Wednesday, December 30, 2015

कविवर्य मंगेश पाडगावकर

कविवर्य मंगेश पाडगावकर यांना
भावपूर्ण श्रद्धांजली....
यु तो कई लोग
आये दिन मर जाते है ।
जहाँ में कुछ लोग ही
जिंदा रह जाते है ।।
माना कि यहाँ गिनती
इंसानो कि होती है ।
याद वही रहते है
जो इन्सानियत निभाते है ।।
प्यार हर कोई करता है
यहाँ जिंदगी से ।
जो प्यार करना सिखायें
वो अमर हो जाते है ।।
दिवाने जिसके लोग
इस दुनीया में ।
आसमाँ के चांद, तारे
कहा छुट पाते है ।।
कई दशको तक
मैफ़ीले सजाई आपने ।
आज थम सा गया वो वक्त
नम आखों से तुझे सलाम करते है ।।
.........नितेश पाटील

Saturday, December 26, 2015

झाकली सव्वा लाखाची

सस्नेह जय शिवराय

झाकली मुठ सव्वा लाखाची...
हि म्हण सर्वश्रुत आहे. काही गोष्टी प्रदर्शित न केलेल्याच बऱ्या. असा साधा अर्थ आहे या म्हणीचा. माणसाच्या मनात बरीच चलबिचल असते.असा एकही माणूस सापडणार नाही कि त्याला कुणा एकाचं तरी असं गुपीत माहीत नसेल कि जे माहीत झाल्यावर त्या गोष्टीचा त्रास किव्हा त्याचे परीणाम चांगले होणारे नसतात.
       म्हणजेच प्रत्येक माणसाच्या कितीही जमेच्या बाजू असल्या तरी आजच्या या घोर कलयुगात त्याचं एखादं तरी गुपीत तो आपल्या आप्तजनापासून, मित्रांपासून, लोकांपासून लपवत असतो. अपवाद तसे कमीच सापडतील. आणि ते गुपीत तो कुणाला सांगणार नाही यालाच आपण विश्वास असं नाव देतो. आणि पर्यायाने विश्वासघात हा शब्दही आपल्या जीवनात येतो.
        कुठेतरी तो विश्वास जिवंत ठेवण्यासाठी माणूस सतत नकळत का होईना ..?? धडपड करत असतो. हे नाकारता येणार नाही. त्याच गुपीत फुटलं की तो म्हणत असतो...सारं करायला लागत होतं पण एवढं सांगायला नको होतं. माझा विश्वास घात केला त्यांनी. अरे पण भावड्या तु तसा वागतोसच का आधी. आपली शेंडी दुसऱ्याच्या हातात का द्यायची...????
        आता राहीला प्रश्न झाकली मुठ जर सव्वा लाखाची मग उघडली तर कीती ? त्याची एक कथा प्रचलित आहे.
          एका गावातील मंदिरात एक ब्राह्मण असतो.आता मंदिरांना ब्राह्मण कमी सापडतात म्हणा...त्याच्या मनात एक विचार येतो.आपण मंदिरासाठी पाचेक हजार खर्च करून मंडप वैगरे टाकून मंदिराच्या उद्घाटनाला मंत्र्याला बोलवायचे. मंत्री खुश होऊन बक्कळ पैसे (देणगी) देणार आणि आपण उजरणार..!!
          अपेक्षा ठेवली ती हि कोणाकडून तर मंत्र्याकडून..आहे का शक्य..?? सारा तामजाम झाला, मंत्रीही आला, लोकही आली. लोकांना काय घेणं. देवाचा प्रसाद म्हणुन का होईना रेटून खालं. मंत्री दर्शनाला गेले आणि पिंडीवर मात्र सव्वा रुपया ठेवला. आणि निघून गेले, लोकही निघून गेली. पण पुजारी मात्र बुचकाळ्यात पडल्यागत झाला. इतका खर्च केला आणि नशिबी काय आलं तर सव्वा रुपया. आता करावं काय.....????
        पण ब्राह्मण फार हुशार होता. त्याला एक युक्ती सुचली. त्याने तो सव्वा रूपया पिंडीवरून उचलला मुठीत आवळून धरला आणि चौकात आला. बघा बरं आता गंमत..!! आणि ती मुठ पुढे करून मोठ्याने गरजला. इथे लक्ष द्या...
मला मंत्र्याने अशी वस्तू दिलय कि तिचा लिलाव करायचा आहे. बोली लावा.... आता आपल्या समाजात गरिबांची कमी नाही तशी पैशेवाल्यांचीही कमी नाही. मौल्यवान वस्तूंचा ठेवा जपायचा. मग कितीही पैसा खर्च होउदे. आपलं नाव झालं पाहिजे..बसस.... गरिबांकडे कोण लक्ष देतंय... असो...
             एक उठला नि म्हणाला पन्नास हजार... म्हंटलं झोपेतून उठलाय का तु ? पन्नास हजाराला येत असते का हि वस्तू ?  पुढे. दुसरा उठला नि म्हणाला पंच्याहत्तर हजार... म्हंटल आंघोळ केलती सकाळी अंघोळ ? एवढयात येत असते का हि वस्तू ? लोकांनाही वाटलं काय हिरा वैगरे असेल बहुतेक. तिसरा उठला नि म्हणाला एक लाख... आता मात्र ब्राह्मणाच्या मनात लाडू फुटले.....
          तोवर दुसऱ्या गावात गेलेल्या त्या मंत्र्याची गाडी परतताना चौकात गर्दी बघून थांबली. आणि विचारपूस केली तर कळलं कि मंत्र्याने दिलेल्या वस्तूचा लिलाव  करायला लावलाय. आणि तो एक लाखापर्यंत गेलाय. मंत्र्याने पुढील कार्यक्रम ओळखला.आपल्या इज्जतीच प्रश्न आहे. गाडीतून निघाला तो थेट ब्राम्हणाजवळ.... त्याला म्हणाला सव्वा लाख देतो पण मुठ खोलू नको..!! अशी गंमत आहे हि...झाले ना सव्वा रूपायचे सव्वा लाख
         झाकली ती सव्वा लाखाची....
आणि उघडली तर सव्वा रुपयाची....
शेवटी किंमत अकलेलाच...
   .......नितेश पाटील
९६३७१३८०३१
        
       

Saturday, December 19, 2015

पुस्तकं

सस्नेह जय शिवराय...    १२.१२.२०१५
पुस्तकं

      थोर महापुरुषांची, वीरांची गाथा संपूर्ण जगात सर्वश्रुत असते. ती पुस्तकं, त्यातील संदर्भ, इतिहासातील दाखले, काही कागदपत्र, शिलालेख आणि बरच काही. आणि ते मिळवण्यासाठी धेय्यवेड्या साहित्यिकांनी जीवाचं रान करून आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालून ती कमावलेली ऐवज असते. त्याचा काही मोबदला मिळवा म्हणून ते काही हे कार्य करीत नसतात.पुढच्या पिढीला इतिहासाची अनुभूती यावी , सुसंस्कार घडावेत, राष्ट्रप्रेम जागृत व्हावं इतकीच काय ती मनीषा असावी.
      अस असताना एखादा असाही लेखक असु शकतो कि त्याचे विचार नेमके उलट प्रवाही असू शकतात .एखादा मजकूर पुस्तकात असा काही लिहून जातात कि वाचणाऱ्याच्या मनात द्विधा परिस्तिथी उत्पन्न होते. आणि मग विचारांच युद्ध चालू होतं. मनात आणि आपसूकच समाजातही. हा आता त्यात कोण जिंकतो हे ज्याच्या त्याच्या ज्ञान क्षमतेवर अवलंबून असत.शेवटी काय आत्मसात करावं काय नाही याचा सर्वस्वी हक्क आपलाच तर असतो ...!!! पण काही जरी असल तरी विजय नेहमी सत्याचा, अचूक योग्य विधानांचा होत असतो.
      थोर महापुरुष, साधु, संत यांच्याबद्दल तुम्ही आम्ही सांगण्याची गरज नाही . इतक्या कालांतरा नंतरही त्यांची कीर्ती अजरामर असेल तर ती उगाच नाही.समाज सकारात्मक विचाराने घडत असतो.नकारात्मक विचाराने बिघडत असतो. काही लोकं जी नकारात्मक विचार मांडतात त्यावरून काय सिद्ध करू पाहतात हे मला माहित नाही किव्हा मला त्या वादात हि पडायचं नाही.
      पण आपण आजची परिस्तिथी लक्षात घेतली पाहिजे. आज जी जगामध्ये अराजकता दिसतेय त्यामागे निश्चितच नकारात्मक विचार असणाऱ्या निधर्मी लोकांचा हात आहे हे नकारता येणार नाही.  आज समाजाला चांगल्या विचारांची गरज आहे. भडकाऊ मुद्दे उपस्तीथ करून किव्हा तशी परिस्तिथी निर्माण करून काय सिद्ध करू पाहतात देवच जाने. पण त्यात माणूस सामान्य माणसाच नुकसान करतो हे मात्र नक्की. प्रपंचाची चिंता असतेच त्यात समाजात निर्माण झालेल्या वादाला इच्छा नसली तरी तोंड देणं चुकत नाही.
       मुद्दा हा आहे कि आपण इतिहासातून आजवर काय शिकलो. इतिहासात म्हणा किव्हा समाजात, जगात म्हणा. मतप्रवाहमध्ये भिन्नता असते नव्हे ती आहेच आणि त्याचा फायदा काही दळभद्री लोकं घेत असतात. अशी लोकं निधर्मी असतात त्यांना समाजाशी, धर्माशी काही देणंघेणं नसतं.ते फक्त आणि फक्त स्वस्वार्थासाठी जगत असतात हि वस्तुस्तिथी आहे.
       इतिहासात जशी महापुरुषांच गुणगौरव, सचरित्र इमाने वदनारी ,साक्षी पूराव्यांचा संदर्भ देणारी जनहितार्थ सक्षम असणारी पुस्तकं अमाप आहेत. ती गौरांवित झालेली आहेत. या भारत वर्षात लेखकांची कमी नाही. अगणित लेखक आहेत .त्या त्या लेखकाला मानणारा , त्यांच्या विचारांच समर्थन करणारा वर्गही निःसंशय असतो. पण त्या पुस्तकात लेखकाचं त्याला आलेल्या प्रचितीच त्याच वैयक्तिक मत तो प्रदर्शित करीत असतो.
     ते सत्य असत्य लागलीच ठरावण्यापेक्षा आपण आजवर मिळवलेल्या ज्ञानातून चिंतन करून पडताळून पाहणं गरजेचं असतं. अन्यथा ते इतरांसमोर प्रदर्शित करू नये.
       आज जरी मी हे बोलतोय ते तुम्हाला पटलेच असं नाही हे माझं वैयक्तिक मत आहे.ते चूक कि बरोबर सत्य कि असत्य हे ठरवण्याची क्षमता भावनेच्या आहारी न जाता ज्ञानावर ती अवलंबून असावी.
      काहीही प्रदर्शित करताना आपण त्या मताशी व्यक्तिशः पूर्णतः डोक्याने सहमत असाल तरच ते प्रदर्शित करावं.
शेवटी वैयक्तिक पुस्तके हि समाजातील प्रतिष्ठित संस्थेची,माणसाची असली तरी ती प्रत्येकाला पटतीलच असं मला तरी वाटत नाही.
   हे सांगायचं कारण इतकच कि कोणीही उठतो महापुरुषांचा अपमानास्पद मजकूर टाकून नंतर एखाद्या पुस्तकाचा दाखला देतो आणि मोकळा होतो.
काय राव...!!! चांगलं आहे ते घ्यावं माणसांनी. इतरांचा आत्मा दुखेल अश्या प्रकारचे मजकूर बाजूला सारवेत. काय बिघडत त्यात ? राहूदे की तो तिथेच पडुन. बघा जमतंय का....!!!

....नितेश पाटील
९६३७१३८०३१

विचारांचा प्रचार प्रसार

चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार
तितक्या लवकर होत नाही
जितक्या लवकर वाईट गोष्टींचा होतो
           वाईट गोष्टी वादाच्या भोवऱ्यात असल्यामुळे
लोकांनाही त्या गोष्टीकडे पाहण्याची एक भलतीच उत्सुकता आणि ओढ असते, त्यामुळे वाईट असणारी गोष्ट ही अधिक प्रसिद्धीझोतात येत असते. आणि त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत असतो.याचं खरं कारण म्हणजे मतभिन्नता.एकाच आईच्या उदारातून जन्म घेणारी, तिच्या कुशीत वाढणारी, तिच्या संस्कारातून बहरणारी मुलही एकमेकांविरोधात उभी ठाकतात तिथं दुसऱ्याचं काय म्हणा...!!!! परंपरेनुसार मतभिन्नता आपसूकच माणसामध्ये येत असते.भारतवर्षात रूढी परंपरेचा डंका अधिक प्रमाणातच आहे. त्या रूढी परंपरेला जागणारा, मानणारा समुदाय सृजन, सुविचारधीन असला तरी माणसाला माणसापासून वेगळा करणारा आहे हे नाकारता येणार नाही.
             मग आपापसात झगडे, लढाई, त्यातून निर्माण झालेले वैयक्तिक वाद, वैमनस्य, माणसाने माणसाच्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या वाईट गोष्टींचा परीणाम कुठेतरी साऱ्याच मानवजातीवर पडत असतो. विचारांची देवाणघेवाण जरी माणूस करत असला तरी आज वाईट विचारांच्या जाळ्यात माणूस कुठेतरी गुरफटत चालला आहे. वाईट गोष्टी म्हणण्याचं कारण इतकच कि कुठलाही विचार जर माणसाला माणसापासून , मणुसकीपासून तोडत असेल तर तो चांगला विचार कसा होऊ शकतो ?
         याउलट आपल्या भारत वर्षात अनेक साधुसंत, महात्मा, थोर महापुरुषांची परंपरा असूनही, त्या थोरांचे विचार सहज,सोपे जनकल्याणकारी असूनही त्याचा प्रसार कमी होताना दिसतो. आणि काही समाजकंटक, महाभाग असेही आहेत कि त्या विचारांच भांडवल करून स्वस्वार्थासाठी माणसाना आपापसात लढवत आहेत.दोष त्यांचा नसावा कुठेतरी आपला अभ्यास, ज्ञान आज कमी पडत आहे. आपण सुखासाठी इतके  आतुर झालोत कि आपल्याला दुसऱ्या कशातही स्वारस्य राहिलेलं नाही. फक्त सुख पाहिजे. आपला अभ्यास फक्त पदाव्यांपूर्ती मर्यादित नसावा तर जनहितार्थ ज्ञान आपण कमावलं पाहिजे. ते संत संगतीने कमावता येईल यात शंका नसावी. आणि त्या संतविचारांचा प्रसार करायला हवा.
........नितेश पाटील
९६३७१३८०३१

Monday, December 7, 2015

परिस

परीस

परीसाच्या स्पर्शाने सोनं होत असं म्हणतात..!!
पण वस्तुरूप सोनं होण्यापेक्षा मनाचं सोनं झालेलं केव्हाही उत्तम. आज या कलयुगात, स्वार्थाच्या दुनियेत माणूस सत्ता, संपत्तीच्या मागे स्वस्वार्थासाठी अनासये धावतोय.आणि हे नश्वर असलं तरी ते मिळवण्याची पराकाष्ठा तो करीत आहे. स्वतःच आयुष्य जर परीसात रूपांतरित केलं तर इतरांच्या देहाचं सोनं करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पण या क्षणभंगुर दुनियेत तो स्वतःच अस्तित्व कुठेतरी विसरला आहे.
         एका लोखंडाच्या डबीत परीस आहे. नियमाने ती डबी सोन्याची झाली पाहिजे कि नाही ? पण ती डबी सोन्याची होत नाही.याचा अर्थ त्या डबीत परीस नाही का ? त्या डबीत परीस आहे पण... इथे पण फार महत्वाचा आहे. त्या डबीत परीस आहे पण तो कागदात गुंडाळलेला आहे. त्याच प्रमाणे माणसात ईश्वर आहे. पण माया, मोह, मद, मत्सर, मीतूपणा, अहंकार यात तो गुरफटला आहे. हे सहा गुण धुतल्याशिवाय, बाजूला सारल्याशिवाय मानवरूपी देहाचं परीसात, इश्वरात रूपांतर होणं शक्य नाही.
        प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो.एक अशी संधी येत असते कि आपल्या जीवनाचं परीस नव्हे तर निदान सोनं तरी करता येणं शक्य असतं. कधी आई- वडिलांच्या रूपाने, कधी गुरुजनांच्या रुपाने, कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने, कधी मित्र-मैत्रिणीच्या नात्याने, कधी प्रेयसीच्या नात्याने. कोणत्या ना कोणत्या रूपात परीसाची संगत आपल्याला लाभत असते.
       सर्वात महत्वाचं म्हणजे खरोखरच आपल्याला आपल्यातल्या लोखंडाचे सोने करायचं असेल वा परीस बनायचं असेल तर आज आपल्याला संतांच्या थोर विचारांची संतसंगतीची गरज आहे. आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो.पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात. आणि आज ज्या संतांचे, थोर महापुरुषांचे वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील सगुण मंडळींचे गोडवे गातो. त्यांनी आपलं आयुष्य जनहितासाठी परीसप्रमाणे लोखंडाला सोनं करण्यासाठी खर्ची घातलंय हे नाकारता येणार नाही.
       आता आपल्याला विचार करायला हवा कि आता आपण परीस व्हायचं, सोनं व्हायचं,कि लोखंड बनून आजन्म हतोडीचे दणके सहन करीत राहायचं...!!!

.......नीतेश पाटील
९६३७१३८०३१

Saturday, December 5, 2015

चेहऱ्यांची किमया

#चेहऱ्यांचीकिमया

      परमेश्वराने जीवाची उत्पत्ती केली असं वेदांचे, पुरणाचे म्हणने आहे.त्यात कैक प्रकारचे जीव येतात.त्या साऱ्यात देवाला मानणारा प्राणी म्हणाल तर माणूस. माणूस आहे म्हणून देवाचं अस्तित्व आहे.आणि देव आहे म्हणून जीवांच अस्तित्व आहे. हे नाकारता येणार नाही. शेवटी श्रद्धा नाही असा माणूस या भूतलावर नाही.ती कसली का होईना.!!. श्रद्धा म्हणजेच परमेश्वर म्हंटल तर वावगं ठरणार नाही.
        जनावरांना भावना असल्या तरी त्याची फारसी कदर कुणी करत नाही.इथे माणसाची कदर केली जात नाही तिथे जनावरांच काय म्हणा..!! पण आपण निरखून पाहिलं तर कळेल कि जनावरांच्या चेहऱ्यांमध्ये बहुतांशी साम्य असतं. त्यांना नावं कमी असतात. त्यांना गाय, बैल, बकरी, वाघ, सिंह वैगरे...अश्या नावानेच जास्त ओळखले जाते.
         माणसाना मात्र प्रत्येकाला नावं असतात.हा त्या नावात साम्य (१००%)असू शकतं पण चेहऱ्यात नाही. मला हा प्रश्न नेहमीच पडतो. या विश्वात अब्जावधी लोकं आहेत पण त्यांच्या चेहऱ्यामध्ये साम्य का नसावं ? (काही अपवाद वगळता) बरं चेहरा दिसतो तशीच ती व्यक्ती असेल असही सांगता येत नाही. हल्ली चेहर्यावर नाना प्रकारचे मुखवटे असतात ते वेगळे.साहजिकच विचारातही भिन्नता असते. पण हा नश्वरनिष्ठ माणूस चेहऱ्यांवरच भाळतो हे मात्र नक्की...
          आता हा प्रश्न राहिला. हे असं असण्यामागे नेमकं कारण काय ? त्यात नर आणि नारी याबाबतीत विचार केला कि डोकं आणखीन चक्रावून जातं. काय किमया असेल ना परमेश्वराची ? असो पण त्याचही पत माणूस घ्यायला बसलाय. या कलयुगात काही सांगता येत नाही हो..!!
शेवटी माणसाने माणूस धर्म पाळला पाहिजे.माणसात धर्माच्याही व्याख्या वेगवेगळ्या झालेल्या दिसून येतात. ईश्वराने माणूस निर्माण केला आणि माणसाने धर्म,जाती,पोटजाती निर्माण केल्या.माणूस धर्म पाळणं तस अवघड नसतं. वेळेवेळी आपल्या पुढयातील माणूस धर्म आपण पळाला पाहिजे.उदा....एखादी नारी जेव्हा आई होते तेव्हा ती आईचा धर्म निस्वार्थीपणाने आपला जीव ओवाळून पाळते अगदी त्याप्रमाणे.....
असो काही झालं, माणूस कितीही प्रगत झाला तरीही तो नैसर्गिक किमया घडवू शकत नाही. ती लीला परमेश्वराचीच.....
नावाने जरी ओळखत असलो आपण
चेहऱ्याची ती किमया आहे...
अब्जावधी लोकांमध्ये
कितीस साम्य आहे...?
.......नितेश पाटील
९६३७१३८०३१