Saturday, December 19, 2015

पुस्तकं

सस्नेह जय शिवराय...    १२.१२.२०१५
पुस्तकं

      थोर महापुरुषांची, वीरांची गाथा संपूर्ण जगात सर्वश्रुत असते. ती पुस्तकं, त्यातील संदर्भ, इतिहासातील दाखले, काही कागदपत्र, शिलालेख आणि बरच काही. आणि ते मिळवण्यासाठी धेय्यवेड्या साहित्यिकांनी जीवाचं रान करून आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालून ती कमावलेली ऐवज असते. त्याचा काही मोबदला मिळवा म्हणून ते काही हे कार्य करीत नसतात.पुढच्या पिढीला इतिहासाची अनुभूती यावी , सुसंस्कार घडावेत, राष्ट्रप्रेम जागृत व्हावं इतकीच काय ती मनीषा असावी.
      अस असताना एखादा असाही लेखक असु शकतो कि त्याचे विचार नेमके उलट प्रवाही असू शकतात .एखादा मजकूर पुस्तकात असा काही लिहून जातात कि वाचणाऱ्याच्या मनात द्विधा परिस्तिथी उत्पन्न होते. आणि मग विचारांच युद्ध चालू होतं. मनात आणि आपसूकच समाजातही. हा आता त्यात कोण जिंकतो हे ज्याच्या त्याच्या ज्ञान क्षमतेवर अवलंबून असत.शेवटी काय आत्मसात करावं काय नाही याचा सर्वस्वी हक्क आपलाच तर असतो ...!!! पण काही जरी असल तरी विजय नेहमी सत्याचा, अचूक योग्य विधानांचा होत असतो.
      थोर महापुरुष, साधु, संत यांच्याबद्दल तुम्ही आम्ही सांगण्याची गरज नाही . इतक्या कालांतरा नंतरही त्यांची कीर्ती अजरामर असेल तर ती उगाच नाही.समाज सकारात्मक विचाराने घडत असतो.नकारात्मक विचाराने बिघडत असतो. काही लोकं जी नकारात्मक विचार मांडतात त्यावरून काय सिद्ध करू पाहतात हे मला माहित नाही किव्हा मला त्या वादात हि पडायचं नाही.
      पण आपण आजची परिस्तिथी लक्षात घेतली पाहिजे. आज जी जगामध्ये अराजकता दिसतेय त्यामागे निश्चितच नकारात्मक विचार असणाऱ्या निधर्मी लोकांचा हात आहे हे नकारता येणार नाही.  आज समाजाला चांगल्या विचारांची गरज आहे. भडकाऊ मुद्दे उपस्तीथ करून किव्हा तशी परिस्तिथी निर्माण करून काय सिद्ध करू पाहतात देवच जाने. पण त्यात माणूस सामान्य माणसाच नुकसान करतो हे मात्र नक्की. प्रपंचाची चिंता असतेच त्यात समाजात निर्माण झालेल्या वादाला इच्छा नसली तरी तोंड देणं चुकत नाही.
       मुद्दा हा आहे कि आपण इतिहासातून आजवर काय शिकलो. इतिहासात म्हणा किव्हा समाजात, जगात म्हणा. मतप्रवाहमध्ये भिन्नता असते नव्हे ती आहेच आणि त्याचा फायदा काही दळभद्री लोकं घेत असतात. अशी लोकं निधर्मी असतात त्यांना समाजाशी, धर्माशी काही देणंघेणं नसतं.ते फक्त आणि फक्त स्वस्वार्थासाठी जगत असतात हि वस्तुस्तिथी आहे.
       इतिहासात जशी महापुरुषांच गुणगौरव, सचरित्र इमाने वदनारी ,साक्षी पूराव्यांचा संदर्भ देणारी जनहितार्थ सक्षम असणारी पुस्तकं अमाप आहेत. ती गौरांवित झालेली आहेत. या भारत वर्षात लेखकांची कमी नाही. अगणित लेखक आहेत .त्या त्या लेखकाला मानणारा , त्यांच्या विचारांच समर्थन करणारा वर्गही निःसंशय असतो. पण त्या पुस्तकात लेखकाचं त्याला आलेल्या प्रचितीच त्याच वैयक्तिक मत तो प्रदर्शित करीत असतो.
     ते सत्य असत्य लागलीच ठरावण्यापेक्षा आपण आजवर मिळवलेल्या ज्ञानातून चिंतन करून पडताळून पाहणं गरजेचं असतं. अन्यथा ते इतरांसमोर प्रदर्शित करू नये.
       आज जरी मी हे बोलतोय ते तुम्हाला पटलेच असं नाही हे माझं वैयक्तिक मत आहे.ते चूक कि बरोबर सत्य कि असत्य हे ठरवण्याची क्षमता भावनेच्या आहारी न जाता ज्ञानावर ती अवलंबून असावी.
      काहीही प्रदर्शित करताना आपण त्या मताशी व्यक्तिशः पूर्णतः डोक्याने सहमत असाल तरच ते प्रदर्शित करावं.
शेवटी वैयक्तिक पुस्तके हि समाजातील प्रतिष्ठित संस्थेची,माणसाची असली तरी ती प्रत्येकाला पटतीलच असं मला तरी वाटत नाही.
   हे सांगायचं कारण इतकच कि कोणीही उठतो महापुरुषांचा अपमानास्पद मजकूर टाकून नंतर एखाद्या पुस्तकाचा दाखला देतो आणि मोकळा होतो.
काय राव...!!! चांगलं आहे ते घ्यावं माणसांनी. इतरांचा आत्मा दुखेल अश्या प्रकारचे मजकूर बाजूला सारवेत. काय बिघडत त्यात ? राहूदे की तो तिथेच पडुन. बघा जमतंय का....!!!

....नितेश पाटील
९६३७१३८०३१

No comments: