कविवर्य मंगेश पाडगावकर यांना
भावपूर्ण श्रद्धांजली....
यु तो कई लोग
आये दिन मर जाते है ।
जहाँ में कुछ लोग ही
जिंदा रह जाते है ।।
माना कि यहाँ गिनती
इंसानो कि होती है ।
याद वही रहते है
जो इन्सानियत निभाते है ।।
प्यार हर कोई करता है
यहाँ जिंदगी से ।
जो प्यार करना सिखायें
वो अमर हो जाते है ।।
दिवाने जिसके लोग
इस दुनीया में ।
आसमाँ के चांद, तारे
कहा छुट पाते है ।।
कई दशको तक
मैफ़ीले सजाई आपने ।
आज थम सा गया वो वक्त
नम आखों से तुझे सलाम करते है ।।
.........नितेश पाटील
नमस्कार ...सस्नेह जय शिवराय...... माझं असं काहीच नाही.ऐकलं, वाचलं, अनुभवलं तेच शब्दरूपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न.त्या तमाम उर्जास्त्रोत्राना माझा सलाम. आई जगदंबेची कृपा... प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज हिंदुपद्पाद्शा, श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय....!!
Wednesday, December 30, 2015
कविवर्य मंगेश पाडगावकर
Saturday, December 26, 2015
झाकली सव्वा लाखाची
सस्नेह जय शिवराय
झाकली मुठ सव्वा लाखाची...
हि म्हण सर्वश्रुत आहे. काही गोष्टी प्रदर्शित न केलेल्याच बऱ्या. असा साधा अर्थ आहे या म्हणीचा. माणसाच्या मनात बरीच चलबिचल असते.असा एकही माणूस सापडणार नाही कि त्याला कुणा एकाचं तरी असं गुपीत माहीत नसेल कि जे माहीत झाल्यावर त्या गोष्टीचा त्रास किव्हा त्याचे परीणाम चांगले होणारे नसतात.
म्हणजेच प्रत्येक माणसाच्या कितीही जमेच्या बाजू असल्या तरी आजच्या या घोर कलयुगात त्याचं एखादं तरी गुपीत तो आपल्या आप्तजनापासून, मित्रांपासून, लोकांपासून लपवत असतो. अपवाद तसे कमीच सापडतील. आणि ते गुपीत तो कुणाला सांगणार नाही यालाच आपण विश्वास असं नाव देतो. आणि पर्यायाने विश्वासघात हा शब्दही आपल्या जीवनात येतो.
कुठेतरी तो विश्वास जिवंत ठेवण्यासाठी माणूस सतत नकळत का होईना ..?? धडपड करत असतो. हे नाकारता येणार नाही. त्याच गुपीत फुटलं की तो म्हणत असतो...सारं करायला लागत होतं पण एवढं सांगायला नको होतं. माझा विश्वास घात केला त्यांनी. अरे पण भावड्या तु तसा वागतोसच का आधी. आपली शेंडी दुसऱ्याच्या हातात का द्यायची...????
आता राहीला प्रश्न झाकली मुठ जर सव्वा लाखाची मग उघडली तर कीती ? त्याची एक कथा प्रचलित आहे.
एका गावातील मंदिरात एक ब्राह्मण असतो.आता मंदिरांना ब्राह्मण कमी सापडतात म्हणा...त्याच्या मनात एक विचार येतो.आपण मंदिरासाठी पाचेक हजार खर्च करून मंडप वैगरे टाकून मंदिराच्या उद्घाटनाला मंत्र्याला बोलवायचे. मंत्री खुश होऊन बक्कळ पैसे (देणगी) देणार आणि आपण उजरणार..!!
अपेक्षा ठेवली ती हि कोणाकडून तर मंत्र्याकडून..आहे का शक्य..?? सारा तामजाम झाला, मंत्रीही आला, लोकही आली. लोकांना काय घेणं. देवाचा प्रसाद म्हणुन का होईना रेटून खालं. मंत्री दर्शनाला गेले आणि पिंडीवर मात्र सव्वा रुपया ठेवला. आणि निघून गेले, लोकही निघून गेली. पण पुजारी मात्र बुचकाळ्यात पडल्यागत झाला. इतका खर्च केला आणि नशिबी काय आलं तर सव्वा रुपया. आता करावं काय.....????
पण ब्राह्मण फार हुशार होता. त्याला एक युक्ती सुचली. त्याने तो सव्वा रूपया पिंडीवरून उचलला मुठीत आवळून धरला आणि चौकात आला. बघा बरं आता गंमत..!! आणि ती मुठ पुढे करून मोठ्याने गरजला. इथे लक्ष द्या...
मला मंत्र्याने अशी वस्तू दिलय कि तिचा लिलाव करायचा आहे. बोली लावा.... आता आपल्या समाजात गरिबांची कमी नाही तशी पैशेवाल्यांचीही कमी नाही. मौल्यवान वस्तूंचा ठेवा जपायचा. मग कितीही पैसा खर्च होउदे. आपलं नाव झालं पाहिजे..बसस.... गरिबांकडे कोण लक्ष देतंय... असो...
एक उठला नि म्हणाला पन्नास हजार... म्हंटलं झोपेतून उठलाय का तु ? पन्नास हजाराला येत असते का हि वस्तू ? पुढे. दुसरा उठला नि म्हणाला पंच्याहत्तर हजार... म्हंटल आंघोळ केलती सकाळी अंघोळ ? एवढयात येत असते का हि वस्तू ? लोकांनाही वाटलं काय हिरा वैगरे असेल बहुतेक. तिसरा उठला नि म्हणाला एक लाख... आता मात्र ब्राह्मणाच्या मनात लाडू फुटले.....
तोवर दुसऱ्या गावात गेलेल्या त्या मंत्र्याची गाडी परतताना चौकात गर्दी बघून थांबली. आणि विचारपूस केली तर कळलं कि मंत्र्याने दिलेल्या वस्तूचा लिलाव करायला लावलाय. आणि तो एक लाखापर्यंत गेलाय. मंत्र्याने पुढील कार्यक्रम ओळखला.आपल्या इज्जतीच प्रश्न आहे. गाडीतून निघाला तो थेट ब्राम्हणाजवळ.... त्याला म्हणाला सव्वा लाख देतो पण मुठ खोलू नको..!! अशी गंमत आहे हि...झाले ना सव्वा रूपायचे सव्वा लाख
झाकली ती सव्वा लाखाची....
आणि उघडली तर सव्वा रुपयाची....
शेवटी किंमत अकलेलाच...
.......नितेश पाटील
९६३७१३८०३१
Saturday, December 19, 2015
पुस्तकं
सस्नेह जय शिवराय... १२.१२.२०१५
पुस्तकं
थोर महापुरुषांची, वीरांची गाथा संपूर्ण जगात सर्वश्रुत असते. ती पुस्तकं, त्यातील संदर्भ, इतिहासातील दाखले, काही कागदपत्र, शिलालेख आणि बरच काही. आणि ते मिळवण्यासाठी धेय्यवेड्या साहित्यिकांनी जीवाचं रान करून आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालून ती कमावलेली ऐवज असते. त्याचा काही मोबदला मिळवा म्हणून ते काही हे कार्य करीत नसतात.पुढच्या पिढीला इतिहासाची अनुभूती यावी , सुसंस्कार घडावेत, राष्ट्रप्रेम जागृत व्हावं इतकीच काय ती मनीषा असावी.
अस असताना एखादा असाही लेखक असु शकतो कि त्याचे विचार नेमके उलट प्रवाही असू शकतात .एखादा मजकूर पुस्तकात असा काही लिहून जातात कि वाचणाऱ्याच्या मनात द्विधा परिस्तिथी उत्पन्न होते. आणि मग विचारांच युद्ध चालू होतं. मनात आणि आपसूकच समाजातही. हा आता त्यात कोण जिंकतो हे ज्याच्या त्याच्या ज्ञान क्षमतेवर अवलंबून असत.शेवटी काय आत्मसात करावं काय नाही याचा सर्वस्वी हक्क आपलाच तर असतो ...!!! पण काही जरी असल तरी विजय नेहमी सत्याचा, अचूक योग्य विधानांचा होत असतो.
थोर महापुरुष, साधु, संत यांच्याबद्दल तुम्ही आम्ही सांगण्याची गरज नाही . इतक्या कालांतरा नंतरही त्यांची कीर्ती अजरामर असेल तर ती उगाच नाही.समाज सकारात्मक विचाराने घडत असतो.नकारात्मक विचाराने बिघडत असतो. काही लोकं जी नकारात्मक विचार मांडतात त्यावरून काय सिद्ध करू पाहतात हे मला माहित नाही किव्हा मला त्या वादात हि पडायचं नाही.
पण आपण आजची परिस्तिथी लक्षात घेतली पाहिजे. आज जी जगामध्ये अराजकता दिसतेय त्यामागे निश्चितच नकारात्मक विचार असणाऱ्या निधर्मी लोकांचा हात आहे हे नकारता येणार नाही. आज समाजाला चांगल्या विचारांची गरज आहे. भडकाऊ मुद्दे उपस्तीथ करून किव्हा तशी परिस्तिथी निर्माण करून काय सिद्ध करू पाहतात देवच जाने. पण त्यात माणूस सामान्य माणसाच नुकसान करतो हे मात्र नक्की. प्रपंचाची चिंता असतेच त्यात समाजात निर्माण झालेल्या वादाला इच्छा नसली तरी तोंड देणं चुकत नाही.
मुद्दा हा आहे कि आपण इतिहासातून आजवर काय शिकलो. इतिहासात म्हणा किव्हा समाजात, जगात म्हणा. मतप्रवाहमध्ये भिन्नता असते नव्हे ती आहेच आणि त्याचा फायदा काही दळभद्री लोकं घेत असतात. अशी लोकं निधर्मी असतात त्यांना समाजाशी, धर्माशी काही देणंघेणं नसतं.ते फक्त आणि फक्त स्वस्वार्थासाठी जगत असतात हि वस्तुस्तिथी आहे.
इतिहासात जशी महापुरुषांच गुणगौरव, सचरित्र इमाने वदनारी ,साक्षी पूराव्यांचा संदर्भ देणारी जनहितार्थ सक्षम असणारी पुस्तकं अमाप आहेत. ती गौरांवित झालेली आहेत. या भारत वर्षात लेखकांची कमी नाही. अगणित लेखक आहेत .त्या त्या लेखकाला मानणारा , त्यांच्या विचारांच समर्थन करणारा वर्गही निःसंशय असतो. पण त्या पुस्तकात लेखकाचं त्याला आलेल्या प्रचितीच त्याच वैयक्तिक मत तो प्रदर्शित करीत असतो.
ते सत्य असत्य लागलीच ठरावण्यापेक्षा आपण आजवर मिळवलेल्या ज्ञानातून चिंतन करून पडताळून पाहणं गरजेचं असतं. अन्यथा ते इतरांसमोर प्रदर्शित करू नये.
आज जरी मी हे बोलतोय ते तुम्हाला पटलेच असं नाही हे माझं वैयक्तिक मत आहे.ते चूक कि बरोबर सत्य कि असत्य हे ठरवण्याची क्षमता भावनेच्या आहारी न जाता ज्ञानावर ती अवलंबून असावी.
काहीही प्रदर्शित करताना आपण त्या मताशी व्यक्तिशः पूर्णतः डोक्याने सहमत असाल तरच ते प्रदर्शित करावं.
शेवटी वैयक्तिक पुस्तके हि समाजातील प्रतिष्ठित संस्थेची,माणसाची असली तरी ती प्रत्येकाला पटतीलच असं मला तरी वाटत नाही.
हे सांगायचं कारण इतकच कि कोणीही उठतो महापुरुषांचा अपमानास्पद मजकूर टाकून नंतर एखाद्या पुस्तकाचा दाखला देतो आणि मोकळा होतो.
काय राव...!!! चांगलं आहे ते घ्यावं माणसांनी. इतरांचा आत्मा दुखेल अश्या प्रकारचे मजकूर बाजूला सारवेत. काय बिघडत त्यात ? राहूदे की तो तिथेच पडुन. बघा जमतंय का....!!!
....नितेश पाटील
९६३७१३८०३१
विचारांचा प्रचार प्रसार
चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार
तितक्या लवकर होत नाही
जितक्या लवकर वाईट गोष्टींचा होतो
वाईट गोष्टी वादाच्या भोवऱ्यात असल्यामुळे
लोकांनाही त्या गोष्टीकडे पाहण्याची एक भलतीच उत्सुकता आणि ओढ असते, त्यामुळे वाईट असणारी गोष्ट ही अधिक प्रसिद्धीझोतात येत असते. आणि त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत असतो.याचं खरं कारण म्हणजे मतभिन्नता.एकाच आईच्या उदारातून जन्म घेणारी, तिच्या कुशीत वाढणारी, तिच्या संस्कारातून बहरणारी मुलही एकमेकांविरोधात उभी ठाकतात तिथं दुसऱ्याचं काय म्हणा...!!!! परंपरेनुसार मतभिन्नता आपसूकच माणसामध्ये येत असते.भारतवर्षात रूढी परंपरेचा डंका अधिक प्रमाणातच आहे. त्या रूढी परंपरेला जागणारा, मानणारा समुदाय सृजन, सुविचारधीन असला तरी माणसाला माणसापासून वेगळा करणारा आहे हे नाकारता येणार नाही.
