Friday, July 31, 2015

गुरुपौर्णिमा गुरु - देव

सस्नेह जय शिवराय                                   ३१.७.२०१५ निज आषाढ पौर्णिमा

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

आताच्या ह्या कलयुगात कुणाला गुरु मानाव हेच कळेनास झालय.जो तो स्वःताच्या स्वार्थासाठी काहीही करायला बसलाय.आई बाबा आणि संत सोडुन तुमचं भलं होईल अस जगाच्या पाठीवर कुणालाही वाटत नाही आणि वाटनारही नाही.म्हणुन ह्या आताच्या गचपणावर माझा तरी विश्वास नाहीये
संतसंग सर्व काळ ! अखंड प्रेमाचा कल्लोळ....
.....श्री.तुकोबाराय
गुरु आपल्याला देव जवळ करण्याचा मार्ग दाखवत असतात.अर्थात जगण्याचा... आणि आपण आपल्याला सुख, शांती, समाधान मिळावं ह्यासाठी देवाला विनवित असतो. ह्या जगात सुःखी,शांती,आणि समाधानी असा कुणीच सापडनार नाही म्हणजेच परमेश्वर सापडनार नाही हे जरी खरं असलं तरी ह्या तिन्ही गोष्टींची आस सोडली तर परमेश्वर प्राप्ती निच्छीत होईल.असा आपला ईतीहास सांगतो.साधु संतानी थोर महापुरषानी विषय सुःख सोडलं म्हणुन आज त्याच्या बाबतीत ऊत्तमची ऊरे.थोर साधुसंताच्या महापुरषांच्या जिवनचरीत्रावर लक्ष टाकल तर आपल्या लक्षात येईल.आणि आपलं समाधान ते कशात तर बहुतांशी आपल्यापुर्ती मर्यादित.आणि परमेश्वराच्या समाधानासाठी म्हणा का आपल्या सुःखासाठी म्हणा...
लोकं म्हणतात की, आंम्ही श्रावणात नेहमी नवनाथ  लावतो, ज्ञानेश्वरी वाचतो, भागवत वाचतो.
तरीही लोकांच्या मनात मानवता का निर्माण होत नाही हो....
याचं उत्तर हे आहे की.....
लोकं फक्त वाचतात, फक्त प्रक्रीया पुर्ण करतात. वाचणाचे चिंतन आणि मनन लोकं करत नाहीत......म्हणूनच आपली ही आज दुर्दशा झालेली आहे.. आणि देव काय अंधारात काळा गाॅगल लावुन बसलेला नाहीये तर त्याला काही दिसनार नाही.माणसाने विषयाची वासना सोडुन देऊन जे आहे त्यात समाधानी राहीलं पाहीजे तरच त्याला गुरुचे विचार पटु शकतात आणि परमेश्वर प्राप्ती ...जाऊद्या
असो
जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण । गुरुसी आले अपाऽऽरपण । अवघे विश्व गुरु दिसे ।
संत एकनाथांनी असं म्हटलय नि खरच आहे ते !
म्हणूनच माता-पिता-बंधु-भगिनी-शिक्षक-मित्र-मैत्रिणी-स्नेही-सखे-सोबती-आप्तेष्ट-गणगोत-देव-ऋषि-संत ईत्यादि सर्व मी सद्गुरु मानतो.
म्हणूनच गुरुपौर्णिमेनिमीत्त आपणासर्वांस सस्नेहे, सानंद, सिदर शिरसाष्टांग नमस्कार.
कधी, काही चुकलं माकलं तर या मूढ माणसाला सांभाळून घ्या....
.
                                                                     नितेश पाटील

Tuesday, July 28, 2015

अलविदा मिसाईल मैन....

सस्नेह जय शिवराय
कलाम साहेब आणि आषाढी एकादशी
भारतरत्न डॉ.ए.पि.जे.अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती महान वैज्ञानिक,सकारात्मक उर्जचे स्त्रोत व आजच्या पिढीला प्रेरणा देणारे महान नायक हरपले, त्यांचं आज दि.२७.७.२०१५ शिलाँगच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते.शिलाँग इथं आयआयएमच्या कार्यक्रमादरम्यान दरम्यान ते मंचावरच कोसळले, त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.खर तर त्यांचा परीचय देण्याची गरज नाहीये ते पुर्ण जगात नव्हे ब्रम्हांण्डातच म्हणावं लागेल मिसाईल मैन आणि त्याहीपेक्षा माणुस कसा असावा याचं सर्वोत्तम ऊदाहरण होते.
अल्प परिचय -डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडूत झाला. २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ दरम्यान हे भारताचे अकरावे राष्ट्रपती कार्यकाळ होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. अश्या स्मृतीस भावपुर्ण श्रद्धांजली....
त्यांचा मृत्यु  दि.२७.७.२०१५ आषाढी एकादशीला झाला हा योगायोगच म्हणावा लागेल. पण आपल्यात अशी मान्यता आहे की ऐकादशीला देवाघरी जानारे शिव होतात म्हनजे त्या पुण्यात्म्याचा प्रवास संपुन जिवशिव एक होतात. दुसरी म्हणजे एकादशीला अवकाश मार्ग मोकळा असतो
असे धर्मशास्त्र सांगते,मिसाइल मैन ने पण स्वतःच्या
final launch साठी एकादशी निवडली. आणि देवाजवळ गेले.
जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा।।
देवा सांगो सुखदुख। देव निवारिल भूक।।
घालू देवासीच भार। देव सुखाचा सागर।।
राहो जवळी देवापाशी। आता जडोनि पायांशी।।
तुका म्हणे आम्ही बाळें। या देवांची लडिवाळे।।

आषाढी एकादशीचं significance(प्रयोजन) म्हणजेच "देवशयनी एकादशी"अाणि चातुर्मास प्रारंभ  अाषाढ शु.प.११
देवशयनी एकादशी म्हणजे देव ज्या दिवशी शयन करतात, निजतात तो दिवस...आणि कार्तिकी एकादशीला "देवोत्थान एकादशी" म्हणतात, अर्थात देव उठतात तो दिवस..देवला ती कसली झोप पण आपली भोळ्याभाबड्या लोकांची समजुत का तर ह्या मधल्या चार महिन्यात शेती कामामुळे देवाला काही भेटता येणार नाही म्हणुन..
      पण परमेश्वरासाही वाटलं असावं का ? की आपल्यालाही एक नैकदिल, देशभक्त, मिसाईल मैन, आणि एका माणसाची (राजकारणात तशी माणसं कमी आणि भस्मासुर जास्त आहेत.) गरज आहे तर कलाम साहेबाना बोलवावं.
कसं आहे जे ऊपजे ते नासे,जे नासे ते पुःनरुपी दिसे...
जो आलाय तो जाणारच..आणि त्याला कोणीही अपवाद नाही.शेवटी ऊत्तमची ऊरे..आणि ते ह्या माणसाच्या आयुष्याकडे पाहील की आपसुकच कळत जाईल असं निर्भिड आणि सोज्वळ व्यक्तीमत्व.
आपल्याकडील हिंदु मुसलमान वाद अपरीचीत नाहीये,आणि ह्या माणसानी आपलं ऊभ आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केलं. आणि जनमाणसाच चटका लावुन हा पुण्यात्मा आषाढी एकादशीच्या पुण्यदिनी देवापाशी निघुन गेला...
तस पहायला गेल तर ज्याना न्यायला पाहीजे ते ( भ्रष्ट) अजून ईथेच आहेत आणी ज्यांची गरज ह्या मानवजातीस आहे अशाना भगवंत का बरं घेऊन जात असवा ?
त्या मृतात्म्यास मुठमाती मीळते की नाहीतोच ह्याचं राजकारण सुरु...
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामधे ह्याचं श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं राजकारणच समोर आलं.
अबु आझमी म्हणतायेत मुंबई कोस्टल रोडला कलाम यांचे नाव द्या. अरे खड्यात रस्ते आहेत ते सुधारा आधी नंतर महापुरषांची नावे रोडला द्या म्हणावं.आपणही मुडदाडासारखं ह्याना निवडुन द्याव आणि ह्यानी मजा मारुन आपल्यातच लावुन द्यावी.धर्माचा बाजार मांडुन जनतेला लुबाडनारी ही लोकं.
ह्या लोकाना कोण समजवनार माणुस धर्माने नाहीतर कर्माने मोठा होत असतो.आणि आपलही तसच आहे हो दोन दिवस शोक करायचा आणि लागायच आपल्या कामाला दुसरं काय ? 
असो...
 देशासाठी जीवन व्यतीत केलेल्या महापुरषाच्या आत्म्यास चीरशांती लाभो हि पांडुरंगचरणी प्रार्थना...
                                                            नितेश पाटील