्रेटच निर्जीव,कृत्रिम जंगल उभं करण्यासाठी किती सजीव जंगलांची/झाडांची कत्तल केली ? त्या कोंक्रेटच्या जंगलामुळे वाढत्या प्रदूर्षणास जबाबदार कोण ? या दुष्काळास जबाबदार कोण ? या साऱ्यांचं उत्तर म्हणजे निश्चितच माणसात लपलेला स्वस्वार्थ. स्वार्थापाई बहुतांशी माणसं दिसत असूनही आंधळी झालीत हे नाकारता येणार नाही.
       वाढत्या लोकसंख्येचा विचार केला असता पावसाचं पाणी आणि नद्यांच्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन झाल्यास महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्यावाचून राहणार नाही. आज एकंदरीत विचार करता दुष्काळी क्षेत्रात सरकार, सामाजिक संस्था, व इतरही अशी बरीच माध्यमं आहेत जी आपापल्या परीने दुष्काळग्रस्तांना मदत करते. ते उल्लेखनीय आहेच. पण आजही महाराष्ट्रात ज्या भागात पावसाळ्यात नद्यांचं पाणी ओसंडून वाहत जाते आणि समुद्रास मिळते. ते पाणी तहानलेल्या नद्यांपर्यंत पोहचवण्याचा मार्ग अजून का तयार झालेला नाही..? दुष्काळी भागात फक्त आणि फक्त पाण्याची गरज असूनही नद्या जोडण्याचा प्रकल्प अजून हाती का घेतला गेला नाही..? असे बरेच प्रश्न मनात घर करून जातात...
       पाणी वाचवा, पाणी जिरवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा या घोषणा अजूनही प्रखरतेने फक्त मार्च आणि मे महिन्यातच का दिल्या जातात. उर्वरित महिन्यांत त्याचा विचार तितक्या प्रखरतेने केला जात नाही. आभाळ फाटल्यावर ढिगळ लावत सुटण्यात काय अर्थ आहे.निश्चितच या साऱ्यांचा विचार करण्याची आज गरज आहे. पण वेळीस सावरेल तो माणूस कसला ?
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)९६३७१३८०३१

Friday, April 15, 2016

मंदिर-पेहराव-बंदी

====मंदिर-पेहराव-बंदी++++
        प्रत्येक जागेचे एक पावित्र्य आहे मग ते मंदिर, मस्जिद, चर्च अथवा कोणत्याही धर्माचे असू दे सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असे वागावे कि तेथे बंधन घालण्याची गरजच पडू नये.
        आपण वैदिक संस्कृती जपणारे लोक आहोत. तीर्थक्षेत्री अथवा मंदिरात दर्शनाला येताना तुम्ही काय कपडे घालून येता या पेक्षा तुमचे मन इथे शांत होतंय का ? विचलित तर होत नाही ना ? मन:शांती मिळतिये का ? भगवंत दर्शनाची आस लागतीये का ? हे पाहणे गरजेचे आहे.
      आपली भारतीय पोशाख - मग ते मराठी, बंगाली, पंजाबी असू किव्हा आणखीन कुठली, खूप चांगली होती. अंग झाकून जाणारी. आता ती फारशी तशी उरली नाही. असो काळानुसार सारं बदलत असतं.
       पण सांगायचा मुद्दा असा आहे कि ऑफिस मध्ये ड्रेस कोड चालतो, शाळेत चालतो, असे बरेच विभाग आहेत तिचे पेहराव हा पूर्व निर्धारित असतो. तर मग मंदिरात का नको ? नसेल जमत तर जाऊ नये. प्रत्येकाच्या ह्रुदयात असतोच कि...भगवंत. मंदिर काही पिकनिक ची जागा नाही. त्या उद्देशाने तिचे जाणेही चुकीचे आहे. कुठे काय करावं याची जाण ज्याची त्याला असायला हवी.
         पण मंदिर हि भगवंताविषयी व जीवनाविषयी चिंतन करण्याची जागा आहे. तिथे वर्षानुवर्षापासून भक्तगणांनी आपल्या पारंपारीक, सांस्कृतिक, निस्सीम, भाबड्या भक्तीने एक अदृश्य शक्ती स्थापित केलेली आहे. जी त्यांना जगण्याचं सामर्थ्य देत असते. तिथे त्यांचं मन विचलित होईल असं कुणी वागू नये.
      देवाधर्माच्या गोष्टी तरी व्यक्तिगत स्वातंत्र्यातून सोडाव्यात. देवदर्शनाला जाताना काय हरकत आहे जर आपल्या परंपरागत पोशाखात जावे लागले तर ? मनोरंजनाची स्थळं आणि सार्वजनिक स्थळं यात गफलत का करावी ? त्याही पुढे जाऊन म्हणायचं झालं तर मी बेडरूम मध्ये जसा वावरतो तसा ओटीवर वावरू शकत नाही. शेवटी काही गोष्टीना मर्यादा असतात. त्या स्वतःवर ओढवून घेऊ नये इतकचं...
       सर्वात महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या भारतवर्षात आपण राहतो. तिथली संस्कृती जपणे आपले कर्तव्य आहे. आता समाज उच्चशिक्षित झाल्याकारणे काही रूढी, परंपरा भुलचट वाटत असतील. पण सार्वजनिक ठिकाणी, मंदिरात पारंपरिक पेहरावात जाणे यात काय वावगं असू शकतं ? उगाच विरोध करायचा म्हणून कोणी करू नये. हा एक प्रश्न सोडला तर त्या व्यतिरिक्त सारे प्रश्न निकालात निघाले अस नाही.
         आणि ईश्वर देवघरात, मंदीरात किव्हा अन्यत्र असा कुठेच नाही. त्याला जिथे तुम्ही शक्तिरुप दिलं तिथे तो निश्चितच आहे. तुम्ही त्याची भक्ती कोणत्या प्रकारे करता, तुमचं आचरण काय यावर सारं काही अवलंबून असतं. आज त्या ईश्वरनिगडीत काही गोष्टींवरून रान उठवलं जातं, आणि त्यात सामान्य माणसं भरकटली जातात हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या ह्रुदयात ईश्वर आहे तो आधी जणाला पाहिजे, जोपासला पाहिजे. त्या पद्धतीच आचरण केलं पाहिजे तरच तुम्ही माणूस म्हणून श्रेष्ठ व्हाल...अन्यथा सारं व्यर्थ आहे.
.....नितेश पाटील (धनसार,पालघर)

Thursday, April 14, 2016

खारीचा वाटा

खारीचा वाटा
काळ बदलतोय, वेळ बदलतेय
जागृत होतोय, माणसातला माणूस
पुन्हा त्याच ओघाने, माणुसकीच्या दिशेने
अंधार पुसत चालला, स्वयंप्रकाशी माणूस...
...नित
         प्रत्येक माणसात माणूस दडलेला आहे. सध्या बहुतांशी माणसं स्वतःमध्ये गुंतल्यामुळे त्यांना त्याच भान राहिलेलं नाही. पण मीपणा सोडून जगणारीही माणसं भरपूर आहेत. जे स्वतःबरोबर इतरांचाही विचार करतात, वेळीस आपलं सर्वस्व झोकून देतात.... त्यात निदान आपला खारीचा वाटा तरी असायला हवा. शेवटी कितीही ऐश्वर्य कमावलं तरी ते इथेच राहणार. सोबत नेता येणार नाही आणि परतूनही कोणी येत नाही.
          आजची परिस्तिथी जरा वेगळीच दिसते. पूर्वी माणसं जगण्यासाठी कमवायची, आता कमावण्यासाठी जगतात. माणूस आजकाल आपल्या मिळकती पेक्षा जास्त खर्च करतो. त्यामुळे तो त्याच्याच दुनियेत मशगुल असतो. दुसऱ्याच हित-अहीत, सुख-दुःख जरी जाणत असला तरी परिस्तिथी पुढे त्याला काही जमत नाही. पण त्यातूनही समाजहितासाठी आपण काहीतरी करावं हि भावना जोपासणारीही माणसं आहेत.      स्वतःसाठी तर सारेच जगतात थोडंस का होईना इतरांसाठी जगून पहावं. आपलाही हातभार सत्कर्मासाठी खारीच्या वाट्याइतका तरी लागावा. जेणेकरून माणसांच्या पंगतीत आपल्याला बसता येईल. असो....
          तर खारीचा वाटा म्हणजे नेमके काय? रामायणात खारीची कथा आपण वाचतो. सेतू पूल बांधत असताना दगड उचलू न शकणारी खार मातीत लोळून अंगाला माखलेली माती पुलाजवळ आणून टाकत असते व आपल्या क्षमतेनुसार श्रमदान करत असते. तिचे श्रम पाहून भारावून गेलेले श्रीराम आपली तीन बोटे तिच्या पाठीवर फिरवतात. ती बोटे आजही आपण खारीच्या पाठीवर पाहतो. सद्गुरूंचा कृपाहस्त आणि त्यांनी दिलेली कौतुकाची थाप अशीच कायम पाठीवर राहते. फक्त आपण प्रयास करायला हवे.
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)