मग आपापसात झगडे, लढाई, त्यातून निर्माण झालेले वैयक्तिक वाद, वैमनस्य, माणसाने माणसाच्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या वाईट गोष्टींचा परीणाम कुठेतरी साऱ्याच मानवजातीवर पडत असतो. विचारांची देवाणघेवाण जरी माणूस करत असला तरी आज वाईट विचारांच्या जाळ्यात माणूस कुठेतरी गुरफटत चालला आहे. वाईट गोष्टी म्हणण्याचं कारण इतकच कि कुठलाही विचार जर माणसाला माणसापासून , मणुसकीपासून तोडत असेल तर तो चांगला विचार कसा होऊ शकतो ?
याउलट आपल्या भारत वर्षात अनेक साधुसंत, महात्मा, थोर महापुरुषांची परंपरा असूनही, त्या थोरांचे विचार सहज,सोपे जनकल्याणकारी असूनही त्याचा प्रसार कमी होताना दिसतो. आणि काही समाजकंटक, महाभाग असेही आहेत कि त्या विचारांच भांडवल करून स्वस्वार्थासाठी माणसाना आपापसात लढवत आहेत.दोष त्यांचा नसावा कुठेतरी आपला अभ्यास, ज्ञान आज कमी पडत आहे. आपण सुखासाठी इतके आतुर झालोत कि आपल्याला दुसऱ्या कशातही स्वारस्य राहिलेलं नाही. फक्त सुख पाहिजे. आपला अभ्यास फक्त पदाव्यांपूर्ती मर्यादित नसावा तर जनहितार्थ ज्ञान आपण कमावलं पाहिजे. ते संत संगतीने कमावता येईल यात शंका नसावी. आणि त्या संतविचारांचा प्रसार करायला हवा.
........नितेश पाटील
९६३७१३८०३१
Monday, December 7, 2015
परिस
परीस
परीसाच्या स्पर्शाने सोनं होत असं म्हणतात..!!
पण वस्तुरूप सोनं होण्यापेक्षा मनाचं सोनं झालेलं केव्हाही उत्तम. आज या कलयुगात, स्वार्थाच्या दुनियेत माणूस सत्ता, संपत्तीच्या मागे स्वस्वार्थासाठी अनासये धावतोय.आणि हे नश्वर असलं तरी ते मिळवण्याची पराकाष्ठा तो करीत आहे. स्वतःच आयुष्य जर परीसात रूपांतरित केलं तर इतरांच्या देहाचं सोनं करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पण या क्षणभंगुर दुनियेत तो स्वतःच अस्तित्व कुठेतरी विसरला आहे.
एका लोखंडाच्या डबीत परीस आहे. नियमाने ती डबी सोन्याची झाली पाहिजे कि नाही ? पण ती डबी सोन्याची होत नाही.याचा अर्थ त्या डबीत परीस नाही का ? त्या डबीत परीस आहे पण... इथे पण फार महत्वाचा आहे. त्या डबीत परीस आहे पण तो कागदात गुंडाळलेला आहे. त्याच प्रमाणे माणसात ईश्वर आहे. पण माया, मोह, मद, मत्सर, मीतूपणा, अहंकार यात तो गुरफटला आहे. हे सहा गुण धुतल्याशिवाय, बाजूला सारल्याशिवाय मानवरूपी देहाचं परीसात, इश्वरात रूपांतर होणं शक्य नाही.
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो.एक अशी संधी येत असते कि आपल्या जीवनाचं परीस नव्हे तर निदान सोनं तरी करता येणं शक्य असतं. कधी आई- वडिलांच्या रूपाने, कधी गुरुजनांच्या रुपाने, कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने, कधी मित्र-मैत्रिणीच्या नात्याने, कधी प्रेयसीच्या नात्याने. कोणत्या ना कोणत्या रूपात परीसाची संगत आपल्याला लाभत असते.
सर्वात महत्वाचं म्हणजे खरोखरच आपल्याला आपल्यातल्या लोखंडाचे सोने करायचं असेल वा परीस बनायचं असेल तर आज आपल्याला संतांच्या थोर विचारांची संतसंगतीची गरज आहे. आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो.पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात. आणि आज ज्या संतांचे, थोर महापुरुषांचे वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील सगुण मंडळींचे गोडवे गातो. त्यांनी आपलं आयुष्य जनहितासाठी परीसप्रमाणे लोखंडाला सोनं करण्यासाठी खर्ची घातलंय हे नाकारता येणार नाही.
आता आपल्याला विचार करायला हवा कि आता आपण परीस व्हायचं, सोनं व्हायचं,कि लोखंड बनून आजन्म हतोडीचे दणके सहन करीत राहायचं...!!!
.......नीतेश पाटील
९६३७१३८०३१
Saturday, December 5, 2015
चेहऱ्यांची किमया
#चेहऱ्यांचीकिमया
परमेश्वराने जीवाची उत्पत्ती केली असं वेदांचे, पुरणाचे म्हणने आहे.त्यात कैक प्रकारचे जीव येतात.त्या साऱ्यात देवाला मानणारा प्राणी म्हणाल तर माणूस. माणूस आहे म्हणून देवाचं अस्तित्व आहे.आणि देव आहे म्हणून जीवांच अस्तित्व आहे. हे नाकारता येणार नाही. शेवटी श्रद्धा नाही असा माणूस या भूतलावर नाही.ती कसली का होईना.!!. श्रद्धा म्हणजेच परमेश्वर म्हंटल तर वावगं ठरणार नाही.
जनावरांना भावना असल्या तरी त्याची फारसी कदर कुणी करत नाही.इथे माणसाची कदर केली जात नाही तिथे जनावरांच काय म्हणा..!! पण आपण निरखून पाहिलं तर कळेल कि जनावरांच्या चेहऱ्यांमध्ये बहुतांशी साम्य असतं. त्यांना नावं कमी असतात. त्यांना गाय, बैल, बकरी, वाघ, सिंह वैगरे...अश्या नावानेच जास्त ओळखले जाते.
माणसाना मात्र प्रत्येकाला नावं असतात.हा त्या नावात साम्य (१००%)असू शकतं पण चेहऱ्यात नाही. मला हा प्रश्न नेहमीच पडतो. या विश्वात अब्जावधी लोकं आहेत पण त्यांच्या चेहऱ्यामध्ये साम्य का नसावं ? (काही अपवाद वगळता) बरं चेहरा दिसतो तशीच ती व्यक्ती असेल असही सांगता येत नाही. हल्ली चेहर्यावर नाना प्रकारचे मुखवटे असतात ते वेगळे.साहजिकच विचारातही भिन्नता असते. पण हा नश्वरनिष्ठ माणूस चेहऱ्यांवरच भाळतो हे मात्र नक्की...
आता हा प्रश्न राहिला. हे असं असण्यामागे नेमकं कारण काय ? त्यात नर आणि नारी याबाबतीत विचार केला कि डोकं आणखीन चक्रावून जातं. काय किमया असेल ना परमेश्वराची ? असो पण त्याचही पत माणूस घ्यायला बसलाय. या कलयुगात काही सांगता येत नाही हो..!!
शेवटी माणसाने माणूस धर्म पाळला पाहिजे.माणसात धर्माच्याही व्याख्या वेगवेगळ्या झालेल्या दिसून येतात. ईश्वराने माणूस निर्माण केला आणि माणसाने धर्म,जाती,पोटजाती निर्माण केल्या.माणूस धर्म पाळणं तस अवघड नसतं. वेळेवेळी आपल्या पुढयातील माणूस धर्म आपण पळाला पाहिजे.उदा....एखादी नारी जेव्हा आई होते तेव्हा ती आईचा धर्म निस्वार्थीपणाने आपला जीव ओवाळून पाळते अगदी त्याप्रमाणे.....
असो काही झालं, माणूस कितीही प्रगत झाला तरीही तो नैसर्गिक किमया घडवू शकत नाही. ती लीला परमेश्वराचीच.....
नावाने जरी ओळखत असलो आपण
चेहऱ्याची ती किमया आहे...
अब्जावधी लोकांमध्ये
कितीस साम्य आहे...?
.......नितेश पाटील
९६३७१३८०३१
Tuesday, November 17, 2015
बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन
१७ नोव्हेंबर २०१५ बाळासाहेबांचा तिसरा स्मृतिदिन.....
भावपूर्ण आदरांजली....
लाखो हिंदूंच्या मनावर अधिराज्य करणारे हिंदुहृदयसम्राट संपूर्ण जनसमुदायाला सोडून अनंतात विलीन झाले तो दिवस. (१७ नोव्हेंबर२०१२) त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि राहतील. संग्रहित असं बरच आहे, शब्द अपुरे पडतील. मातीच्या रंगाचं काळीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आयुष्याचं रणांगण करताना सार्थकतेचा आनंद होतो. पण, दुर्दैवानं लाचारीचं व्यसन लागलेले काही लोक मातीच्या ममतेहून सत्तेची महती महान मानायला लागतात. अशा वेळी कोणालाही सत्तेची स्वप्नं पडू लागतात. महाराष्ट्राची नेमकी हीच अवस्था झालेली असताना मातीच्या उद्धारासाठी सज्ज झालेल्या बाळ केशव ठाकरे नावाच्या तरुणाची एक गगनभेदी गर्जना महाराष्ट्राच्या मनावर आणि भारताच्या कानावर आदळली. उपर्यांची दादागिरी नष्ट झाली आणि महाराष्ट्र जागा झाला.प्रबोधनाची परंपरा असणार्या घरात, त्यांचा जन्म झाला. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला. मराठी माणसाच्या मनात लावलेल्या स्वाभिमानाच्या वृक्षाचे रूपांतर महाराष्ट्र-विकासाच्या कल्पवृक्षात करणारे हिंदुहृदयसम्राट. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्यांना बाळासाहेबांनी प्रथम चपराक लगावली.महाराष्ट्रात निर्माण झालेले,मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी त्यांनी १९ जून, १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच प्रामुख्याने मुंबईत अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३०ऑक्टोबर,१९६६ रोजी शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. दादरमधील शिवाजी पार्क मैदानाचं शिवतीर्थात रूपांतर झालं.शिवतीर्थावरून बाळासाहेब महाराष्ट्राला काय संदेश देतात याकडे जनतेचे, राजकीय नेत्यांचे, पत्रकारांचे, अभ्यासकांचे लक्ष ते हयात होते तोपर्यंत अखंड पाहण्यास मिळालं.शिवसैनिकांची जणू ती पंढरीच होती नि आहे.वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य.शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र ऐका ओढीने पाहत होता.महाराष्ट्राविषयीचा प्रखर अभिमान व मुंबईवरील प्रेम या विषयांसह हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच. बॉम्बे चे मुंबई असे नामकरण झाले ते हि त्यांच्यामुळेच.असे कैक निर्णय त्यांनी महाराष्ट्र हिताचे घेतले.जातीपातींचे राजकारण, कुटील राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेबानी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार आपल्या वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने अंमलात आणणे अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. त्यांनी असंख्य नेते घडविले.स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची सत्ताकारणाची पद्धतही खास त्यांचीच.अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते.मराठी असंतोषाचा उद्घोष व मराठी अस्मितेचा जयघोष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज. छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या हृदयात दोनच गोष्टी अखंडपणे तेवत आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे शिवरायांचे कर्तृत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक, प्रेरणादायी असे वक्तृत्व व विचार.बाळासाहेबांनी त्यांच्या वडिलांना एक प्रश्न विचारला होता. श्रीमंती म्हणजे काय ? तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या दारात जाऊन घरात आलेल्या लोकांच्या चपलांचे जोड दाखवुन म्हणाले होते, बाळ जितके हे जोड तुझ्या दारात जास्त तितका तू श्रीमंत. आणि पुरी हयात बाळासाहेबांनी माणसं कमावली. त्यांच्या अंत्ययात्रेला आलेल्या माणसाचं मूल्यांकन जगात कुणाला करता येणार नाही. इतका श्रींमंत माणूस ...
संग्रहित....
शब्द नाही उरले
काय वर्णू तुम्हा मी
सुन्न झाल्या दाही
भरल्या अश्रूंनी
विचारांच सोनं
शिवतीर्थ मैदान
तेवत राहील ज्योत
सदैव माझ्या अंतरात
.....नितेश पाटील
