Saturday, December 19, 2015

विचारांचा प्रचार प्रसार

चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार
तितक्या लवकर होत नाही
जितक्या लवकर वाईट गोष्टींचा होतो
           वाईट गोष्टी वादाच्या भोवऱ्यात असल्यामुळे
लोकांनाही त्या गोष्टीकडे पाहण्याची एक भलतीच उत्सुकता आणि ओढ असते, त्यामुळे वाईट असणारी गोष्ट ही अधिक प्रसिद्धीझोतात येत असते. आणि त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत असतो.याचं खरं कारण म्हणजे मतभिन्नता.एकाच आईच्या उदारातून जन्म घेणारी, तिच्या कुशीत वाढणारी, तिच्या संस्कारातून बहरणारी मुलही एकमेकांविरोधात उभी ठाकतात तिथं दुसऱ्याचं काय म्हणा...!!!! परंपरेनुसार मतभिन्नता आपसूकच माणसामध्ये येत असते.भारतवर्षात रूढी परंपरेचा डंका अधिक प्रमाणातच आहे. त्या रूढी परंपरेला जागणारा, मानणारा समुदाय सृजन, सुविचारधीन असला तरी माणसाला माणसापासून वेगळा करणारा आहे हे नाकारता येणार नाही.
             मग आपापसात झगडे, लढाई, त्यातून निर्माण झालेले वैयक्तिक वाद, वैमनस्य, माणसाने माणसाच्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या वाईट गोष्टींचा परीणाम कुठेतरी साऱ्याच मानवजातीवर पडत असतो. विचारांची देवाणघेवाण जरी माणूस करत असला तरी आज वाईट विचारांच्या जाळ्यात माणूस कुठेतरी गुरफटत चालला आहे. वाईट गोष्टी म्हणण्याचं कारण इतकच कि कुठलाही विचार जर माणसाला माणसापासून , मणुसकीपासून तोडत असेल तर तो चांगला विचार कसा होऊ शकतो ?
         याउलट आपल्या भारत वर्षात अनेक साधुसंत, महात्मा, थोर महापुरुषांची परंपरा असूनही, त्या थोरांचे विचार सहज,सोपे जनकल्याणकारी असूनही त्याचा प्रसार कमी होताना दिसतो. आणि काही समाजकंटक, महाभाग असेही आहेत कि त्या विचारांच भांडवल करून स्वस्वार्थासाठी माणसाना आपापसात लढवत आहेत.दोष त्यांचा नसावा कुठेतरी आपला अभ्यास, ज्ञान आज कमी पडत आहे. आपण सुखासाठी इतके  आतुर झालोत कि आपल्याला दुसऱ्या कशातही स्वारस्य राहिलेलं नाही. फक्त सुख पाहिजे. आपला अभ्यास फक्त पदाव्यांपूर्ती मर्यादित नसावा तर जनहितार्थ ज्ञान आपण कमावलं पाहिजे. ते संत संगतीने कमावता येईल यात शंका नसावी. आणि त्या संतविचारांचा प्रसार करायला हवा.
........नितेश पाटील
९६३७१३८०३१

No comments: