Saturday, December 5, 2015

चेहऱ्यांची किमया

#चेहऱ्यांचीकिमया

      परमेश्वराने जीवाची उत्पत्ती केली असं वेदांचे, पुरणाचे म्हणने आहे.त्यात कैक प्रकारचे जीव येतात.त्या साऱ्यात देवाला मानणारा प्राणी म्हणाल तर माणूस. माणूस आहे म्हणून देवाचं अस्तित्व आहे.आणि देव आहे म्हणून जीवांच अस्तित्व आहे. हे नाकारता येणार नाही. शेवटी श्रद्धा नाही असा माणूस या भूतलावर नाही.ती कसली का होईना.!!. श्रद्धा म्हणजेच परमेश्वर म्हंटल तर वावगं ठरणार नाही.
        जनावरांना भावना असल्या तरी त्याची फारसी कदर कुणी करत नाही.इथे माणसाची कदर केली जात नाही तिथे जनावरांच काय म्हणा..!! पण आपण निरखून पाहिलं तर कळेल कि जनावरांच्या चेहऱ्यांमध्ये बहुतांशी साम्य असतं. त्यांना नावं कमी असतात. त्यांना गाय, बैल, बकरी, वाघ, सिंह वैगरे...अश्या नावानेच जास्त ओळखले जाते.
         माणसाना मात्र प्रत्येकाला नावं असतात.हा त्या नावात साम्य (१००%)असू शकतं पण चेहऱ्यात नाही. मला हा प्रश्न नेहमीच पडतो. या विश्वात अब्जावधी लोकं आहेत पण त्यांच्या चेहऱ्यामध्ये साम्य का नसावं ? (काही अपवाद वगळता) बरं चेहरा दिसतो तशीच ती व्यक्ती असेल असही सांगता येत नाही. हल्ली चेहर्यावर नाना प्रकारचे मुखवटे असतात ते वेगळे.साहजिकच विचारातही भिन्नता असते. पण हा नश्वरनिष्ठ माणूस चेहऱ्यांवरच भाळतो हे मात्र नक्की...
          आता हा प्रश्न राहिला. हे असं असण्यामागे नेमकं कारण काय ? त्यात नर आणि नारी याबाबतीत विचार केला कि डोकं आणखीन चक्रावून जातं. काय किमया असेल ना परमेश्वराची ? असो पण त्याचही पत माणूस घ्यायला बसलाय. या कलयुगात काही सांगता येत नाही हो..!!
शेवटी माणसाने माणूस धर्म पाळला पाहिजे.माणसात धर्माच्याही व्याख्या वेगवेगळ्या झालेल्या दिसून येतात. ईश्वराने माणूस निर्माण केला आणि माणसाने धर्म,जाती,पोटजाती निर्माण केल्या.माणूस धर्म पाळणं तस अवघड नसतं. वेळेवेळी आपल्या पुढयातील माणूस धर्म आपण पळाला पाहिजे.उदा....एखादी नारी जेव्हा आई होते तेव्हा ती आईचा धर्म निस्वार्थीपणाने आपला जीव ओवाळून पाळते अगदी त्याप्रमाणे.....
असो काही झालं, माणूस कितीही प्रगत झाला तरीही तो नैसर्गिक किमया घडवू शकत नाही. ती लीला परमेश्वराचीच.....
नावाने जरी ओळखत असलो आपण
चेहऱ्याची ती किमया आहे...
अब्जावधी लोकांमध्ये
कितीस साम्य आहे...?
.......नितेश पाटील
९६३७१३८०३१

No comments: