परीस
परीसाच्या स्पर्शाने सोनं होत असं म्हणतात..!!
पण वस्तुरूप सोनं होण्यापेक्षा मनाचं सोनं झालेलं केव्हाही उत्तम. आज या कलयुगात, स्वार्थाच्या दुनियेत माणूस सत्ता, संपत्तीच्या मागे स्वस्वार्थासाठी अनासये धावतोय.आणि हे नश्वर असलं तरी ते मिळवण्याची पराकाष्ठा तो करीत आहे. स्वतःच आयुष्य जर परीसात रूपांतरित केलं तर इतरांच्या देहाचं सोनं करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पण या क्षणभंगुर दुनियेत तो स्वतःच अस्तित्व कुठेतरी विसरला आहे.
एका लोखंडाच्या डबीत परीस आहे. नियमाने ती डबी सोन्याची झाली पाहिजे कि नाही ? पण ती डबी सोन्याची होत नाही.याचा अर्थ त्या डबीत परीस नाही का ? त्या डबीत परीस आहे पण... इथे पण फार महत्वाचा आहे. त्या डबीत परीस आहे पण तो कागदात गुंडाळलेला आहे. त्याच प्रमाणे माणसात ईश्वर आहे. पण माया, मोह, मद, मत्सर, मीतूपणा, अहंकार यात तो गुरफटला आहे. हे सहा गुण धुतल्याशिवाय, बाजूला सारल्याशिवाय मानवरूपी देहाचं परीसात, इश्वरात रूपांतर होणं शक्य नाही.
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो.एक अशी संधी येत असते कि आपल्या जीवनाचं परीस नव्हे तर निदान सोनं तरी करता येणं शक्य असतं. कधी आई- वडिलांच्या रूपाने, कधी गुरुजनांच्या रुपाने, कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने, कधी मित्र-मैत्रिणीच्या नात्याने, कधी प्रेयसीच्या नात्याने. कोणत्या ना कोणत्या रूपात परीसाची संगत आपल्याला लाभत असते.
सर्वात महत्वाचं म्हणजे खरोखरच आपल्याला आपल्यातल्या लोखंडाचे सोने करायचं असेल वा परीस बनायचं असेल तर आज आपल्याला संतांच्या थोर विचारांची संतसंगतीची गरज आहे. आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो.पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात. आणि आज ज्या संतांचे, थोर महापुरुषांचे वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील सगुण मंडळींचे गोडवे गातो. त्यांनी आपलं आयुष्य जनहितासाठी परीसप्रमाणे लोखंडाला सोनं करण्यासाठी खर्ची घातलंय हे नाकारता येणार नाही.
आता आपल्याला विचार करायला हवा कि आता आपण परीस व्हायचं, सोनं व्हायचं,कि लोखंड बनून आजन्म हतोडीचे दणके सहन करीत राहायचं...!!!
.......नीतेश पाटील
९६३७१३८०३१
No comments:
Post a Comment