Tuesday, April 12, 2016

झाडे वाचवा

झाडं वाचवा
         माणसात आणि झाडांत काय फरक आहे. मुळात झाडं आहेत म्हणून माणसं आहेत. पण किती माणसं तसा विचार करतात ? कमीच...  आज माणूस माणसाचा विचार करत नाही तो झाडाचा काय करणार म्हणा ?  आज शहरात नवनिर्माण करण्यासाठी रस्त्यांवरील झाडे मोठया संख्येने तोडली जातात. शहरापर्यंत ठीक होतं पण शहरातील उपनगरातही हे प्रमाण भयंकर वाढलंय. काही गोष्टींना मर्यादा असते. तिचं उल्लंघन केलं कि सारं असूनही नसल्यासारखी परिस्तिथी निर्माण होते. कृत्रिम आणि नैसर्गिक यात उच्च प्रतीची तफावत असते हे विसरून चालणार नाही. निसर्गाने जे आपल्याला भरभरून मोफत दिलंय त्याचा मोबदला देता येत नसेल तर निदान ते टिकवायची तरी आपली द्यानत असली पाहिजे.
        सुशोभीकरण, रस्ते, शहरी विकास या साऱ्यांची गरज असली तरीही त्यापेक्षा जास्त झाडांची गरज आहे हे माहित असूनही माणसं अशी का वागत असावीत याचं उत्तर मला काही सापडत नाही. म्हणजे माहित असते विहीर कोरडी पडली आहे... तरी त्यात उडी घ्यायची. पण म्हणून काय नुकसान विहिरीचं होनार आहे का ? आपलंच होईल. त्याआधी त्या विहिरीत पाणी कसं जमा होईल याचाही विचार करायाला हवा. वृक्षतोडीची भरपाई करणेही गरजेचे आहे.
           निसर्गाचा जर आपण हळू हळू का होईना... लचका तोडत गेलात तर पुढे ओढवणारी परिस्तिथी खूप भयंकर असेल. आपल्या दृष्टीने आपण दोन, चार झाडं तोडत असू पण एकंदरीत जर विचार केला तर सर्यांमिळून किती झाडं तोडली जातात आणि वृक्षारोपण किती होते. हा हि विचार करणे गरजेचे आहे.
         आणि एक बरं आहे. झाडांना भावना असल्या तरी त्या मूक आहेत. तात्काळ प्रतिकारात्मक शक्ती त्यांच्याकडे नाही. ते कधी ईर्षा धरत नाही..!! झाडांप्रतिही नाही न् आपल्या प्रतीहि नाही.
समजा त्यांनीही ठरवलं...
आपण माणूस म्हणवणाऱ्यांसारखं वागायचं तर...?
त्यांनीही बंड करून संप पुकारला तर...?
प्राणवायूची निर्मिती थांबवली तर...?
सारीच फुले दुर्गंधी झाली तर...?
सारीच फळे विषारी झाली तर...?
       अशा कैक प्रश्नांचं एकच उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही आम्ही सारेच सजीवगण निर्जीव म्हणून पडतील नाही...? आणि एकंदरीत साऱ्यांनीच विचार करायला हवा कि आज जे सृष्टीचं कालचक्र  बिघडलं आहे त्याला कारणीभूत कोण ?
विनामूल्य दिले आम्हां निसर्गाने
टिकवू निदान ते जगण्यासाठी
संकल्प वृक्षारोपणाचा घेऊ हाती
समतोल सृष्टीचा राखण्यासाठी
...नित
नितेश पाटील(धनसार,पालघर)

Thursday, March 17, 2016

ग्रामपंचायत आणि कलम

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.    ग्रामपंचायत 
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा.
ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय :
१. भूविकास
२. जमीन सुधारणांची अंमलबजावणी
३. जमिनीचे एकत्रीकरण
४. मृदुसंधारण
५. लघु पाट बंधारे
६. सामाजिक वनीकरण
७. घर बांधणी
८. खादी ग्रामोद्योग
९. कुटिरोद्योग
१०. रस्ते, नाले, पूल
११. पिण्याचे पाणी
१२. दळण वळणाची इतर साधने
१३. ग्रामीण विद्युतीकरण
१४. अपारंपरिक उर्जा साधने
१५. दारिद्रय निर्मुलन
१६. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
१७. बाजार आणि जत्रा
१८. रुग्णालये आणि कुटुंब कल्याण
१९. महिला आणि बालविकास
२०. प्रौढ शिक्षण
२१. सांस्कृतिक कार्यक्रम
२२. सार्वजनिक वितरण
२३. उत्पादनाच्या बाबी
✅ग्रामपंचायतींची कार्ये:
१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन
२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे
३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास
५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा
६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने
७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे
८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते
आय पी सी (IPC) १८६०
कलम १४- शासकीय सेवक
कलम २१ -लोकसेवक
कलम २२- जंगम मालमत्ता
कलम २३ -गैर्लभ किंवा गैर्हानी 
कलम २४ -अपप्रमनिक्पने
कलम २५ -कपतिपनने
कलम २६- समजण्यास कारण
कलम २८- बनवतीकर्ण किंवा नकलीकरन
कलम २९- दस्त्ताइवज
कलम २९ (अ) -वीदूत नोंदी
कलम ३० -मुल्य वान रोखा
कलम ३३ -कृती अकृती
कलम ३४- सामाईक इरादा
कलम ३९ -आपखुशीने कींवा इचापुर्वक
कलम ४० -अपराध
कलम ४१- वी शे श  कायदा
कलम ४२ -थानीक कायदा
कलम ४४ -श ती / हानी
कलम ५२ -सद्भावनेने / शुद्ध हेतूने
कलम ५२ (अ) -आसरा देणे
                   आपवाद
कलम ७६ -कायदेशीर बांधील असलेल्या        व्यक्तीने आथवा तथ्ये विषयक चुक्भूलीमुळे केलेली कृती अपराध होत नाही
कलम ८२ -सात वर्ष वयाखालील बालकाने केलेली कृती
कलम ८३ -सात वर्षावरील व बारा वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती आसलेल्या बालकाने केलेली कृती
कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेली गोष्ट
कलम ९७ -शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क
कलम १०० -शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृतु घडून आणण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम १०१ -आसा हक्क मृतुहून अन्य अपाय करण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम १०२-शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरु होणे व चालू राहणे
    
             अप्प्रेर्णा वीषयी
कलम १०७- एखा द्या गोष्टीचे अप्प्रेरन
कलम १०८- अप्प्रेरक
कलम १०९- अपप्रेरणामुळे परीणामतः
कलम ११४- अपराध घडला तेंव्हा अपप्रेरक हजार आसने
     सार्वजनीक प्रशान्त्तेच्या वीरोधी अपराधा वीषयी
कलम १४१- बेकायदेशीर जमाव
कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक आसने
कलम १४३- शीक शा
कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासः बेकायदेशीर जमावात सामील होणे
कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश झाल्याचे माहीत असूनही सामील होणे
कलम १४६- दंगा करणे
कलम १४७- दंगा करण्याबद्दल शी शा
कलम १४९- वीधी नी युक्त  जबाबदारी
कलम १५१- पाच कींवा आधीक व्यक्तींना पंग्न्याचा आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक थांबून राहणे
कलम १५३(अ) -धर्म,वंश,जन्म्थन,नीवास भाषा इ. कारणावरून नीरनीराळया गटामध्ये शत्त्रुतव वाढवणे
कलम १५९- दंगल
कलम १६०- दंगल करण्याबद्दल शीकशा
       लोक्सेवाकांकडून कींवा त्यासबंधी घडणाऱ्या अप्राधावीशइ
कलम १७०- लोक्सेव्काची बतावणी करून  तोत्यागीरी करणे
कलम १७१-लोकसेवक वापरतो तशी वर्दी कींवा ओळख चींह कपट  करण्याच्या उद्देशाने वापरणे, परीधान करणे
         लोक्सेव्कांच्या कायदेशीर   प्रधीकाराच्या अव्मानावीश इ
कलम १७२- समन्सची बजावणी  कींवा इतर कार्येवाही टाळण्यासाठी फरारी होणे
कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर श्प्तेव्र खोटे कथन करणे
कलम १८८- लोक्सेव्काने जारी केलेल्या आदेशाची अव्दन्या करणे
        खोटा पुरावा आणी सार्वजनीक न्यायाच्या वीरोधी अपराध
कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा पुरावा नाहीसा करणे कींवा खोटी माहीती देणे
कलम २२३- लोक्से
व्काने हयग इने बंदीवासातून कींवा ह्वाल्तीतून पळून जाऊ देणे
          सार्वजनीक आरोग्य,सुरक्षीतता सोय सभ्यता व नीतीमत्ता याना बाधक अशा अप्रधान्वीशइ
कलम २७९- सार्वजनीक रस्त्यावर बेदकारपणे वाहन चालवणे
कलम २९२- अश्लील पुस्तके इ. वी करी करण

        ध्म्स्बंधीच्या अप्रधान्वी श इ
कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे नुकसान करणे कींवा ते अप्वीत्र  करणे
कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा कींवा धार्मीक श्रद्धांचा अपमान करून धार्मीक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने कृती करणे
कलम २९८- धार्मीक भावना दुखवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शब्द उच्चारणे
       मानवी शरीरास व जीवीतास बाधक होणार्या अप्रधावी श इ
कलम २९९- सदोष मनुष्यवध
कलम ३००- खून
कलम ३०२- खुणा बद्दल शी क्षा
कलम ३०४- सदोष मनुष्यवधा बद्दल शी क्षा
कलम ३०४(अ)- ह्य्ग्यीने मृतू स कारण
कलम ३०४(ब)- हुंडा बळी
कलम ३०६- आत्म्हत्तेला अपप्रेरणा देणे
कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे
कलम ३२३- इच्छापुर्वक दुखापत पोहच्व्ण्याब्द्दल शी क शा
कलम ३२४- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहच्व णे
कलम ३२५-  इच्छापुर्वक  जबर दुखापत पोहच्व्ण्याब्द्दल शी क शा
कलम ३२६- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहच्व णे
कलम ३२६(अ)- असीड इ चा वापर करून  इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे
कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक असीड फेकणे अथवा फेकण्याचा प्रयत्न करणे
कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने वीष इ सहायाने दुखापत करणे
कलम ३३०- कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी , गेलेला  माल परत घेण्यासाठी  इच्छापुर्वक दुखापत करणे
कलम ३३२- लोक्सेव्काला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे
कलम ३३६- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणारी कृती
कलम ३३७- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने दुखापत पोचवणे
कलम ३३८-  इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने जबर  दुखापत पोचवणे
कलम ३३९- गैर नीरोध / आन्यायाने प्रतीबंध
करणे
कलम ३४०- गैर प्रीरोध/ आन्यायाने कैदेत ठेवणे 
कलम ३४१- गैर नीरोधाबद्दल शी कशा
कलम ३४२- गैर परीरोधाबद्दल शी कशा
कलम ३४९- बलप्रयोग
कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग
कलम ३५१- हल्ला / हाम्ला
कलम ३५२-  फौजदारी पात्र बलप्रयो गाबद्दल शी कशा
कलम ३५३-  लोक्सेव्काला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४- शीरी चा वी न्य्भंग करण्याच्या उद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४(अ)- लैंगीक छ ळ व च छ लाब्द्द्ल  शीक्षा
कलम ३५४(ब)- शीरीला वी वस्र करण्याच्याउद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४(क)- चोरून अश्लील चीत्र्ण करणे
कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे
कलम ३५९- अप्ण्य्न /मनुश चोरून नेणे
कलम ३६२- अपहरण /प्ल्वुन नेणे
कलम ३६३- अप्ण्य्नाब्द्दल शी कशा
कलम ३७०- व्यक्तींचा अप्व्यापार करणे
कलम ३७५- बलात्कार
कलम ३७६- बलात्काराबद्दल शी कशा
कलम ३७७- अनैस्गीक सन्भोक
कलम ३७८ चोरी
कलम ३७९- चोरीबद्दल शी कशा
कलम ३८०- राहते घर वगैरे ठीकाणी चोरी कलम ३८३- ब्लाद्ग्रह्न /जुल्माने घेणे
कलम ३८४ - ब्लाद्ग्रह्नाब्द्दल शी कशा
कलम ३९०- जबरी चोरी
कलम ३९१- दरोडा
कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शी कशा 
कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयतन करणे
कलम ३९५- दरोड्याबद्दल शी कशा
कलम ३९९- दरोडा घालण्याचा प्रयतन करणे
कलम ४०५- फौज्दारीपात्र न्यास्भंग /विस्वास्घत
कलम ४०६- न्यास्भनगाब्द्दल शीक शा
कलम ४०९- लोक्सेवाकाने ,सावकार ,ए जंत यांनी आन्यायाने वी सवासघात करणे
कलम ४१०- चोरीची मालमत्ता
कलम ४११- अप्रमानीकपणे चोरीची मालमत्ता  स्वीकारणे
कलम ४१५- ठक्वणूक
कलम ४१७- ठक्वणूक करण्याबद्दल  शीक शा
कलम ४२०- ठक्वणूक करणे आणी मालमत्ता देण्यास नकार देणे
कलम ४२५- अप्कीर्या
कलम ४२६- अप्किर्य बद्दल  शीक शा
कलम ४३५- शंभर रुपये पर्यंतच्या कींवा शेतमालाचा १० रु की मतीच्या नुकसान करण्याच्या उद्देशाने स्पोटक पदार्थ अथवा वीस्तव याद्यारे आगळीक करणे
कलम ४४१- फौजदारी पात्र अतीक्रमण कींवा अन्यायाची आगळीक
कलम ४४२-गृह अतीक्रमण कींवा घरा वीषयी आगळीक
कलम ४४३- चोरटे गृह अतीक्रमण
कलम ४४४- रात्रीच्या वेळी  चोरटे गृह अतीक्रमण करणे
कलम ४४५- घरफोडी
कलम ४४७- फौजदारी पात्र अती क्रमनाबद्दल शी कशा
कलम ४४८- घर अती क्रमनाबद्दल शी कशा
कलम ४५२- दुखापत ,हमला ,गैर्नीरोध ,करण्याची प्रुव तयारी करून नंतर गृह अतीक्रमण करणे
कलम ४५४- कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
कलम ४५७- कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्री
च्या वेळी  चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
कलम ४६३- बना वटी करण
कलम ४६५-  बना वटी कर नाबद्दल शी कशा
कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी  बना वटी करण करणे
कलम ४९८(अ)- ए खांद्या सी रीच्या पतीने कींवा नातेवाईकाने तीला क्रूर वागणूक देणे
कलम ५०४- शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे
कलम ५०६- फौज्दारीपात्र धाक्दप्त्शा बद्दल शी कशा
कलम ५०९- वी न्य्भंग करण्याच्या उद्देशाने हावभाव कींवा शब्दोचार करणे
कलम ५११- आजीवन कारावासाच्या कींवा अन्य कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेले अपराध करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल शिक्षा.
    .....  जनहितार्थ
संग्रहित
,

Monday, February 22, 2016

गिर्यारोहन (ट्रेक) चे नियम

शिवप्रेमी गडयात्री ट्रेक समूह नियम

🚩 सस्नेह जय शिवराय 🚩
⛳ शिवप्रेमी गडयात्री ⛳
ट्रेक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आनंदसह माहितीचा स्रोत आहे, धकाधकीच्या जीवनात निसर्गाशी नाते जोडणारा एक उत्तम दुवा आहे, कट्ट्याच्या निमित्ताने हा दुवा जपता येतो, गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो.     चौकटीतल्या आयुष्यात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्व अंगी बाणवित. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणा-या सर्वच डोंगरवेड्यांना कोठे तरी एकत्र आणणे गरजेचे होते. एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणा-या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी एक हा समूह निर्माण केला आहे. शिवप्रेमी गड यात्री...
      ट्रेकिंगला जाताना काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत.
* प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत.
* मोठ्या आवाजात बोलू नये.
* चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत.
* बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.
* कुणीही चुकीचं वर्तन करू नये.
* टीम लिडरने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करणे.
* ट्रेकला जाताना व्यसन करू नये.(मद्यपान,अल्कोहोल,ई.) नाहीच राहवत असेल तर येऊच नये.
* ट्रेकचे निर्धारीत मानचिन्ह असलेल्या कुठल्याही वस्तू ,कपडे शक्यतो ट्रेक व्यतिरिक्त कुठेच वापरू नयेत
* ट्रेकिंगला म्हणून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या सॅकमध्ये फर्स्ट एड बॉक्स (यामध्ये तुम्हाला लागणारी औषधे असावीत), खाण्याचे कोरडे साहित्य (चिवडा, लाडू, ठेपले थोडक्यात ज्या वस्तू टिकू शकतील असे.), प्लॅस्टिक बॅग्ज, साखर, मीठ, छोटी बॅटरी,त्यासाठी आणि कॅमेरा सोबत नेणार असाल तर त्यासाठी लागणारे सेल, पाण्याच्या दोन बाटल्या आणि सर्वात महत्त्वाचं एक कपडय़ाचा जोड,स्लिपर आणि रोप. या सर्व गोष्टी एक प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित रॅप करून सॅकमध्ये असावेत. अथवा ज्या समूहाबरोबर आपण जाणार असाल त्यांनी आवश्यक ती साधने, उपकरणे सोबत घेतली आहेत ना याची खातरजमा करून घ्यावी.
* ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे जाताना रुळलेल्या वाटेवरूनच शक्यतोवर जावे. पावसाळ्यात नवीन मार्ग शोधण्याचे साहस करू नये.
* ट्रेकिंगला जाताना ट्रेकिंग पँट, आणि पूर्ण बाहय़ाचा शर्ट घाला. मुलींनीही कॉटनचे कपडे न घालता ओले झाल्यानंतर पटकन वाळू शकतील, असे कपडेच घालावेत. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे पायात चांगल्या प्रतीचे सॉक्स आणि ट्रेकिंग शूजच घाला. दागिने घालणे टाळा.
* तुमच्याकडे त्या ठिकाणी चालणारया नेटवर्कचा मोबाईल अवश्य जवळ असणे गरजेचे आहे. ट्रेकला जाण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच त्यांचा नंबरही सोबत ठेवावा. ट्रेक दरम्यान एखादी अडचण निर्माण झाली तर लगेचच त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
* धबधब्याच्या किंवा एखाद्या नदीच्या पात्रात डुंबायला जाता तेव्हा पाण्याचा अंदाज खूपच महत्त्वाचा असतो. तुम्हांला जर पोहोता येत नसेल तर खोल पाण्यात जाणे टाळा. पाण्यात गेल्यावर वेळेचे भान रहात नाही. पावसाळ्यात नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ असल्याने पात्रात खोलवर जाणे टाळा. तुम्ही जिथे आहात तिथे पाऊस नसेल पण लांबवर पडणा-या पावसामुळे पाण्याची पातळी कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते.
* उंचावरून कोसळणारा धबधबा प्रत्येकालाच आकर्षति करत असतो. पण या धबधब्यांमधून लहान मोठे-दगड येण्याची शक्यता असते. वरून येणारा लहानशा दगडामुळेही इजा होण्याची शक्यता असल्याने अशा धबधब्यांखाली खाली उभे राहणे टाळा.
* पावसाळ्यात धबधब्यांमध्ये रॅपिलग करताना यामध्ये धोका असतो हे लक्षात असू द्या. प्रत्येक रॅपिलग झाल्यावर दोर चेक करायलाच हवा. रॅपिलग करणा-याला हेल्मेट घालणे बंधनकारक असते तो नियम काटेकोरपणे पाळावा.
* निसर्गाचे सौंदर्य कॅम-यामध्ये टिपत असताना वेळेचेही भान असू द्या. एखाद्या अवघड जागी उभे राहून फोटो काढणे, दंगामस्ती करणे टाळावे,तसे करणा-यांना त्यापासून प्रवृत्त करावे.
* ज्या ठिकाणी जाणार आहात तिथल्या स्थानिक गावक-यांची कधीही मदत लागू शकते हे ध्यानात घेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागा. जर गावाबाहेर किल्ल्यावर तुम्ही जाणार असाल आणि तिथे जर तुम्ही वास्तव्य करणार असाल तेव्हा गावातील काही लोकांचे दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक, तिथल्या पोलिस ठाण्याचा क्रमांक जवळ ठेवा. शक्य झाल्यास तिथल्या एखाद्या गावकऱ्याला तुमच्यासोबत न्या.
* तुमच्या ट्रेकिंगमध्ये एका रात्रीचा मुक्काम असेल तर सोबत कॅरीमॅट, ओडोमॉस, शक्य असेल तर स्लििपग बॅग बाळगा. तसेच रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर त्या ठिकाणची स्वच्छता अवश्य ठेवा.
* ट्रेकिंगच्या दरम्यान तुमच्याकडे असलेला कचरा, खाद्यपदार्थाची वेष्टणे, फळांची साले, थंड पेयांचे डबे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद,निरुपयोगी वस्तू इकडेतिकडे फेकू नका. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा.
* ट्रेक संपल्यानंतर ओले झालेले बूट, सॉक्स काढून ते सोबत असलेल्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवावेत आणि पाय कोरडे करून स्लिपर घालाव्यात.
ट्रेकिंगला निघण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली क्षमता ओळखूनच ट्रेकिंगला/फिरायला जाण्याचे ठिकाण निवडावे.
* तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाणार असाल तर आधी एका दिवसाच्याच ट्रेकला जा आणि अनुभवी व्यक्तीं/ ग्रुप्स सोबतच जा. जर मित्रमंडळींच्या ग्रुपबरोबर जाणार असाल तर गावातील स्थानिक व्यक्तीला वाटाडय़ा म्हणून सोबत घ्या.
* ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात तिथले मार्गाची माहिती असावी, सोबत त्या भागाचे नकाशे असावेत. त्यामुळे परतीच्या मार्गात जर काही अडचण आली तर पर्यायी रस्ता वापरता येऊ शकतो.
संग्रहित...
धन्यवाद....
संकलन :- नितेश पाटील (पालघर,धनसार)
मोबाईल नं. ०९६३७१३८०३१
email :- nitesh715@gmail.com

Thursday, February 18, 2016

कन्याकुमारी केरळ सहल २०.११.१५ ते २७.११.१५

 सस्नेह जय शिवराय...                                                                                                नितेश पाटील

कन्याकुमारी केरळ सहल दि. २०.११.२०१५ ते २७.११.२०१५ 
शिवा डेकोरेशन ग्रुप पालघर धनसार...........

     फिरायची उत्सुकता आणि ओढ माझ्या आयुष्यात एक नवी पर्वणीच असते. ईश्वर कृपेने मला नेहमीच बाहेर म्हणजेच महाराष्ट्रात म्हणा, महाराष्ट्राबाहेर म्हणा, कामा निमित्ताने त्याच बरोबर फिरण्याच्या उद्देशाने बाहेर जाण्याचा योग येतच असतो.  मित्राच्या सहकार्याने आणि परमेश्वर कृपेने भारताबाहेर दुबई १२.६.२०१५ ते १६.६.२०१५ जाण्याचाही योग जुळून आला होता त्याबद्दल मी मागच्या ब्लॉग मध्ये लिहिले आहेच.
     असो.... 
आता कन्याकुमारी केरळची सहल. शिवा डेकोरेशन ग्रुप आयोजित. दिवस ठरला होता. कार्यक्रमही पेपरबद्ध झाला होता. अर्थात ती आखणी करण्याचे श्रेय शिवा घरत,अमित माळी, सुदेश मोरे आणि काही प्रमाणात मी अशी चौघांनी केली होती. बाकी सदस्याना त्याची माहिती आणि त्यांच मत जाणूनच. इतर सदस्य म्हणाल तर कल्पेश घरत,(गुरू),शैलेंद्र राऊत,रमेश राऊत,तुषार कारभारी,तृणाल मोरे, आणि लहानगा पियुष घरत असे सुदेश सोडून आम्ही नऊ जण. 
           एकंदरीत सहल अशी होती २०/११ धनसार हुन बोईसर तिथून नागेरकोईल एक्स.ने थेट  एक दिवस नी दोन रात्रीचा प्रवास करून नागेरकोईल २२/११. तिथून कन्याकुमारी. त्याच दिवशी रात्री १०.३० ची रामेश्वरम ट्रेन पकडून दुसऱ्या दिवशी सकाळी ५.०० वाजता रामेश्वर. तेथील क्षणचित्रे पाहून पुन्हा ४.३० ची मदुराई साठी ट्रेन पकडून मदुराई संध्याकाळी ७.३० वाजता पोहचून रात्री विश्रांती. सकाळी मीनाक्षी मंदिर पाहून गाडी करून थेकडी. तिथली क्षणचित्रे पाहून एक दिवस वास्तव्य करून पुढच्या दिवशी मुन्नारकडे प्रस्थान. तिथेही क्षणचित्रे पाहून एक दिवस वास्तव्य करून सकाळी कोचिनकडे रवाना. रात्री वास्तव्य आणि सकाळी कोचिन एअरपोर्ट तिथून एअर इंडिया एक्स. विमानाने छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल  एअरपोर्ट  मुंबई पोहचून घरी .अशी सहलीची सांगता..
         ठरल्या प्रमाणे आम्ही निघालो बोईसरकडे. बॅगा असल्यामुळे घरून निघतानाच रिक्षा (मॅजिक) सज्ज केली होती. तुषार तेवढा ट्रेनने येणार होता. ७.२० ची ट्रेन असल्यामुळे आम्ही ५.३० लाच घरून निघालो. रिक्षासमोर श्रीफळ फोडला आणि श्री गणेश स्मरण करून निघालो. रस्त्यात विषय निघाला कि गळ्यात चैन वैगरे नसेल तर चांगलं. दोन दिवस ट्रेनमधील प्रवासात मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवायचं म्हणजे शर्थीचे काम. आणि हि कल्पना सर्वाना आधीच दिली होती.पण आमचे शैलेंद्र राऊत आणि रमेश राऊत यांनी आपल्या गळ्यातील चैनी गळ्यातच घालून आले..!! मग काय ? आता ह्या कुठे ठेवायच्या हा प्रश्न आलाच. पण रमेश राऊत यांच्याबद्दल काय सांगावं त्यांनी लगेच सुझाव दिला कि सरावलीत  त्यांच्या ताईकडे ठेवू. त्यांनी त्यांच्या भाच्याला बोलावून त्या सुपूर्द केल्या आणि पुढे निघालो. पोहचलो बोईसर स्टेशनवर.तुषारही पोहचलाच होता.
        आता आतुरतेने वाट बघत होती गाडीची. ती हि अर्धा तास उशिराने धावत होती. आणि आली बाबा एकदाची स्टेशन वर असलेल्या आरक्षण चार्ट नुसार आम्ही बोगीमध्ये चढलो. अरे पण जागेवर गेलो तर तिथे पूर्वीपासूनच प्रवासी बसले होते. आम्ही विचारणा केली असता समजलं कि त्या जागा त्यांच्या नावे आरक्षित होत्या.आम्ही आमचं तिकीट पाहिल्यावर कळलं कि आमची जागा दोन बोगी नंतरच्या बोगीत आरक्षित होती. सांगायचं तात्पर्य इतकच कि हा रेल्वे कर्मचाऱ्यांचा गलथानपणा  प्रवाश्यांसाठी किती त्रासदायक होतो. आपणही दक्ष राहायला हवं. असो जागेवर पोहचलो होतो. सारी आवरा साराव करून सर्वांच्या सॅग व्यवस्थित लाऊन सुस्कारा सोडला आणि निवांत झालो.
      सर्व सावरताना नऊ वाजले होते. आता जेवणाची वेळ. तसं घरूनच रात्रीचं आणि दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण सोबत होतं आमच्या. पाण्याच्या बाटल्यांचे तीन बॉक्स हि सोबतच होत्या. उगाच दगदग नको..!! शेवटी घरचं जेवण ते घरचं..!! दोन दिवस ट्रेनमध्ये सलग प्रवास करायचा म्हंटल्यावर ह्या गोष्टी आवर्जून करायला पाहिजेत. रात्रीच्या जेवणाचं म्हणाल तर चमचमीत मसालेदार चिकन सोबत ग्रेव्ही आणि भात,कांदा,लिम्बु आहाहा...!!! आणि त्याच श्रेय जातं खरंतर प्रिया ताईला. तीने मेहनतीने आम्हा नऊ जणांसाठी स्वयंपाक बनवला होता. इतकी उत्कृष्ट डिश होती कि खताक्षणी सर्वांच्या तोंडातून वाह शब्द बाहेर पडले आणि सर्वांनी मनमुराद, मनसोक्त आस्वाद घेतला. आमच्या बाजूला बसलेलेही अचंबित झाले. सारं उरकून गप्पा आणि पत्त्यांचा खेळ सुरु झाला, तुम्हाला ट्रेनमध्ये जर दोन दिवस सलग काढायचे असतील तर पत्यांची सोबत हवी. आमच्यात पियुष तितका लहान होता पण आमच्याबरोबर हि त्याची तिसरी ट्रिप होती. एक प्रकाशाने जाणवलं कि तो या ट्रिपवर अधिकच उत्साही आणि खुष होता. आपल्या सोबत लहान मुलं असली कि ती जर खुष असतील तर आपल्याही आनंदाला पारावर उरत नाही. अकरा बाराच्या दरम्यान सारे निवांत झोपी गेले. सामानावर लक्ष्य देण्याची जबाबदारी गुरू आणि तृणालने उचलली होती. ट्रेन मध्ये तशी प्रत्येकालाच झोप लागत नाही म्हणा.....
        आम्ही एकाच जागेत झोपलो असलो तरी गाडी मात्र चालत होती तिनं आपला वेगही थोडा जास्तीचा वाढवला होता. तिला इतकं अंतर कापायचे म्हंटल्यावर तिला थांबून चालणारच नव्हतं. वसई,पनवेल,रत्नागिरी मार्गे सकाळी आठच्या सुमारास मडगावला पोहचलो होतो. आता ट्रेनमधला दुसरा दिवस चालू. सकाळ झाली एक एक करून सारे उठले आपापला सकाळचा कार्यक्रम उरकून स्थानापन्न झाले. सकाळ झाली म्हणजे चहा हे काय सूत्र आहे देवच जाणे.!! हल्ली तर काही लोकं ब्रश करायच्या आधी चा घेतात. अस्सल दारुड्या कसा असतो माहित आहे ना.? उठला थेट दारूच्या गुतत्यावर ... सकाळी नाही ,पहाटेच...!!! त्यातलाच काहीसा प्रकार असावा हा. असो मग चहा घेत गोव्याचं रमणीय दृश्य न्याहाळत आम्ही म्हणजे गाडी पुढे सरू लागली, गोव्यात व्यतीत केलेल्या क्षणांच्या आठवणींना उजाळा मिळू लागला. आणि सहजिकच आपण जेव्हा बाहेर फिरण्यासाठी निघतो तेव्हा आधी भ्रमण केलेल्या क्षेत्राची आठवण आपसूकच येत असते.आता सकाळ झाली चहा घेतला म्हणजे नास्ता हवा कि नको ? त्याशिवाय का जमणार आहे...? मग काय उघडल्या बॅगा आणि सर्वांनी काहींना काही आणलच होत. परोठे, खाकरा, चिवडा, बिस्कीट,आदी लय झकास काम झालं ना..!! दाबून म्हणतात ना तसा नास्ता केला सार्यांनी... 
 मधेच गाडी खराब झाली (सिग्नल नसल्यामुळे थांबली होती)आम्हाला टाटकळत राहावं लागलं. पण सोबतीला आमचे शैलू मास्तर असल्यामुळे तो हि प्रश्न निकालात निघाला. तसा मास्तर तो शाळेचा आहे पण असले उद्योग करतो तो...
 तोपर्यंत आम्ही म्हणजेच गाडीने काणकोण सोडून कारवार  मार्गे कर्नाटकात प्रवेश केला होता. आता सफर चालू झाली ती परराज्यातली ... गाडी आपल्या वेगात आम्हाला पुढे घेऊन चालत होती. बघता बघता दुपारची जेवणाची वेळ येऊन ठेपली.लागलीच डबे काढले. मेनू होता कर्दीचा खिमा आणि दाताल फ्राय....मेजवानीच..!! रेटून हाणलं मग ट्रेनमध्येच फेरफटका...!! नाहीतर जिथे गाडी थांबेल तिथे उतरायचं आणि क्लिक मारायचे.
            दोन वाजले होते. आता गाडीने मंगळुरू मागे टाकून केरळात प्रवेश केला होता. काही जण झोपीही गेले म्हणा.. आम्हाला कसली येतंय झोप..?? आम्ही आपलं धुंडालायचो इथून तिकडे अन तिकडून इकडे. केरळ आणि नारळाच्या झाडाचं अतूट नातं असावं. रस्त्याच्या दुतर्फा फक्त आणि फक्त नरळींचच साम्राज्य...इच्छा तर होणारच ना नारळपाणी प्यायची..?? पण संभ्रमात राहू नका. केरळमध्ये एकाही थांब्यावर नारळ पाणीवाला नव्हता. काय पॉलिसी असेल कुणास ठाऊक.?? मग काय चहा जिंदाबाद. एक चुस्की मारली कि काम फत्ते.... पण वेळ कसा निघून गेला कळलं नाही. आता रात्रीचं जेवण मात्र आम्हाला मागवावं लागणार होत. पुऱ्या आणि चपात्या होत्या काय ती भाजीची तेवढी सोय करायची होती. रेल्वे पँट्रीच्या बाजूलाच बोगी असल्यामुळे फार काही दगदग नव्हती. आम्ही अंडाकडी मागवली आणि केली सुरवात . दुसरं कामच काय म्हणा..?? खाना, पिना, सोना.पिना म्हणजे पाणी ,चहा बरं का ? नाहीतर भलतंच समजाल. पावणे नऊच्या सुमारास त्रिशुर पोहचली बाबा गाडी. माणसांची वर्दळ चालू. काही कॉलेजच्या युवती असतील थेट आमच्या बाजूच्या कम्पार्टमेंट मध्ये येऊन बसल्या सोट त्यांच्या शिक्षिका. काय बोलायच्या काही एक समजायचं नाही. त्यांच्या भाषेत गाणी गुणगुणत होत्या. आणि इथं आमच्या मुलांची चलबिचल. एका म्हणतो मी राहील जागा आणि दुसरा म्हणतो मी. थिरुअनंतपुरमला उतरल्या त्या सार्याजणी आणि आमचे वीर आणि आम्हीही गाढ झोपी गेलो.कधी नागेरकॉईल आलं आणि गाडी कधी खाली झाली कुणालाही काही कळलं नाही. आमच्या शेजारी जे होते त्यांनी उठवलं.म्हंटलं उठ जाव आखरी स्टेशन आ गया. तेव्हा उठून धावपळ केली आणि उतरलो. पण तिथे पँट्रीतलं समान उतरवून नंतरच गाडी तिथून जाते. म्हणून अवकाश होता. सारे तिथेच फ्रेश झाले आणि निघाले. 
          आता पुढच्या प्रवासा साठी एका गाडीची गरज होती. स्टेशन बाहेर जाऊन ती सुनिश्चित केली.आणि सारे बसलो. सॅग टपावर आणि आम्ही खाली.नागेरकॉईल ते कन्याकुमारी अवघ्या पंचवीस मिनिटांचा रस्ता. रस्ता एकदम टापटीप. वातावरण ढगाळ होतं, पाऊस आताच धरतीला हर्षुन गेला होता,अनायासे हवेत गारवा हि खेळ खेळत होता. पहाटेच्या समयी बाहेरच वातावरण मनमोहक दृष्टीस येत होतं. ते दृश्य डोळ्यात साठवत आम्ही कन्याकुमारीत कधी पोहचलो कळलं सुद्धा नाही. आमची गाडी एका प्रशस्थ अश्या हॉटेलपाशी येऊन थांबली. श्रीदेवी हॉटेल. कन्याकुमारी स्टेशन आणि बीच दोहोंच्या अगदी मधोमध स्तिथ. अगदी पायी चालत गेलं तर पाच मिनिटांच्या अंतरावर असं हॉटेल. कुठल्याही समूहामध्ये एक म्होरक्या असतो तसा आमच्यात म्हणाल तर शिवा घरत. त्यांनी जाऊन दोन खोल्या निश्चित केल्या. गाडी माघारी घालवली. कारण आता गाडीची गरज नव्हती. सारी क्षणचित्रे अगदी हाकेच्या अंतरावर. आम्हीही काय जाऊन त्या आमच्या सॅग रूममध्ये कोंडल्या आणि निघालो सूर्यदर्शन घेण्यासाठी चौपाटीवर. ढगाळ वातावरण आणि हलकी बुंदबुंदी चालू असल्याल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. पण तरीही बीच मात्र माणसांनी खचाखच भरलेला होता. आम्हीही त्यात सामील झालो. सकाळ झाली म्हंटल्यावर चहा हवाच कि नको..?? सूर्य जरी दिसत नसला तरी सकाळ अंधारात राहत नाही, याला म्हणतात तेज..सूर्यतेज..!! अथांग सागर एक नव्हे त्रिवेणी सगरांचा संगम, जमलेला आतुर जनसमुदाय या सार्यांना जरी टांगत ठेवलं असलं तरी सकाळ झाली होती आठ वाजले होते. हुडहुडी पळविण्यासाठी चहाच्या चुस्कीची गरज होती. समोरच एका सायकलवर चहाची किटली घेऊन पन्नाशीतील एक काका चहा विकत होते. आम्ही साऱ्यांनीच चहा घेतला. अगदी अप्रतिम असा. एक नंबर... तसा चहा आम्हाला पूर्ण सहलीत कुठेच प्यायला मिळाला नाही हे मात्र खर.सुर्रर्रर्रर्रर्र के पीयो...!! इथे आम्हाला एक चहाचे रुपये माफ झाले. आमचे तात्पुरती ड्रायवर शिवा घरत याना ती सवलत होती.

          पुढचा कार्यक्रम असा होता कि हाटेलवर जाऊन अंघोळी करून मग समुद्रातील स्वामी विवेकानंद स्मारक, 133 ft तिरुवल्लूवर पुतळा जेथे स्तिथ आहे तिथे बोटीने जाणे आणि मग त्रिवेणी संगम जेथे अरबी सागर, हिंदी महासागर,बंगालचा उपसागर यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.पण त्या त्रिवेणी संगमात यथेच्छ चिंब झालेला जनसमुदाय डुबकी मारताना पाहून आम्हालाही मोह आवारात आला नाही. त्या गराव्यातहि मनमोहक होऊन आम्हीही सम्मिलित


झालो आणि धुंद होऊन गेलो. पियुष तेवढा आमच्याबरोबर आला नाही. पण खूप उत्साही होता. दोन दिवसाचा सलग प्रवास करूनही हा आमचा छोटा वीर उत्साहित आणि प्रसन्न म्हणजे आमची जमेची बाजू.त्रिवेणी संगमात आमचा घुडगूस आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अमित तटावर तल्लीन होता. आम्हचं स्वागत भव्य उसळणाऱ्या लाटांनी होत होत. त्यातच समोर साठी पार केलेला म्हातारा माणूस थरथरत्या अंगानी हातात चाळण घेऊन सामुद्रसंपत्ती मोती शोधण्याचा प्रयत्नात डुबकी मारून काही काळ पाण्याखाली स्थिरावत अदृश्य होत होते. मग वर येऊन चाळणीतल्या वाळूत एखादा मोती आहे का नाही ते पडताळून पाहायचे. नसेल तर पुन्हा तेच... त्यांची ती धडपड वारंवार चालु होती.एक धागा सुखाचा अशीच काहीशी धडपड. पण आपल्या जिद्दीवर, कर्तृत्वावर....असो
        एखाद तास आम्ही त्या समुद्रमिलनात आंघोळी करून बाहेर पडलो. पण तीन समुद्राचं पाणी असूनही ते खारटच लागत होतं बरं..!! आता ट्रेनमधून नाराळीची झाडं पाहून नारळपाण्यापासून वंचित असलेले आम्ही नारळ वाला पाहून.. आम्हाला ते पिण्याचा मोह आवरता आला नाही. तदनंतर थेट आम्ही हॉटेलकडे मोर्चा वळवला. फ्रेश होऊन पुन्हा विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा पाहण्यासाठी बोटीत जाण्यासाठी तिकीट खिडकीपाशी गेलो. लांब रांग होती. तिकीट काढून आम्ही जेथे पासशे माणसं मावत असतील अश्या एका बंद गाभाऱ्यात शिरलो. तिथून एका बोटीत बसतील एवढीच माणसं मोजून सोडली जात होती. मग काय इंतजार....चौथ्या बोटीत आमचा नंबर आला आणि बोटीत बसून स्वामी विवेकानंद स्मारकपाशी आम्हाला उतरवलं तितेही तिकीट काढल्यानंतरच प्रवेश आहे.
         अप्रतिम असं स्मारक एकात्मता आणि पावित्र्य यांचे अनुपम प्रतिक , कन्याकुमारीचे  शीला स्मारक आहे. तसेच ते भारताच्या एकात्मतेचे आणि आकांक्षेचे दर्शन आहे.  भारताच्या प्राचीन स्थापत्य कलेचा मनोहर संगम आहे. ते पाहून आमी सारे दंग राहिलो. भारत वासियांनी केलेल्या कामाचे, आकांक्षांचे , योगदानाचे ते प्रतिक आहे. विवकानंद स्मारक हे कन्याकुमारी  येथील पवित्र स्थान आणि प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे . हे स्मारक भारताच्या दक्षिण टोकापासून ५०० मीटर अंतरावर समुद्रातील दोन खडकांवर आहे. विवेकानंद स्मारक समितीने  इ.स. १९७० स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधले. स्वामी विवेकानंद डिसेंबर १८९२ मध्ये याच खडकांवर ध्यानास बसले होते.पण या स्माराकांबरोबरच त्या महापुराषाना प्रतिमेत बंदिस्त न करता त्यांच्या शौर्य बलिदानाचे धडे युवा पिढीला मिळावेत त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.त्रिवेणी संगमाच्या त्या स्मारकावरावरून ते अवर्णनीय दृश्य पाहताना आम्ही सारेच भारावून गेलो.ते क्षण अमितने आपल्या कॅमेर्यात बंधिस्त केले.विशेष म्हणजे आमच्या सोबत पियुषहि उत्साहित होता. पावसाची बुंदाबुंदी चालू होती.
       तदनंतर आम्ही बोटीत बसून शेजारीच असलेल्या तिरूवल्लुवर राजाची भव्य अशी १३३ फुट प्रतिमा आहे जी स्टैच्यू ऑफ लिबर्टी प्रतिमा लक्षात ठेऊन जवळपास पाच हजार मूर्तिकरांनी अथक परिश्रम करून उभी केली आहे. त्या कुशल कारीगिरीचा नमुना डोळ्यात साठवताना नजर थक्क होऊन जाते. जवळून तो पुतळा कॅमेऱ्यात कैद होणं शक्य नाही. पण तेथून विवेकानंदांचं स्मारक मात्र अप्रतिम नजरेस पडते.

        पुढे जेवण अपोटोतून काही क्षण विश्रांती आणि नंतर संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी आम्ही चौपाटीवर गेलो. पण ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यास्त काही नजरेस पडणार नाही हे कळून चुकलं होतो. तत्पूर्वी मत्सालय पाहिलं. जेथे नाना प्रकारचे दुर्मिळ अप्रतिम मासे काचेच्या भांड्यात कैद आहेत. त्यानंतर काय तर...चौपाटीची मजा..तिथे एक गम्मत घडली. सार्वजनिक ठिकाणी तृतीय पंथी नाहीत अशी जागा क्वचितच सापडेल पण ते नक्की तृतीय पंथी असतात का हा संशोधनाचा विषय आहे. ते असे काही मागे लागतात कि जणू एखादा भुंगा फुलांवर पराग कनांसाठी गुणगुणत असतो. जोपर्यत त्याला ते प्राप्त होत नाही तोपर्यंत तो काही हातात हटत नाही. पण आमचेही वीर जरा अवलीच..!! त्यांना त्याच्या समवेत फोटो काढण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. तदनंतर शॉपिंग, जेवण  आणि हॉटेल सोडून कन्याकुमारी रेल्वेस्थानकाकडे रवाना झालो.
          आमच्या सहलीची तिसरी रात्रही रेल्वेच्या २२६२२ CAPE RMM EXP. च्या डब्यात पूर्वनिर्धारित होती. रात्री १० वाजता ट्रेन रामेश्वरकडे रवाना होणार होती तत्पुर्वी स्टेशनवर पोहचलो. ढगांचा प्रचंड गडगडाट, पाऊस नव्हता पण विजेच्या प्रकाशात आसमंत वारंवार उजळून निघत होतं. मनात एक भीती होतीच कि जर पावसाने गोंधळ घातला तर सहलीची मौज निघून जाईल. त्याच विचारात आम्ही ट्रेनमध्ये स्थानापन्न नव्हे झोपी गेलो. रात्री २ च्या आसपास पावसाने धुमाकूळ घातलाच. खिडकीतून येणारे पावसाचे थेंब गारव्यात शहारून सोडत होते. ते शहारने चालूच असताना पाम्बन ब्रिज क्रॉस करून रामेश्वरम ला सकाळी सहा वाजता पोहचलो. आणि सुखावलोही कारण पाऊस तितका नव्हता.
        पवित्र तीर्थक्षेत्र चार धामातील एक धाम रामेश्वर पण कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी कशी, र्हुदयातील भगवंत राहिला र्हुदयात उपाशी ह्या गीताशी शब्दशः सहमत मी अन कदाचित माझे मित्रही. त्या ईश्वराने निर्मिलेली , प्रत्यक्षात वास्तव्य केलेली स्थळे पाहण्याचा मानस. बाकी आपल्या आचरनातच ईश्वर असतो असा माझा ठाम विश्वास आहे. स्टेशन बाहेर पडताच एक रूम घेऊन तिथे फ्रेश झालो आणि निघालो  भ्रमंतीसाठी . हॉटेल बाहेरच गाडी होती पण ती काही आम्ही घेतली नाही. व्यवहार जमला पाहिजे ना हो..!! आणि आमचे साहेब त्यात पटाईत व्यावहारिक भाषेत माणसाला कश्या प्रकारे जाग्यावर आणायचं हे त्यांना चांगलच ठाऊक...
शेवटी बाहेर चहा घेऊन आम्ही तवेरा करून निघालो. अतिशय मनमिळाऊ माणूस होता ड्रायवर . आणि त्यांना  पर्यटकांना काय दाखवायचं हे चांगल माहित असत. तसे काही अपवाद वगळता कुणी गैरव्यवहार करीत नाही.
       सकाळी ८ च्या दरम्यान आम्ही क्षणचित्रे पाहण्यास  सुरवात केली. रामेश्वर मध्ये मंदिरं भरपूर आहेत अगदि मंदिरांचे शहर असा उल्लेख केला तरी चालेल. प्रथमतः आम्ही श्री राम पादुका तीर्थ पाहण्यास गेलो जिथे श्री रामाने वास्तव्य केल होतं असं स्थानिक लोकांच म्हणन आहे. तदनंतर हनुमान मंदिर, राम कुंड, पाण्यात तरंगणारे दगड जे सेतू बांधण्यासाठी वापरन्यात आले होते.ते पाहत पाहत जात असताना आमची गाडी रोडच्या कडेला विसावली.

       एक पवित्र स्थान जेथे तुमची छाती गर्वाने आणि अभिमानाने भरून येते. त्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यास आम्ही तत्त्पर होतो.भारताचे अकरावे राष्ट्रपती,लोकांचे राष्ट्रपती, पद्मभूषण,पद्मविभूषण,भारतरत्न सन्मानित,विज्ञानाचे परम भोक्ते, थोर वैज्ञानिक, युवकांना सदैव प्रेरणा देणारे, ज्यांच्या भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे ते...डॉ.अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम  यांना जिथे भारतीय इतमामात आदरांजली  दिली गेली ते ठिकाण.जेथे एक देशभक्त धरनिमातेची चादर ओढून निवांत निद्रिस्त आहे. धन्य जाहलो. त्यांच्याबद्दल मी काय लिहावं. सद्यस्तीथ फार अशी वर्दळ नसते. सरकारी कर्मचारी (पोलीस) मात्र पहार्यास आहेत.पण स्मारकाचे काम चालू आहे.
      त्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आम्ही  पाम्बन ब्रिज कडे रवाना झालो. रामेश्वर हे भारताच्या मुख्य भूमीपासून तुटलेलं बेट. आणि त्याला जोडणारा दुवा म्हणजेच पाम्बन ब्रिज. चारशे वर्षापूर्वी इथे दगडाचा पूल होता जो कृष्णप्पनायकन राजाने बांधला होता पण त्याचा निभाव सागरी लाटांपुडे लागला नाही.. तदनंतर इंग्रज काळात एका जर्मन इंजिनियरच्या सहाय्याने इथे रेल्वे पूल बांधला गेला. ह्या पुलाची लांबी आहे  २३४० मीटर. अभूतपूर्व आणि शर्थीच काम. हा पूल मधून सागरी जहाजांच्या आवागमनासाठी खुला केला जातो. अप्रतिम इंजीनियरिंग चा हा नमुना आहे. त्या पुलाखालून दक्षिणेकडून उत्तरेस सागराचे पाणी वाहताना दिसते. हा सागर असूनही नदी असल्याचा भास होतो.अर्थात हे पाहण्यासाठी त्याच्या शेजारीच असलेला राष्ट्रीय महामार्ग ४९ तोही पूल कुशल कारीगारीचा उत्तम नमुना आहे. हा पूल २ ऑक्टोंबर १९८८ रोजी पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हस्ते नागरिकांसाठी खुला करण्यात आला. त्या पुलावरून जी आम्ही निसर्गाची भव्यता अनुभवली ती भूतो न भविष्यती.आणि आमच्या पियुषला कुठलीही कारीगिरी म्हंटली म्हणजे मेजवानीच.




       तद्नंतर रामसेतू पाहण्यासाठी आम्ही त्या दिशेने रवाना झालो. रामेश्वर द्वीप आणि श्रीलंकेतील मन्नार द्वीप यांना यांना जोडणारा. तेथिल सध्यस्तीथ अवषेश पाहता सागरी भूमिगत पूल असावा असा काहींसा कयास तर प्रभू श्री रामभक्त वानर सेनेने बांधलेला रामसेतू असे भिन्न मतप्रवाह आहेत. हा सेतू  ४८ किलोमीटर लांबीचा आहे आजही येथे उथळ पाण्यामुळे सागरी लाटांच अस्तित्व असतं. ज्या आपल्याला इथे पूल असल्याची ग्वाही देतात. हा पूल सागराच्या वर स्तिथ होता. पण १४८० साली आलेल्या सागरी वादळाने तो उध्वस्त झाल्याचे सांगितले जाते. त्या पुलापर्यंत जाण्यासाठी  बसेस आहेत. ज्या खास वाळूच्या रस्त्यातून सफर करतात.
     तिथून माघारी फिरून आम्ही  रामेश्वर स्तिथ डॉ. अब्दुल कलाम यांच्या निवासस्थानी पोहचलो जिथे त्यांच्या आयुष्याची सफर आणि त्यात अथक परिश्रमाने, देशभक्तीने प्रेरित होऊन मिळवलेली ऐवज जी सन्मान चिन्हाने ओतप्रोत भरलेली संग्रहित केली आहे ते पाहण्यासाठी आम्ही गेलो. ते स्मारक पाहून आम्ही सारेच थक्क झालो. देशाच्या सेवेसाठी त्यांना गौरान्वित केलेल्या सार्याच क्षणाची क्षणचित्रे आणि स्मृतीचिन्ह तिथे सजविले आहेत.आमच्याबरोबरच आमचा लहानगा पियुष ज्याला वैज्ञानिक क्षेत्रात लहानपणापासूनच अधिक रुची आहे. सारेच भारावून गेलो.
       नंतर जेवण करून आम्ही हॉटेलवर आलो. इथे मात्र इतकी मस्ती केली कि सारे पोट दुखोस्तोवर हसले. ते आमचे आहेत ना..!! रमेश राउत...एखाद मुद्दा असा काही रंगवतात कि विचारूच नका... एक हसवणारं व्यक्तिमत्व. असो आता पुढचा प्रवास होता.RMM TPTY Exp. 16780 ने जी संध्याकाळी ४.२८ ला रामेश्वर हून सुटते त्या अनारक्षित ट्रेनने आम्ही मदुराई कडे रवाना झालो. पुन्हा त्याच ब्रिजचे ते भव्य रूप न्याहाळत  पाम्बन ब्रिज पार करून रामेश्वरम मागे
 
टाकत आम्ही पुडे सरत होतो. तिरुपती अति प्रजन्य वृष्टीमुळे  पाण्याखाली होती. म्हणूनच ट्रेन इतकी खाली होती. निवांत सफर झाली. आमचं नशीब मात्र आमच्यावर मेहरबान होत. आम्ही जिथे जयायचो तिथे या तर पाऊस पडून गेलेला असायचा नाहीतर आम्ही तिथून निघाल्यावर पडायचा. ते निसर्गाच रूप भुरळ पडणारं होतं. मंडपम ते परमकुडी हा प्रवास आमच्या सार्यांच्याच सदैव स्मरणात राहील. इथे जे आम्ही ट्रेनमधून मोर पहिले जे मोजता न येण्यासारखे. काय तो नजारा होता..!! जिथे पहावं तिथे रस्त्याच्या दुतर्फा मोरच मोर....वल्लाह..!!! दिल खुश हो गया... ते सौंदर्य डोळ्यात आणि र्हुदयात साठवून आम्ही सहाच्या सुमारास मदुराई ला पोहचलो.
       विश्व प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर असलेले हे शहर. या शहरास प्राचीन मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. लागलीच स्टेशन च्या बाहेर निघून रात्री राहण्याची सोय आणि पुढच्या म्हणजेच थेकडी , मुन्नार आणि कोचीन साठी जाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मी आणि साहेब एका हमाल काकांबरोबर बाहेर पडलो. खरतर त्यांनीच आम्हाला नेलं. पण कुठल्याही व्यवहारात निपूण असलेले आमचे साहेब( शिवा घरत ) सोबतीला होते म्हणजे काळजी कसली...? स्टेशन च्या बाहेर पूर्वेस रस्ता ओलांडून सरकारमान्य सूर्या टूर आणि travals मध्ये . तिथे चर्चा करून आजची आणि पुढल्या तीन दिवसाची राहण्याची आणि गाडीची सोय ( तवेरा ) करून घेतली. आणि आंम्ही सारे हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आणि बाहेर पडलो . मीनाक्षी मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी. आमच्या राहत्या ठिकाणाहून अवघ्या पाच मिनिटांवर मंदिर होते. एकंदरीत बाहेरचा परिसर गजबजलेला दुकानच दुकानं....काहीही घ्या म्हणजे विकत बर का..??

      चला मंदिराकडे वळूया. १६ व्या शतकात बांधलेलं दक्षिण भारतीय वास्तू  शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल  हे मंदिर. शिवशंकराची भार्या पार्वती म्हणजेच मीनाक्षी हि त्या मंदिरात देवस्थानी आहे.या मंदिराचे तब्बल १६० फुट उंचीचे चार खालून वरपर्यंत अनेक देवतांचे, राक्षसांचे रेखीव भव्य पुतळ्यांनी ते मडलेले असे प्रवेशद्वार आहेत. जे मंदिराचे खास आकर्षण आहे. मंदिराच्या आतील स्तंभ मंडपातील अनेक स्तंभ देवी मीनाक्षी (पार्वती) आणि सुन्दरेश्वर (महादेव) यांच्या विवाह दृश्याने शिल्प बद्ध आहेत. जवळजवळ ९८० च्या आसपास हे स्तंभ सुंदरतेच्या बाबतीत ओतप्रोत परिपूर्ण आहेत. मंदिराच्या मधोमध स्वर्ण कमळ स्तिथ पवित्र तलाव आहे. जो जवळ जवळ १६० x १२० फुट असावा.प्रत्येक दिवशी इथे हजारो भक्त आणि कलेचे पुजारी भेट देत असतात.
         रात्री आठ वाजता आम्ही मंदिरात दर्शानासाठी गेलो. आम्ही काही झालं तरी मुंबैवले गेलो मोठ्या ऐटीत ३/४ वर तसे आता सारेच घालतात म्हणा...!!!  पण तसले चोचले त्या मंदिरात नाही चालत ..!! आणि खरं आहे. मी बाहेर कsaही वावरत असलो तरी आपल्या संस्कृतीची आपल्याला जान मला असायला हवी. कुठेही कसही वावरायचं हि लक्षणं ठीक नाहीत. प्रत्येक ठिकाणी नियम असायला हवेत असे नाही. माझेही काही स्वतःचे नियम असायला हवेत.असो हे झाले माझे मत..मग काय जे पूर्ण कपड्यानिशी होते ते आत आणि आम्ही बाहेर..!! 
          बाकीचे मग सकाळी दर्शन घेऊन आम्ही ठरल्या वेळेत थेकडी साठी रवाना झालो. वाटेत मस्त चहा नाश्ता करून वाट वळनाची काही डोंगरांची संग करत आम्ही दुपारी दोनच्या आसपास थेकडीला विश्राम गृहा पाशी येऊन थडकलो. आधीच हॉटेल आरक्षित असल्यामुळे काही त्रास झाला नाही. पण लगातार चार तासाच्या प्रवासात सारे पेंगले मात्र होते.
      सारे फ्रेश होऊन मग जेवण केलं. आणि निघालो प्रथम अजेंड्यावर अभयारण्याचे प्रवेश द्वार तिकीट काढायचे असते. तिथून आत असलेल्या नदीत बोटीच्या तिकिटांसाठी वेगळी खिडकी मग तिथून पुढचा बोटीतला प्रवास आणि आपण एका नामांकित अभयारण्याच्या निसर्ग सानिध्यात वावरू शकतो ते हि बंधनात.बोंबला``!! पण जागा पूर्ण आरक्षित झाल्यामुळे
तिकीट काही मिळाल नाही. दुसर्या दिवशी सकाळी लवकर येऊन ते बुक करावं लागणार होतं. तिथून काहीसे नाराज होऊन आम्ही हत्तींची सवारी पाहायला गेलो. इथे हत्तींबरोबर फोटो, हत्तीवर सफर, हत्तीला खाऊ घालणे वगैरे अनेक प्रकार होते. कार्यक्रमाची वेळ आणि प्रकारानुसार माणशी साडेतीनशे ते १२०० असे दर होते. हत्तीही अतिशय देखणे होते.पण आमच्यापैकी कुणालाटी सैर करावी अशी वाटली नाही. अगदी पियुषलाही...!!
     पुढे आम्ही मसाल्याचे पदार्थ असणाऱ्या वाडीत जाण्याचा निर्णय घेतला आणि पोहचलोही. तशी पाहण्यासारखी ठिकाणे फार अश दूर  अंतरावर नाहीयेत. बऱ्याच एकर मध्ये हि पसरलेली वाडी. इथे पर माणसी १०० रु  सोबत एक माहिती देण्यासाठी  गाईड हि येतो.
तो आपल्याला सार्या वनस्पतीची अगदी सविस्तर माहिती देतो. मसाल्याचे हरेक पदार्थ त्या वाडीत लावले होते. खाली कॉफीच उत्पादन काडणारी प्रक्रिया आणि त्या मशनिरीची त्याने आम्हास सविस्तर माहिती दिली. सार्यात अप्रूव्ह वाटलं ते वेळची आणि लिंबूच एकंदरीत माहिती दृष्टीने हे ठिकाण ठीक वाटलं...
      तदनंतर गेलो कत्थकअली पाहण्यासाठी. खरतर फार उत्सुकता होती पण तितकासा आनंद तिथेही मिळाला नाही. त्यांच्या संस्कृतीचा भाग असला तरी तो आपल्याला रुचत नाही एका विशिष्ठ वेळेनंतर आपण निरस होत जातो. त्यांची कला, सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव ज्यात पूर्ण गोष्ट दडलेली असते ती आपल्याला समजन महत्वाच असतं अन्यथा व्यर्थ आहे. त्यांच्या कलेला दाद द्यायला हवी त्यात दुमत नाहीये.
      केरळ ,केळी आणि नारळ याचं अतूट नात आहे. इथे केळ्यांचा वेफर खूप प्रसिद्ध आहे. त्याची आणि इतर काही खरेदी करण्यात आम्ही व्यस्त होतो. रात्रीचे आठ वाजले असतील लक्ष एका रांगेकडे गेलं. बर ती राशनची वा इतर कसलीही रांग नव्हती तर चक्क दारूची विकत घेणाऱ्यांची रांग होती पण लाजा सोडलेले.... दारुडे नाही म्हणता येणार पण शौकीन म्हणायला हरकत नाही. "शौक बहुत बडी चीज होती है क्या करे" ....असो.... मग जेवण करून झोपी गेलो . सकाळी लवकर उठून तिकीट काढायचे होते.
       सकाळी सहा वाजता मी आणि साहेब गेलो. खाली उतरलो आणि तिकिट घराकडे गेलो. तिकिट विक्री सुरु झाली व वाहने हलु लागली. एकदाचे तिकिट मिळाले. साडेसातच्या फेरीची तिकिटे मिळाली होती. दहाला दुसरी फेरी होती, पण इतक्या उशीरा बोटीने जाण्यात मजा नाही. नदी काठी प्राणी सकाळी आढळतात व दिवस चढु लागताच ते आत जंगलात गायब होतात. तसे साडे सातच्या फेरीलाही गायबच होते. शिवाय सकाळपासुन उठुन बसलेले आणि चहा न बाहेर पडलेले आम्ही रिकाम्या पोटी, अंघोळही केलेली नाही असे तिथे ताटकळणे शक्य नव्हते. जंगलाचे आवार पाहुन एक दोन प्राणी सोडले तर नजरेस काही पडल नाही. निराश होऊन परतलो. हॉटेलवर फ्रेश होऊन मुन्नार कडे रवाना झालो.
       केरळमध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे. पण मला जर कुणी विचारले की केरळात पाहण्यासारखे काय आहे? तर मी सांगेन - 'केरळ'. प्रसिद्ध वा प्रेक्षणिय स्थळांबरोबरच रस्त्याने जाताना वाटेत दिसणारे निसर्गाचे रूप पाहणे हे निश्चितच एक अनुभव आहे. प्रत्येक वळणावर नवे चित्र. म्हणुनच थेकडी ते मुन्नार हा पाच तासाचा प्रवास मला एखाद्या पर्वणीसारखा वाटला. डोंगर दर्या आणि वळणाचे रस्ते असल्याने सार्यांनीच निसर्ग सौदर्य हर्ष मनाने डोळ्यात साठवले काही अपवाद वगळता... आणि मुख्य म्हणजे लांबच्या लांब पसरलेले चहाचे मळे. एका शिस्तीत आणि लयबद्ध पद्धतीने डोंगर दर्यात वसले होते.
        आम्ही दुपारी साडे तीनच्या सुमारास पोहचलो. गारवा तसा कमीच होता. पण आपल महाबळेश्वर कैक पटीने चांगल आहे हे मुद्दामहून नमूद करावस वाटत.म्हणूनच इथे काही स्थळे पहाण्याचे आम्ही टाळले. चहाचे मळे सोडले तर बाकी वेगळ असं काही नाही. नंतर आम्ही आधीच बुक असलेल्या हॉटेलचा ताबा घेतला. आणि फ्रेश होऊन मार्केट मध्ये गेलो. इथे चॉकलेट बाकी झकास मिळतात.पुन्हा तीच रात्र,तीच मस्ती. आज आद्यचा वाढदिवस कल्पेश (गुरूचा) मुलगा. तो आम्ही मुन्नारमध्ये हॉटेलवर साजरा केला. केक गुरु आणि पियुषने मिळून कापला. तेवढी धमाल केली बाबा मुन्नारला..!! सकाळी एक दोन पॉईंट करून कोचिनकडे मार्गस्थ झालो.

       तारीख २६.११.२०१५ आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. कोचिन तसे  गजबजलेले शहर.अरबी सागर किनार्यावर स्थित असलेले शहर आणि इतिहासाची पार्श्वभूमी असलेले अप्tरतिम बंदर. येथील शिपयार्ड पाहण्यासारखे आहे.संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्ही तिथे पोहचलो. तदनंतर थेट कोचीनआंतरराष्ट्रीय विमानातला शेजारी हॉटेल मध्ये खोली घेऊन फ्रेश झालो. जेवण वैगरे उरकले आणि सारेच खुश होते आमची सहल आनंदाने,अति उल्हासवर्धक आणि सुखरूप पार पडली होती.सर्वजन आतुरतेने उद्याची पहाट कधी होईल याची वाट पाहत होते. आमच्यातल्या काहींनी विमानाचा प्रवास पूर्वी केला होतं तर काही अगदी नवीन होते.
    खरतर आम्ही मुद्दामहून विमानाचा प्रवास हा परतीच्या दिवशी ठेवला होता. सकाळी ६.२० ची फ्लाईट असल्यामुळे आम्हाला दोन तास आधीच विमानतळावर जान अपेक्षित होते. आणी योगायोगाने कोचीन आणि मुंबई दोन्होही ठिकाणी आमचं प्रस्थान आणि आगमन आंतरराष्ट्रीय टर्मिनल वरच होते.२७ तारखेची पाहट सर्व आवरून आम्ही रिक्षा करून विमानतळावर ४.२० ला पोहचलो. पूर्णपणे सौरउर्जेच्या वापर करून कामकाज करणारे पहिले विमानतळ बनण्याचा मान केरळमधील कोचीन विमानतळाने हस्तगत केला आहे.चेक इन करून बॅगा लगेज बेल्टवर रवाना केल्या आणि आम्ही मध्ये एन्ट्री केली.आता प्रतीक्षा.. चहा कॉफी आणि फोटोचा कार्यक्रम चालू होता. विमाणात पहिल्यांदाच बसनार म्हणुन काहींना कमालीची ऊत्सुकता होती.शेवटी उत्सुकता संपली गेट उघडला. आम्हाला बसने विमानापाशी नेण्यात आले.
       समोरच ऐअर इंडिया एक्स्प्रेस IX-402 आमच्या प्रतीक्षेत उभे होते. शेवटी आम्ही मुंबईकर. काय टाप त्याची आम्हाला सोडून जायची....तिथेही फोटो शेषन करून आम्ही आत प्रवेश केला. हवाई सुंदरीने आम्हाचं स्वागत केलं. खरतर त्या हवाई सुंदरींना इच्छा नसतानाही काही वेळेस आपल्याशी बळजबरीने हसावं लागतं .शेवटी ते क्षेत्रच असं आहे कि पर्याय नाही.  जेंव्हा विमान उड्डान घेतं तेंव्हा एवढ मोठे धुड आकाशात कसं झेप घेत ह्याचे मला आजही राहून राहून आश्चर्य वाटतं. उड्डानानंतर लगेच आपल्या ओळखिच्या जागा शोधून काढण्याचा खेळ खेळला जातो. विमानाच्या खिडकीतून बाहेर बघणेही एन्जोय करायला हवं.तीन जागा खिडकीजवळ जागा मिळाल्या होत्या. ढगांच्या मधून जाताना अजूनही मन ढग पकडून ठेवायचा प्रयत्न करते. कधीतरी दुरवर नुसता ढगांचा समुद्र असतो, निळ आकाश, ढग आणि आपण एवढच. नदीची वळण दिसतात.
        त्या अवकाशात भ्रमण करत असताना मुंबई कधी आली हे सुद्धा कळल नाही. अवघ्या दोन तासात कोचीन ते मुंबई.आणि जातेवेळेस दोन दिवस......आणि पोहचलो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई...

बाॅंबेला मुंबई आणि मुंबईच्या विमानतळाला छत्रपति शिवाजी नाव देऊन महाराजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेउन बाळासाहेबांनी शिवभक्त असल्याची खरी ओळख दिली.. प्रत्येकाला छत्रपति शिवाजी हे नाव आदराने घ्यावच लागत..! नुसतं शिवाजी नाही..छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ!!!!
आधुनिक सुविधांचे जागतिक दर्जाचे टी २ टर्मिनल आणि त्याला महाराजांचं नाव.कीती अभिमानाची गोष्ट. पण ते कार्यान्वित झाल्याला आता वर्ष दिड वर्ष उलटले. टर्मिनलने अनेक पुरस्कार मिळविले.
     आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यामागची भूमिका परदेशातून महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवणार्‍या प्रत्येकाला हा महाराष्ट्र कोणाचा आहे याची जाण व्हावी व महाराजांना सलाम करूनच महाराष्ट्रात पाऊल टाकावे, हिआहे.  
     विमानातून उतरले की एक पासपोर्टवर शिक्का लागला की थेट गमन बग्गेज क्लेम कडे. तिकडेही बरेचवेळा तात्कळत रहावे लागते. बेल्ट वरून बॅग उचलण्याची धड्पड चालू असते. एकदा ती हातात आली की मग प्रवास संपला. प्रवास संपला की पुन्हा एक उदासिनता निर्माण होते. पण आमचा उत्साह होताच पालघर जे गाठायचे होते. पुन्हा रिक्षा आणि रेल्वेचा प्रवास .....
       एकंदरीतच सहल एकदम भन्नाट झाली.....
शिवा डेकोरेशन ग्रुप पालघर, धनसार 
नितेश पाटील (पालघर,धनसार)
९६३७१३८०३१